शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
6
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
7
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
8
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
9
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
10
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
11
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
12
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
13
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
14
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
15
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
16
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
17
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
18
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
19
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
20
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
Daily Top 2Weekly Top 5

धोका वाढला! गोव्याच्या समुद्र किनाऱ्यावर घातक जेलीफिशचा कहर; २ दिवसात ९० लोक झाले शिकार

By manali.bagul | Updated: November 22, 2020 17:18 IST

गेल्या काही दिवसात ९० लोकांना जेलीफिशने दंश केला आहे. या विषारी माश्याचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 

(Image Credit- Aajtak)

गोव्याचा समुद्र किनारा आपल्या सुंदरतेसाठी प्रसिद्ध आहे. नेहमीच मोठ्या संख्येने लोक गोव्याच्या किनाऱ्यावर फिरायला जातात. लॉकडाऊनचे नियम शिथिल केल्यानंतर आता अनेकजण गोव्याला जाण्याच्या विचारात असतील. पण समुद्र किनाऱ्यावर फिरणं आता धोकादायक ठरू शकते. कारण गोव्याच्या बीचवर घातक, विषारी जेलीफिशने कहर केला आहे. गेल्या काही दिवसात ९० लोकांना जेलीफिशने दंश केला आहे. या विषारी माश्याचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 

मागच्या दोन दिवसात बागा कॅलंग्यूट बीचवर ५५ पेक्षा जास्त लोकांना जेलीफिशने दंश केला आहे. कँडोलिम बीचवर या विषारी माश्याने १० लोकांना दंश केला आहे. दक्षिण गोव्यात २५ पेक्षा जास्तवेळा अशा घटना घडल्या आहेत. विषारी जेलीफिशने दंश केल्यानंतर  लोकांना प्राथमिक उपचारांची आवश्यकता असते. जेलीफिशच्या संपर्कात आल्यानंतर शरीराला  वेदना होतात तसंच शरीराच्या ज्या भागावर जेली फिशने दंश केला आहे तो भाग सुन्न  होतो. याव्यतिरिक्त या माश्याच्या संपर्कात आल्याने काहीवेळासाठी त्वचेवर संवेदना जाणवत नाहीत. 

इंग्रजी माध्यमांच्या रिपोर्टनुसार बागा बीचवर ही दुर्घटना घडल्यानंतर तात्काळ रुग्णवाहिका बोलावण्यात आली होती. ऑक्सिजन लावल्यानंतर पिडीत व्यक्तीला रुग्णालयात पोहोचवण्यात आले. जेलीफीशने डंक मारल्यानंतर एका व्यक्तीच्या छातीत वेदना झाल्या नंतर श्वास घ्यायला त्रास झाला. बाबो! 'या' राजकुमारीचे बॉडीगार्डशी प्रेमसंबंध; अन् तोंड बंद ठेवायला दिले तब्बल १२ कोटी

जेलिफिश दोन प्रकारचे असतात.  एक सामान्य आणि दुसरा प्रकार विषारी असतो. जेलीफिशच्या दंशामुळे लोकांच्या शरीराला वेगवेगळ्या प्रकारे नुकसान पोहोचू शकतं. संपर्कात आल्यानंतर जळजळ होण्याची समस्या उद्भवते. जेलीफिशच्या संपर्कात आल्यानंतर खूप कमीवेळा अशी स्थिती उद्भवते. सध्या अशा प्रकारच्या घटनांमध्ये वाढ झालेली दिसून येत आहे. दिसायला चांगली नव्हती म्हणून पार्टनरनं केलं ब्रेकअप; मग हिनं सर्जरी केली अन् आता... पाहा फोटो

टॅग्स :goaगोवाTravel Tipsट्रॅव्हल टिप्सHealthआरोग्य