शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

हुगा : टू हग समवन! म्हणजे काय रे भाऊ?

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 7, 2023 08:13 IST

आपलं रोजचं आयुष्य धकाधकीचं असतं. कधीकधी त्या धावपळीचा, धकाधकीचा उबगही येतो. असं वाटतं की हे सर्व थांबवून छानपैकी आपल्या प्रियजनांबरोबर, मित्रांबरोबर बाहेर फिरायला जावं.

आपलं रोजचं आयुष्य धकाधकीचं असतं. कधीकधी त्या धावपळीचा, धकाधकीचा उबगही येतो. असं वाटतं की हे सर्व थांबवून छानपैकी आपल्या प्रियजनांबरोबर, मित्रांबरोबर बाहेर फिरायला जावं. गप्पांची मैफल रंगवावी. एन्जॉय करावं. पण अनेकदा ते शक्य होत नाही. आपल्या दैनंदिन कामांना फाटा देऊन ही अशी चंगळ करण्याची प्रथा आपल्याकडे तितकीशी रुजलेली नाही. पण तिकडे युरोपात ही प्रथा आवर्जून पाळली जाते. याला हुगा लाइफस्टाइल असं नाव आहे. हुगा लाइफस्टाइल म्हणजे फार काही नाही. घरीसुद्धा हुगाची वातावरण निर्मिती केली जाऊ शकते. आपल्या प्रियजनांना, मित्र-मैत्रिणींना, आप्तेष्टांना किंवा कोणीच नसेल तर शेजाऱ्यांना बोलवावं. छानपैकी खायला काहीतरी करावं. खाता खाता गप्पाष्टक रंगवावं. गप्पांमध्ये कोणताही विषय वर्ज्य ठेवू नये. ज्यांना मित्रांचं कोंडाळं जमवणं अगदीच शक्य नाही ते घरी हुगाची नुसती वातावरण निर्मितीही करू शकतात. घरी नसेल हुगा शक्य तर बाहेर जाऊनही हा आनंद लुटता येऊ शकतो. कोणताही तणाव न घेता त्या क्षणापुरता आयुष्य जगणं, हे या लाइफस्टाइलचे मुख्य सूत्र आहे. या छोट्याशा ब्रेकनंतर आंबलेलं मन प्रफुल्लित होतं, असं निरीक्षण आहे. संकल्पना आली कुठून? हुगा हा शब्द डेन्मार्कमधून आला. साधारणतः १५००च्या शतकात हुगा हा शब्द वापरला गेला. हुगाची फोड आहे टू हग समवन, म्हणजे आपल्या प्रिय व्यक्तीला आलिंगन देऊन त्याची वास्तपुस्त करणं. त्याच्याशी चार-दोन घटका गप्पा मारणं, असं यात अध्याहृत असतं. डॅनिश जनतेने या जीवनशैलीला आपलंसं केलं आहे. अलीकडे हुगा जीवनशैलीने जर्मनी, फ्रान्स, स्पेन यांसारख्या युरोपीय देशांमध्ये प्रवेश केला आहे. या देशांमध्ये चक्क हुगा लाइफस्टाइलचे मेळावेही वीकएण्ड्सना भरविले जातात. आपल्याकडे काय? जे जे पाश्चात्य ते ते उदात्त, अशी आपली धारणा आहे. त्यामुळे येत्या काळात हुगा लाइफस्टाइल आपल्याकडे आली तरी त्यात आश्चर्य वाटून घ्यायला नको. न पेक्षा आपल्याकडे सण-समारंभ, लग्न-मुंजी यांच्या निमित्ताने प्रियजनांच्या भेटीगाठी होत असतातच. तीच आपली हुगा लाइफस्टाइल, उगा कशाला पाश्चात्यांचं अंधानुकरण करावं, हाही प्रश्न विचारता येऊ शकतोच म्हणा!

टॅग्स :Internationalआंतरराष्ट्रीय