शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
3
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
4
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
5
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
6
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
7
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
8
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
9
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
10
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
11
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
12
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
13
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
14
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
15
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
16
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
17
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
18
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
19
बेडरुम व्हिडीओ, २०२० चं 'ते' सीक्रेट अफेअर... प्रियंकाच्या क्राईम फाईलबाबत खळबळजनक खुलासा
20
Asha Bhosle: "...तेव्हा मी जगाचा निरोप घ्यावा!"; आशा भोसलेंची शेवटची इच्छा ऐकून चाहत्यांचे डोळे पाणावले
Daily Top 2Weekly Top 5

10 हजार वर्षांपूर्वी नामशेष झालेले डायर वुल्फ पृथ्वीवर परतले; शास्त्रज्ञांनी केला चमत्कार...

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 8, 2025 20:18 IST

The Return of the Dire Wolf: रोम्युलस आणि रेमसला या दोन नर पिलांचा जन्म 1 ऑक्टोबर 2024 रोजी झाला, तर तिसऱ्या मादी पिलाचा जन्म 30 जानेवारी 2025 रोजी झाला. पाहा व्हिडिओ...

Dire Wolf Returns : 10 हजार वर्षांपूर्वी जंगलांवर राज्य करणारा डायर वुल्फ(लांडगा) पुन्हा जिवंत झाला आहे. आतापर्यंत फक्त जीवाश्म स्वरुपात आढळणारा हा प्राणी आता पृथ्वीवर वावरताना दिसणार आहे. मनोरंजक गोष्ट म्हणजे, हा तोच डायर वुल्फ आहे, जो प्रसिद्ध वेब सिरीज 'गेम ऑफ थ्रोन्स'मध्ये स्टार्क हाऊसचा एक निष्ठावंत साथीदार म्हणून दाखवण्यात आला आहे.

याचे संपूर्ण श्रेय एका अमेरिकन बायोटेक कंपनीला जाते. कंपनीने क्लोनिंग आणि जीन्स एडिटिंगच्या मदतीने हा चमत्कार घडवून आणला आहे. डलास (टेक्सास) येथील कोलोसल बायोसायन्सेस नावाच्या कंपनीमुने तीन डायर वुल्फ पिल्लांना जन्म दिला आहे. रोम्युलस आणि रेमसला या दोन नर पिलांचा जन्म 1 ऑक्टोबर 2024 रोजी झाला, तर तिसऱ्या मादी पिलाचा जन्म 30 जानेवारी 2025 रोजी झाला. आता तुम्हालाही 10 हजार वर्षांपूर्वी नामशेष झालेल्या डायर वुल्फचा आवाज आवाज ऐकता येणार आहे. 

डायर वुल्फ पृथ्वीवर कसा परतला?शास्त्रज्ञांना सापडलेल्या 10 हजार वर्षे जुन्या दात आणि 72 हजार वर्षे जुन्या कवटीतून काढलेल्या DNA द्वारे हा चमत्कार घडला. कंपनीने CRISPR तंत्रज्ञानाचा वापर करून 14 जीन्समध्ये 20 एडिट्स केले. याद्वारे पेशींचे क्लोनिंग करुन पाळीव मादी कुत्र्याने या डायर वुल्फला जन्म दिला. नामशेष झालेली प्रजाती पुन्हा परतण्याचा हा जगातील पहिलाच यशस्वी प्रयत्न असल्याचा दावा कंपनीने केला आहे. 

अनेक प्राणी परतणार? या पिल्लांना 2000 एकर परिसरात अतिशय सुरक्षेत ठेवण्यात आले आहे. ही विज्ञानाच्या क्षेत्रात ही एक मोठी झेप मानली जात आहे. शास्त्रज्ञांचे म्हणने आहे की, ही पिल्ले पूर्णपणे डायर वुल्फ नाहीत, तर त्यांच्यासारखी दिसणारी संकरित प्रजाती आहेत. त्यांचा जीनोम 99.9% डायर वुल्फसारखा आहे, त्यामुळेच त्यांना 'डायर वुल्फ फेनोटाइप' म्हटले जात आहे. दरम्यान, आता कोलोसल बायोसायन्सेसने नामशेष झालेले मॅमथ, डोडो आणि टास्मानियन वाघ यांसारखे प्राणी पुन्हा आणण्याची योजना आखली आहे. 

या प्रयोगावर वाद कंपनीने यासाठी आतापर्यंत $435 मिलियन खर्च केला आहे. त्यामुळे आता काही तज्ञांनी या प्रयोगावर गंभीर प्रश्नही उपस्थित केला आहे. नामशेष झालेल्या प्रजातींचे पुनरुत्थान करण्यासाठी इतके पैसे खर्च करणे योग्य आहे का? असे तज्ञांचे म्हणने आहे. तसेच, ही पिल्ले पर्यावरणीयदृष्ट्या काही उपयुक्त ठरतील का, की ते फक्त विज्ञानाचे प्रदर्शन असतील? असेही म्हटले जात आहे. 

टॅग्स :Jara hatkeजरा हटकेAmericaअमेरिकाInteresting Factsइंटरेस्टींग फॅक्ट्सSocial Viralसोशल व्हायरल