शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
2
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
3
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
4
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
5
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
6
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
7
Health Tips: लघवीची दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
8
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
9
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
10
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
11
Summer Special: भेळ तर नेहमीच खाता, पण 'हा' सिक्रेट' मसाला वाढवेल सुकी भेळेची लज्जत
12
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
13
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
14
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
15
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
16
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
17
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
18
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
19
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
20
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
Daily Top 2Weekly Top 5

अजबच! ना युद्ध, ना लॉकडाऊन तरीही 25 लाखांना विकला जातोय एक बर्गर; काय आहे 'हे' प्रकरण 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 12, 2022 14:51 IST

एका बर्गरची किंमत तब्बल 25 लाखांपर्यंत पोहोचली आहे.

एखाद्या स्नॅक्सची किंमत किती असू शकते? 1-2 हजार किंवा खूप झालं तर 4-5 हजारापर्यंत. मात्र एका बर्गरसारख्या सामान्य स्नॅक्सची किंमत लाखोंच्या घरात पोहोचली तर याबाबत ऐकून कोणीही चक्रावून जाईल. असाच काहीसा प्रकार अमेरिकेतील बेसबॉल स्टेडियममध्ये घडला, जिथे एका बर्गरची किंमत तब्बल 25 लाखांपर्यंत पोहोचली आहे. 

अटलांटा येथील ट्रूइस्ट पार्क येथे हा प्रकार घडला. येथे जॉर्जियाहून येणाऱ्या पर्यटकांना एक खास बर्गर दिला जात आहे, ज्याची किंमत सामान्य बर्गरपेक्षा लाखो पटीने जास्त आहे. यानंतर हा सामना दुरुच, मात्र ही घटना लोकप्रिय झाली ती फक्त आणि फक्त या अत्यंत महागड्या बर्गरमुळे. या बर्गरची किंमत ऐकून तुम्हीही नक्कीच चक्रावून जाल. 

जगातील स्वस्त आणि टिकाऊ फास्ट फूड म्हणून ओळखल्या जाणार्‍या या बर्गरची बेसबॉल स्टेडियममध्ये 33,000 डॉलर म्हणजेच भारतीय चलनात सुमारे 25 लाख रुपये किंमत होती. हा विनोद नाही, तर सत्य आहे की एका बर्गरची किंमत 25 लाख रुपये ठेवण्यात आली. जर ही किंमत तुम्हाला जास्त वाटत असेल तर इथे एक 'स्वस्त बर्गर' देखील उपलब्ध होतं. त्याची किंमत आहे 151 डॉलर म्हणजेच भारतीय चलनानुसार 'फक्त' 11,465 रुपये.

रशिया-युक्रेन युद्धाच्या वेळी, रशियातील मॅकडोनाल्डचे आउटलेट बंद असताना लोक 1-2 लाख रुपयांना ब्लॅकमध्ये बर्गर खरेदी करताना दिसले होते. सध्या हा महागडा बर्गर वर्ल्ड सीरीज 2021 साजरा करण्यासाठी लाँच करण्यात आला आहे. त्याचं स्वस्त वर्जन 151 डॉलरला ठेवण्यात आलं आहे. कारण सीरिजचे 151 वर्षे पूर्ण झाले आहेत. 25 लाखांचा बर्गर बनवण्यासाठी काही महागड्या गोष्टींचा वापर करण्यात आला आहे, पण त्या इतक्याही महाग नाहीत की बर्गर हिऱ्यांच्या किमतीत विकला जावा. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.