शहरं
Join us  
Trending Stories
1
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
2
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, ट्रम्प प्रशासनाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
3
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
4
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २३ डिसेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मितभाषी राहून मतभेद दूर करू शकाल
5
बांगलादेशात आणखी एका नेत्याची निर्घृण हत्या; आसाममध्ये हाय अलर्ट, सीमेवर अधिक दक्षता
6
संपादकीय: एप्स्टीन फाइल्स, भारत अन् न झालेला राजकीय भूकंप!
7
कोकाटे यांची आमदारकी तूर्त वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती 
8
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला आणखी एक झटका; मुद्रांक शुल्क सवलतीचे इरादा पत्र अखेर केले रद्द 
9
पालिकेसाठी ठाकरे बंधूंमधील युतीची आज घोषणा? काही जागांबद्दल एकमत होत नव्हते...
10
गांधी-नेहरूंच्या डोक्यावर खापर फोडून काय होणार?
11
आता मिशन महापालिका मैदान तयार : आजपासून अर्ज भरण्यास सुरुवात; इच्छुकांची मोर्चेबांधणी 
12
केंद्राच्या योजनांतून महाराष्ट्राला १.४७ लाख कोटी; उत्तर प्रदेश व दिल्लीपाठोपाठ राज्याचा तिसरा क्रमांक
13
वायुप्रदूषण नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई का नाही? पालिका आयुक्त, एमपीसीबी अधिकाऱ्यांना हायकोर्टात हजर हाेण्याचे निर्देश
14
‘त्या’ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या लगेच करण्याचे आदेश; राज्य निवडणूक आयोग दोन दिवसांत घेणार आढावा
15
विश्वचषक गमावल्यानंतर निवृत्तीचा विचार होता : रोहित; असे वाटले की, या खेळाने माझ्याकडून सर्वकाही हिरावून घेतले आहे
16
 आणखी किती हिंमत हवी...! पुतीनसमोर पत्रकारानं मैत्रिणीला केलं प्रपोज अन्..
17
कांजूर डम्पिंगच्या दुर्गंधीवर तोडगा काढा; मुंबई उच्च न्यायालयाचे निर्देश; स्वच्छ हवेत श्वास घेणे काळाची गरज : महत्त्वपूर्ण निरीक्षण
18
बापरे, पश्चिम रेल्वेवर एकदाचाच ३० दिवसांचा मेगाब्लॉक! १०० लोकल रद्द झाल्याने हाल 
19
आता लोकलच्या दारात लटकता येणार नाही; प्रयोग सुरु, कारण...
20
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
Daily Top 2Weekly Top 5

नोकरीला ठोकला राम राम! भटकंतीचा छंद जोपासून 'ती' कमावतेय महिना 50 लाख रुपये

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 16, 2019 17:28 IST

भटकंतीची हौस असणारी मंडळी अख्खं जग पालथं घालण्याचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी दिवसरात्र मेहनत करुन पैसा कमावतात. पण एका मुलीनं आपला फिरण्याचा शौक पूर्ण करण्यासाठी चक्क नोकरीलाच राम-राम ठोकलाय.

1. जगणं शिकवणारा छंद जोपासाभटकंतीची हौस असणारी मंडळी अख्खं जग पालथं घालण्याचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी दिवसरात्र मेहनत करुन पैसा कमावतात. पण एका मुलीनं आपला फिरण्याचा शौक पूर्ण करण्यासाठी चक्क नोकरीलाच राम-राम ठोकलाय. आता तुम्ही म्हणाल की, काय वेडी मुलगी आहे. भटकंतीसाठी ठार वेड्या असणाऱ्या या मुलीने फिरण्याच्या हौसेलाच आपल्या आयुष्याच एक अविभाज्य घटक बनवला आहे. एवढंच नाही तर या छंदातूनच ती सध्या लाखो रुपयांचं उत्पन्नदेखील कमावत आहे. फिरण्याच्या आवडतीतूनच ही तरुणी महिन्याला चक्क 50 लाख रुपये कमावत आहेत. उत्पन्नाचा हा आकडा वाचून आता कदाचित तुम्हाला तिचा हेवा वाटला असावा. हो ना?

2. कोण आहे ही तरुणी ?या 'भटकंती क्वीन'चे नाव Alieen Adalid असे आहे. ती फिलिपिन्स येथील रहिवासी आहे. पण केवळ फिलिपिन्सची नागरिक म्हणून जगण्याऐवजी तिला स्वतःला 'World Citizen' म्हणून संबोधित करायला अधिक आवडते. तीन वर्षांपूर्वी Alieenनं Deutsche Bank तील नोकरी सोडण्याचा निर्णय घेत जगभ्रमंती करण्याचा निर्णय घेतला. वयाच्या 21 व्या वर्षी तिनं हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला. 

3. स्वछंद काम करण्यास सुरुवातनोकरी सोडल्यानंतर Alieenनं स्वतंत्ररित्या काम करण्यास सुरुवात केली. वेब डिझाईनिंग, ग्राफिंक डिझाईनिंग, एसईओ मॅनेजमेंट, ऑनलाइन मार्केटिंग या क्षेत्रांमध्ये तिनं फ्रीलान्सिंग काम करण्यास सुरुवात केली. यांसारख्या कामांच्या माध्यमातून तिनं आपला फिरण्याचा खर्च भरुन काढला.

4. 'डिजिटल बंजारन'चा टॅगकौतुकास्पद बाब म्हणजे भटकंतीवर असतानाही Alieen कधीही काम करण्यास कंटाळा करत नाही. तिचा हा अनोखा अंदाज पाहून लोक तिला 'डिजिटल बंजारन' म्हणून संबोधित करू लागले आणि याच नावाने आज ती सर्वत्र ओळखली जात आहे. 

5. बहुगुणसंपन्न Alieen Alieen बॉयफ्रेंड जोनससहीत adalidgear.com नावाची ऑनलाइन कंपनी चालवते. पर्यटनादरम्यान आवश्यक भासणाऱ्या सर्व वस्तू उपलब्ध करुन देण्याचे काम ही कंपनी करते. याव्यतिरिक्त ती कित्येक ब्रँड्सचे ऑनलाइन मार्केटिंग आणि एसईओ मॅनेजमेंटचे कामदेखील सांभाळते.  iamaileen.com या नावाने ती एक ब्लॉगदेखील चालवते. केवळ चालवतच नाही तर हा ब्लॉग पर्यटन विश्वात अतिशय प्रसिद्ध आहे. 

6. फिरणे केवळ श्रीमंतांचाच छंद नाही जगातील सर्व देशांची सफर करण्याचे Alieenचे स्वप्न आहे. सध्या तिनं 50हून अधिक देशांची भ्रमंती केली आहे. तिच्या पासपोर्टवर जर्मनी, फ्रान्स, बेल्जिअम, सिंगापूर, हाँगकाँग, इंडोनेशिया, नॉर्वे आणि भारतासहीत कित्येक देशांचा व्हिसा स्टॅम्प आहे. जग फिरणं केवळ श्रीमंतांचाच छंद नाहीय, हे Alieenला सिद्ध करायचे आहे. कारण आवड आणि सवड असल्यास जगभ्रमंतीचा छंद अगदी कोणीही जोपासू शकतो.

7. नेमके काय आहे ध्येय? Alieenला आपल्या जगभ्रमंतीची कहाणी इतरांना ऐकून त्यांना पर्यटन करण्यास प्रोत्साहित करायचे आहे. सोबत अनेकांना ती पर्यटनासंबंधी मार्गदर्शनदेखील करते. जेणेकरुन फिरण्याची हौस असणारी ही मंडळी कोणत्याही देशाला योग्यरितीने ओळखू शकतील आणि त्या देशाच्या रंगात मिसळून जातील.

 

टॅग्स :Travel Tipsट्रॅव्हल टिप्स