शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

पावसामुळे रस्ते झाले जलमय; वाहतूक कोंडीत अडकलेल्या व्यक्तीनं चक्क मासा पकडला

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 1, 2022 13:40 IST

गेल्या काही तासांपासून बंगळुरुत मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. त्यामुळे अनेक रस्ते जलमय झालेले आहेत.

बंगळुरू - पावसाच्या पाण्यामुळे रस्त्यावर पाणी साचणं हे नेहमीचं झालं आहे. मंगळवारी बंगळुरूमध्ये मुसळधार पावसाने हजेरी लावली, शहरातील रस्त्यांचे अनेक महत्त्वाचे भाग पाण्याखाली गेले. रस्त्यावर नदी वाहत असल्याची परिस्थिती निर्माण झाली. शहराच्या काही भागात अडकलेल्या नागरिकांना बचाव पथकाकडून रेस्क्यू करण्यात येत होते. रस्त्यावर साचलेल्या पाण्यामुळे वाहतूक कोंडीत अनेकजण अडकले. ट्रॅफिक जाममध्ये फसलेल्या नागरिकांना यावेळी अनोखी घटना पाहायला मिळाली. ट्विटरवर एक फोटो व्हायरल झाला आहे ज्यामध्ये एक नागरी स्वयंसेवक हातात कॅटफिश धरलेला दिसत आहे. हा फोटो इंटरनेटवर व्हायरल होताच लोकंही हैराण झाले. 

बंगळुरूच्या रस्त्यावर चक्क मासा पकडलासोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या फोटोत दिसत आहे, रस्त्यावर एका स्वयंसेवकाने हातात मासा पकडताच त्याच्या सहकाऱ्याने मोबाईल कॅमेऱ्यात फोटो क्लिक करण्यास सुरुवात केली. ट्विटर युजर समीर मोहनने पोस्ट केलेल्या ट्विटमध्ये असे लिहिले आहे की, 'बंगळुरुला या. रस्त्याच्या मधोमध मासेमारी करताना तुम्हाला दिसून येईल. हा फोटोनं लोकांना आश्चर्यचकित केले. रस्त्यावर पावसाच्या पाण्यात मासे कसे आले, असा प्रश्न लोकांना पडला होता. मात्र, काहीजण या गोष्टीची खिल्ली उडवत आहेत आणि वेगवेगळ्या प्रकारे ट्विट करत आहेत. या पोस्टला २४०० हून अधिक लाईक्स, अनेक कमेंट्स मिळाल्या आहेत.

व्हायरल फोटो पाहून लोकांच्या भन्नाट प्रतिक्रिया हा फोटो व्हायरल झाल्यानंतर एका यूजरने कमेंटमध्ये लिहिले की, 'बंगळुरू आता एका वेगळ्या उंचीवर जात आहे. रस्त्यावर मासे पकडता येऊ लागलेत. एका यूजरने गंमतीत लिहिले की, 'मी फिशिंग रॉड खरेदी करू शकतो आणि पुढच्या पावसासाठी मासेमारीची तयारी करू शकतो. तर 'तुम्हाला पिराना किंवा व्हेल मासा सापडतो का ते पहा अशी प्रतिक्रिया एका यूजरनं दिली आहे. दरम्यान एका यूजर्सनं खिल्ली उडवली, 'परंतु बंगळुरूमधील हवामान कमाल आहे तेथे अनेक खाद्य पर्याय आहेत असं म्हटलं आहे. बंगळुरूच्या ग्रामीण आणि शहरी भागात ३ सप्टेंबरपर्यंत हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.

टॅग्स :Trafficवाहतूक कोंडी