शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

आईविना मुलाची जगण्याची एकाकी झुंज!

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 17, 2025 08:52 IST

माणसाची जगण्याची ऊर्मी कायमच कोणत्याही गोष्टीपेक्षा प्रभावी असते. मग ती व्यक्ती वृद्ध असो, लहान मूल असो, आजारांनी जर्जर झालेला एखादी रोगी असो की जखमांनी, वेदनांनी कळवळणारा, श्वासासाठी धडपडणारा एखादा अपघातग्रस्त असो... हे जीवन सहजासहजी सोडून देण्याची कोणाचीही तयारी नसते...

आईविना अनेक दिवस जिवंत राहिलेल्या आणि त्यासाठी त्याच्या परीनं त्याला जे काही शक्य आहे, ते ते सारं करणाऱ्या एका लहान मुलाची कहाणी सध्या जगभरात व्हायरल होते आहे.

चीनमध्ये नुकतीच घडलेली ही घटना. आपल्या आईच्या मृत्यूनंतर दोन वर्षांच्या एका मुलानं अनेक दिवस नूडल्स आणि जेली खाऊन आपला जीव वाचवला. या मुलाची २८ वर्षीय आई झेंग यू हिचा एक मित्र गेले काही दिवस तिच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करीत होता. दिवसांतील वेगवेगळ्या वेळी आणि गेले कित्येक दिवस तो तिच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करीत होता. आधी तर त्यानं तिला बऱ्याचदा फोन केले; पण तिनं एकदाही फोन उचलला गेला नाही, नंतर तर तो बंदच झाला!

काय करावं आणि तिच्याशी कसा संपर्क साधावा... त्याला काहीच कळत नव्हतं; कारण आपल्या मुलासह ती एकटीच राहत होती. तिचा नवराही तिच्यासोबत नव्हता आणि इतर कुणाशी तिच्या मित्राचा संपर्क नव्हता. न राहवून शेवटी त्यानं पोलिसांना फोन केला.झेजियांग प्रांतातील वेनझोउच्या कैंगनान काउंटीत पोलिस जेव्हा पोहोचले तेव्हा तेही अक्षरश: हादरले. पोलिसांनी दरवाजा वाजवला, पण प्रतिसाद मिळाला नाही. शेजाऱ्यांकडे चौकशी केली, पण त्यांनाही काहीच कल्पना नव्हती. पोलिसांनी शेवटी दरवाजा तोडून आतमध्ये प्रवेश केला. तिथे त्यांनी जे काही पाहिलं ते अक्षरश: डोळे विस्फारणारं होतं.

झेंग तिच्या १० चौरस फुटांच्या बेडरूममध्ये मृतावस्थेत पडलेली होती. तिच्या शेजारीच बेडवर हाडांचा सापळा झालेला तिचा मुलगा ‘खेळत’ होता. एक अत्यंत मळका शर्ट आणि डायपर एवढंच त्याच्या अंगावर होतं. डायपरही अतिशय घाणेरडं होतं. गेले कित्येक दिवस त्यातच त्यानं नैसर्गिक विधी केल्यानं त्याचा दुर्गंध येत होता.घर बंद. आई ‘झोपलेली’. आईच्या अंगाखांद्यावर लोळूनही, तिला उठवूनही ती उठत नाही म्हटल्यावर, हंबरडा फोडून आकांडतांडव केल्यानंतरही, आई काहीच हालचाल करत नाही, आपल्याशी बोलत नाही, आपल्याला खायला-प्यायला देत नाही म्हटल्यावर जगण्यासाठी एखादं लहान मूल जे काही करेल, ते ते सारं या मुलानं केलं.

खाण्यासारखं घरात जे काही मिळेल ते खाऊन त्यानं आपलं पोट भरलं. आधी त्याला घरात जेली दिसली. ती त्यानं फस्त केली. मग त्याला काही स्नॅक्स दिसले. तेही त्यानं थोडे-थोडे करत खाऊन संपवले. आता काय? घरात खायला काहीच नाही! पोट भुकेनं कळवळल्यावर मग त्यानं फ्रिजमध्ये शोध घेतला. तिथेही काहीच नाही; पण एक कच्चा भोपळा मात्र त्याला तिथे दिसला. तोच थोडा-थोडा खाऊन मग त्यानं दिवस काढले!  पोलिस आणि शेजाऱ्यांनी लगेच मुलाला स्वच्छ करून रुग्णालयात दाखल केलं. लहान मुलाच्या जगण्याच्या आकांक्षेची ही कहाणी सोशल मीडियावर अनेकांच्या डोळ्यांत पाणी आणते आहे..

English
हिंदी सारांश
Web Title : Orphaned Boy's Solitary Fight for Survival: A Heartbreaking Tale

Web Summary : In China, a two-year-old survived alone for days after his mother's death. He ate noodles, jelly and even raw pumpkin. The mother's friend alerted police after being unable to contact her. The boy was found severely malnourished in their apartment. The heartbreaking story highlights a child's will to live.
टॅग्स :chinaचीन