शहरं
Join us  
Trending Stories
1
ईडीवर विशेष न्यायालयाचे ताशेरे, ‘खटल्यांना विलंब केल्यास आरोपी अनिश्चित काळ तुरुंगात राहतील’
2
आजचे राशीभविष्य - ३ मे २०२४; नोकरी करणाऱ्यांसाठी आजचा दिवस शुभ फलदायी
3
मतदानाच्या वाढीव टक्केवारीवर संशय; काँग्रेसने नोंदवला केंद्रीय निवडणूक आयोगाकडे आक्षेप
4
पाकमधील हिंदू मुलींचे बळजबरी धर्मांतर रोखा; दानेशकुमार पलानी यांनी उठवला आवाज
5
आनंद दिघे यांच्या पावलावर पाऊल ठेवून मुख्यमंत्री शिंदेंनी काबीज केले ठाणे
6
धावत्या लोकलमध्ये सशस्त्र हल्ल्यात प्रवाशाचा मृत्यू; कल्याण रेल्वे पोलिसांनी दोघांना केली अटक
7
ते सीबीआय, इन्कम टॅक्स, ईडीमधून उमेदवार शोधतात; आदित्य ठाकरे यांचा आरोप
8
आमोदा येथील मंदिराला भीषण आग;मंदिरासह जिल्हा बँक शाखाही आगीच्या भक्ष्यस्थानी
9
अमोल कीर्तिकर यांच्या मालमत्तेत नऊ कोटींनी वाढ; ५३ एकर शेतजमीन
10
‘डीपफेक’वर कारवाईस निवडणूक आयोग सक्षम, व्हिडीओंवरील बंदीबाबत निर्देश देण्यास दिल्ली हायकोर्टाचा नकार
11
प्रज्वल रेवण्णाविरोधात ‘लूकआऊट’ नोटीस; एसआयटीपुढे हजर राहण्यासाठी ७ दिवसांची मागणी
12
मनसेच्या अविनाश जाधवांवर गुन्हा दाखल; पाच कोटींच्या वसुलीसाठी सोन्याच्या दागिन्यांचे व्यापारी जैन यांना धमकावल्याचा आरोप
13
सर्वेक्षणाच्या नावाखाली मतदारांची माहिती मागणे तातडीने बंद करा; निवडणूक आयोगाचे आदेश
14
बृजभूषण यांचा पत्ता कट; पुत्राला भाजपचे तिकीट, लैंगिक शोषणाचा आरोप भोवला
15
जातिवाचक शिवीगाळ, नग्न करून मारहाण; तरुणाची आत्महत्या, कोपर्डी घटनेतील पीडितेच्या भावासह तिघांविरुद्ध गुन्हा
16
रस्ता बांधल्यावरुन चीनला भारताने चांगलेच खडसावले; शक्सगाम खोरे हा आमचा भाग, केला दावा
17
सूर्यापेक्षा दीडपट दूरवरुन आला पृथ्वीवर सिग्नल; नासाच्या ‘सायके’ यानाची यशस्वी कामगिरी
18
भूषण पाटील दहा कोटींचे धनी; मालमत्तेत साडेसहा कोटींची वाढ
19
श्रीकांत शिंदेंकडे ७.५ कोटींची संपत्ती; वाहने नाहीत, सातारा जिल्ह्यात शेती
20
9 हजार कोटींचे कर्ज...पाकिस्तानची झोळी भरणाऱ्या IMF कडे एवढा पैसा कुठून येतो?

तुम्हाला माहित्येय का मृत्यूनंतर FB, Twitter आणि Google अकाऊंटचं काय होतं? 

By namdeo.kumbhar | Published: August 05, 2017 8:58 AM

तुमच्या जीवनाचा अविभाज्य घटक बनलेल्या सोशल मीडियाबद्दल तुम्हाला एक प्रश्न पडत असेल, की एखादी व्यक्ती मृत पावल्यानंतर त्याच्या अकाऊंटचं नेमकं होतं तरी काय?

नवी दिल्ली, दि. 5 -  तुमच्या जीवनाचा अविभाज्य घटक बनलेल्या सोशल मीडियाबद्दल तुम्हाला एक प्रश्न पडत असेल, की एखादी व्यक्ती मृत पावल्यानंतर त्याच्या अकाऊंटचं नेमकं होतं तरी काय? तुम्ही सोशल मीडियावर असंख्य पोस्ट करत असता. मृत्यूनंतर या पोस्टचं काय होतं? सध्या फेसबुकचे महिन्याला दोन बिलियन अॅक्टिव्ह युजर्स आहेत. तर दररोज 219 बिलियन फोटो अपलोड केले जातात. ट्विटरवर दिवसाला 100 मिलियन अॅक्टिव्ह युजर्स आहेत. प्रत्येक दिवसाला 500 मिलियन ट्विट होतात. गुगलवरही महिन्याला 2 बिलियन युजर्स अॅक्टिव्ह असतात. तर 500 बिलियन फोटो पोस्ट होतात. जी लोकं ही पोस्ट करत असतात त्यांच्या मृत्यूनंतर या सर्व डेटाचं काय होतं असेल?

 गेल्या दहा वर्षामध्ये सोशल मीडिया सगळ्यात प्रभावी ठरलेला आहे आणि तो आता घराघरांत पोहोचलेला आहे. शहर असो किंवा ग्रामीण भाग, इथे सोशल मीडिया केवळ सामाजिक बदलांमध्येच नव्हे, तर  मानसिक बदल करण्यामध्येही प्रभावी राहिलाय. विविध वाहिन्याच सोशल मीडियामध्ये आता मर्यादित राहिल्या नसून ब्लॉग, ट्विटर, व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक, गुगल हे सगळे प्रकार आता सोशल मीडियामध्ये आक्रमक झाले आहेत. फेसबुकने तर अशी परिस्थिती निर्माण केली आहे की, आजचा तरुण ‘बुक’चे ‘फेस’न पाहता ‘फेसबुक’कडे वळला. वाचनापासून आजचा तरुण झपाट्याने तुटत चालला आहे आणि सोशल मीडियाच्या पूर्णपणे अधीन झाला आहे. 

व्यक्तीच्या मृत्यूनंतर सोशल मीडियावर त्याच्या अकाऊंटचा अॅक्सेस कुणालाही मिळत नाही. त्यामुळे त्याचे हक्क त्या व्यक्तीच्या कुटुंबीयांना मिळावेत का? या सगळ्या गोष्टी समजावून देण्यासाठी सोशल साईट्सच्या 'आफ्टर डेथ पॉलिसीज' असतात. 

फेसबुक पॉलिसी - एखाद्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर त्या व्यक्तीचं अकाऊंट लॉग इन करण्याची मुभा फेसबुक देत नाही. आपल्या आवडीच्या व्यक्तीची आपण केवळ आठवण करून देण्याची विनंती फेसबुकला करू शकतो. त्यामुळे मृत व्यक्तीच्या फेसबुक अकाऊंटचा वापर कुणालाही करता येत नाही.

ट्विटर पॉलिसी - एखाद्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर त्या व्यक्तीच्या मृत्यूची माहिती ट्विटरकडे दिली, तर ट्विटर त्या व्यक्तीचं अकाऊंट बंद करते. त्यासाठी त्या व्यक्तीचा मृत्यूचा दाखला ट्विटरला देणे अनिवार्य असते. कारण असे अनेक युजर्स आहेत ज्यांचे ट्विटर अकाऊंट स्वत:च्या नावने नसतात. याशिवाय ट्विटर त्या व्यक्तीविषयी अधिक माहितीही मागवू शकते. पूर्ण माहिती मिळाल्यानंतर ते अकाऊंट 30 दिवसांत बंद होते. तसेच मृत व्यक्तीचे फोटो काढण्याची विनंती केल्यास फोटोही काढले जातात. 

जर तुम्हाला एखाद्या मृत व्यक्तीचे अकांऊट बंद करायचे असेल तर  https://support.twitter.com/articles/87894  

गुगल पॉलिसी - जी मेल आणि गुगल प्लस 'इनअॅक्टिव्ह अकाऊंट मॅनेजर' नावाचं टूल उपलब्ध करून देते. या माध्यामातून एक प्रकारे नॉमिनेशन भरून मृत्यूनंतर आपल्या अकाऊंटचे काय करावं याबाबत माहिती देता येते. यामध्ये तुम्ही 6 महिने किंवा एक वर्षाचा वेळ निश्चित केलात तर मृत्यूनंतर तुमचं अकाऊंट डिलिट होईल. तसंच जर तुमच्या मेलचं तुम्ही नॉमिनेशन केलं तर नॉमिनी केलेल्या व्यक्तीच्या ई-मेलवर सर्व मेल येतील. ही सुविधा फक्त जी मेल आणि गुगलच्या युजर्ससाठी आहे.या लिंकद्वारे तुम्ही तुमच्या अकांऊटची सेटिंग करु शकता - https://myaccount.google.com/inactive?pli=1