शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

आयडियाची कल्पना! ...म्हणून तिनं महागड्या कारवर थापलं शेण

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 21, 2019 17:46 IST

गुजरातमधील महिलेनं संपूर्ण कारवर शेण थापलं

अहमदाबाद: उन्हाचा कडाका वाढल्यानं अनेक जण विविध युक्त्यांचा वापर करत आहेत. पुण्यात एका सिग्नलजवळ उन्हापासून बचाव करण्यासाठी शेड तयार करण्यात आलं आहे. तर अहमदाबादमधील एका महिलेनं संपूर्ण कारला शेण थापलं आहे. सध्या या गाडीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. रुपेश गौरांग दास नावाच्या व्यक्तीनं फेसबुकवर शेण थापलेल्या कारचे फोटो शेअर केले आहेत. गायीच्या शेणाचा मी पाहिलेला सर्वोत्तम वापर, असं दास यांनी लिहिलं आहे. आपण अहमदाबादमध्ये हे फोटो टिपल्याचं त्यांनी म्हटलं. '45 अंश सेल्सिअस तापमानाचा सामना करण्यासाठी आणि कारमधील उष्णता कमी करण्यासाठी सेजल शहा यांनी त्यांच्या कारवर शेण थापलं आहे,' असं दास यांनी फेसबुक पोस्टमध्ये म्हटलं आहे. या पोस्टमध्ये शहा यांच्या कारचे दोन फोटो दिसत आहेत. त्यात संपूर्ण कारवर शेणाचा थर दिसत आहे. शेण थापलेल्या कारची सध्या इंटरनेटवर जोरदार चर्चा आहे. ही कार पाहून सोशल मीडियाला अनेक प्रश्नदेखील पडले आहेत. कारवर थापण्यात आलेल्या शेणाच्या दुर्गंधानं त्रास होत नाही का, थापण्यात आलेल्या शेणाचं आच्छादन किती सेंटिमीटरचं आहे, असे प्रश्न सोशल मीडियावरील काहींनी उपस्थित केले आहेत. ग्रामीण भागात जमीन सारवण्यासाठी शेणाचा वापर होतो. याशिवाय भिंतीवरही गोवऱ्या थापल्या जातात. त्यामुळे थंडीत घरातली हवा ऊबदार राहते. तर उन्हाळ्यात गारवा मिळतो. याशिवाय शेणामुळे डासांचा त्रासदेखील कमी होतो. 

टॅग्स :Temperatureतापमान