शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

काहीच करत नाही म्हणून कंपनीने काढले, आताही रिकामाच पण वर्षाला कमावतोय ६९ लाख

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 10, 2025 11:11 IST

तुम्ही  म्हणाल त्याने आधी कमविले असतील आता कुठेतरी गुंतविले असतील आणि त्यातून व्याज कमवत असेल. तर तसे नाही. या व्यक्तीला कोरोनापूर्वी म्हणजेच २०१८ मध्ये एका कंपनीने तो काहीच करत नाही, कामाचा नाही म्हणून नोकरीवरून काढून टाकले होते.

आपल्याकडे सांगितले जाते मेहनत केली तर त्याचे फळ मिळते, यश मिळते. काम केले तर चार पैसे मिळतात. पण एका व्यक्तीने हे सर्व दावे खोटे ठरविले आहेत. जपानच्या या व्यक्तीने काहीच न करता वर्षाला ६९ लाख रुपये कमविले आहेत.

तुम्ही  म्हणाल त्याने आधी कमविले असतील आता कुठेतरी गुंतविले असतील आणि त्यातून व्याज कमवत असेल. तर तसे नाही. या व्यक्तीला कोरोनापूर्वी म्हणजेच २०१८ मध्ये एका कंपनीने तो काहीच करत नाही, कामाचा नाही म्हणून नोकरीवरून काढून टाकले होते. या व्यक्तीने पुढे घरातच बसून दिवस काढले. यानंतर असा जुगाड केला की आताही तो काहीच करत नाही पण वर्षाला ६९ लाख रुपये कमवत आहे. 

या व्यक्तीने आपल्यातील काहीच करत नाही, या गुणांचा पुरेपुर वापर केला. तसे पाहिले तर तो काहीच करत नाही. तो फक्त गैर-रोमँटीक पद्धतीने अनोळखी लोकांना कंपनी देतो. हे लोक कंटाळलेले असतात, त्यांच्यासोबत कोणीतरी बोलायला, हसायला हवे असते. अनेकदा एखाद्या कार्यक्रमात सोबत जाण्यासाठी देखील हे लोक त्याला बोलवितात. हा रिकामटेकडा व्यक्ती त्या व्यक्तींना सोबत करतो. बस, याचे ते लोक पैसे मोजतात. यातून त्याची कमाई होते. 

मोरिमोटो हा ४१ वर्षांचा आहे. त्याला सात वर्षांचा मुलगा आहे. वर्षाला त्याला कमीतकमी १००० वेळा असे बोलविले जाते. तो या लोकांकडे पैसे मागत नाही, ते लोकच त्यांना वाटतील तेवढे पैसे मोजतात. यापूर्वी तो १० हजार ते ३० हजार येन पर्यंत चार्ज करत होता. आता तो पैसे आकारत नाही. मिळेल तेवढे पैसे घेतो आणि त्यांना साथ देतो. माझ्या चरितार्थासाठी तेवढे पैसे पुरेसे आहेत, असे तो म्हणाले. हे शाश्वत आहे की नाही माहिती नाही. परंतू, याचा मी आनंद घेत आहे, असे त्याने सांगितले. 

टॅग्स :Japanजपान