शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांच्या बारामतीतील प्रचाराच्या सांगता सभेत अचानक अजितदादांची एंट्री; नेमकं काय घडलं?
2
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
3
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
4
देशपांडे लैय भारी! तुषारने पहिल्याच षटकात PBKS च्या स्टार फलंदाजांचे उडवले त्रिफळे, Video 
5
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
6
“राज ठाकरे ज्यांच्या प्रचारासाठी जातात तो उमेदवार पडतोच”; ठाकरे गटाचा खोचक टोला
7
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
8
MS Dhoni पहिल्याच चेंडूवर बोल्ड! पंजाब किंग्सच्या गोलंदाजांसमोर CSK ची शरणागती, डाव संपला
9
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
10
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
11
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
12
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
13
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
14
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
15
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
16
६ धावांत ३ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
17
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!
18
‘भाजपाला विरोध करण्यासाठी दहशतवादी कसाबची बाजू घेता? थोडी तरी लाज बाळगा’, बावनकुळेंची वडेट्टीवारांवर टीका
19
CSK च्या प्ले ऑफच्या मार्गात अडथळे; २ मेन गोलंदाज मायदेशात परतले, दीपक चहरवरही प्रश्नचिन्ह
20
T20 वर्ल्ड कपमध्ये विराटला OUT करणं हेच ध्येय; पाकिस्तानी गोलंदाजानं बाळगलं 'स्वप्न'

प्रशासनाला जे जमलं नाही, ते वाघानं करून दाखवलं; दोन गावं झाली एका झटक्यात हागणदारीमुक्त...

By ऑनलाइन लोकमत | Published: December 01, 2019 1:30 AM

आतापर्यंत वाघाला पकडण्यात यश आलं नाही. पण निदान या वाघाच्या भीतीनं लोक शौचालयांचा वापर करू लागलेत, हीसुद्धा एक चांगली गोष्ट आहे.

उत्तर प्रदेशातील बुंदेलखंडच्या महोबा आणि हमीरपूर जिल्ह्यांच्या सीमेवर वाघ शिरलाय. त्यामुळे वाघाच्या भीतीने या गावांमधील लोकांचं बाहेर शौचास जाणं बंद झालं आहे. या गावांमध्ये सरकारने शौचालयेही बांधून दिली आहेत. तरीसुद्धा गावकरी बाहेर नैसर्गिक विधीसाठी जात होते. पण आता गावात अचानक एक वाघ शिरल्याने लोकांचं बाहेर जाणं बंद झालं आणि ते घरातील शौचालयांचा वापर करू लागले आहेत. हा वाघ मध्य प्रदेशातील पन्ना जंगलातून भटकून इथपर्यंत पोहोचल्याचं प्रशासनानं स्पष्ट केलं आहे.येथील वन विभागाचे अधिकारी रामजी राय यांनी सांगितले, कुनेहटा गावातील एका व्यक्तीनं शेतात वाघ बघितल्याची माहिती मिळाली होती. त्यामुळे वन विभागानं एक टीम वाघ पकडण्यासाठी तैनात केली आहे. आता सुरक्षा म्हणून लोकांना आग पेटवून सतर्क राहण्याचा सूचना करण्यात आली आहे.आतापर्यंत वाघाला पकडण्यात यश आलं नाही. पण निदान या वाघाच्या भीतीनं लोक शौचालयांचा वापर करू लागलेत, हीसुद्धा एक चांगली गोष्ट आहे. वाघ जंगलात असूनही लोक घरात लपून बसत आहेत. कुणीही बाहेर शौचास जात नाही. गेल्या चार दिवसांपासून लोक असंच करीत आहेत. त्यामुळेच गमतीत या वाघाला हागणदारीमुक्त योजनेचे ब्रॅण्ड अ‍ॅम्बेसेडर म्हणत आहेत.देशातील गावांनाहागणदारीमुक्त करण्यासाठी सरकारकडून वेगवेगळ्या उपाययोजना केल्या जातात. पण अजूनही लोक बाहेर शौचास जातात. म्हणजे अनेक ठिकाणी प्रशासन लोकांचं बाहेर शौचास जाणं बंद करू शकलेलं नाही. लोकांचीही बाहेर जाण्याची सवय सुटत नाहीये. पण हेच प्रशासनाचं काम एका वाघानं केलं आहे. वाघानं लोकांचं बाहेर शौचास जाणं बंद केलंय.

टॅग्स :Tigerवाघ