शहरं
Join us  
Trending Stories
1
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
2
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
3
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
4
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
5
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
6
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
7
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
8
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
9
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
10
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
11
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
12
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
13
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
14
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
15
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
16
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
17
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
18
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
19
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
20
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
Daily Top 2Weekly Top 5

सावधान : आता "व्हॉट्सअ‍ॅप"च्या माध्यमातून व्हायरस

By admin | Updated: May 17, 2017 16:32 IST

वन्नाक्राय या रॅन्समवेअर व्हायरसने अक्षरश: धुमाकूळ घातला असतानाच आता जगभरात 56 कोटी युझर्स वैयक्तिक इमेल आणि पासवर्ड लीक झाल्याची धक्कादायक माहिती उघड झाली आहे

अनिल भापकर/ऑनलाइन लोकमत

मुंबई, दि. 17 - वन्नाक्राय या रॅन्समवेअर व्हायरसने अक्षरश: धुमाकूळ घातला असतानाच आता जगभरात 56 कोटी युझर्स वैयक्तिक इमेल आणि पासवर्ड लीक झाल्याची धक्कादायक माहिती उघड झाली आहे. म्हणजेच हॅकर आता वेगवेगळ्या माध्यमातून तसेच व्हायरसचे हल्ले करीत आहे.आता तर या हॅकर्स ने व्हॉट्सअ‍ॅप च्या माध्यमातून व्हायरस पसरविण्यास सुरुवात केली आहे. सध्या एक लिंक व्हॉट्सअ‍ॅप च्या माध्यमातून सगळीकडे व्हायरल होत आहे ते म्हणजे या लिंक वर क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅपचा कलर बदलता येतो.या संबंधीची अधिक माहिती अशी की मागील काही दिवसांपासून व्हॉट्सअ‍ॅप च्या माध्यमातून एक मेसेज सगळीकडे फिरत आहे तो मेसेज म्हणजे जर तुम्हाला तुमचे व्हॉट्सअ‍ॅप अधिक कलर फुल्ल करायचे असेल अर्थात तुमच्या व्हॉट्सअ‍ॅप अप्लिकेशन चा कलर चेंज करायचा असेल तर खालील लिंक वर क्लिक करा असा मेसेज असतो. जर ह्या लिंक वर क्लिक केले तर तुम्हाला व्हॉट्सअ‍ॅपच्या ऑफिसिअल साईटवर घेऊन जाण्याऐवजी दुसऱ्याच डोमेन वर ही लिंक घेऊन जाते. नंतर तुम्हाला व्हेरिफिकेशन साठी ही लिंक तुमचे व्हॉट्सअ‍ॅप फ्रेंड आणि व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप मध्ये शेअर करण्यास सांगितले जाते.ही फेक व्हॉट्सअ‍ॅप लिंक म्हणजे दुसरे तिसरे काही नसून मॅलवेअर चा प्रकार असून जो तुमचा डेटा चोरण्याचे काम करतो. जेव्हा तुम्ही अशा प्रकारच्या फेक लिंक वर क्लिक करता तेव्हा एक छोटासा प्रोग्राम तुमच्या स्मार्टफोन वर इन्स्टॉल होतो जो डेटा चोरून तो डेटा हॅकर कडे पाठविण्याचे काम करतो त्यालाच मॅलवेअर असे म्हणतात.

काय काळजी घ्यावी ?१. सगळ्यात महतवाचे म्हणजे व्हॉट्सअ‍ॅप कधीच अशा प्रकारचे मेसेज आपल्या युझर्सला पाठवत नाही कारण व्हॉट्सअ‍ॅपचे अपडेट हे गुगल प्ले किंवा अँपल स्टोअर मार्फत मिळतात. २. कुठल्याही अनोळखी लिंक ला क्लिक करू नका जे सांगतात कि या मध्ये व्हॉट्सअ‍ॅप अपडेट उपलब्ध आहेत. ३. अनोळखी मित्राने जर काही व्हिडिओ किंवा लिंक पाठविले असल्यास ओपन करू नका . अथवा शक्य असल्यास कॉल करून लिंक कसली आहे याविषयी खातरजमा करा. ४.तुमच्या कडे जर चुकून अशी लिंक आलीच तर तुम्ही ती पुढे फॉरवर्ड करू नका. ५. तुमच्या स्मार्टफोन मध्ये एखादा चांगला अँटीव्हायरस असावा .