शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

व्वा गुरुजी! पॉर्नहबवर शिकवताहेत गणित; वर्षाची कमाई तब्बल २ कोटी

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 26, 2021 11:59 IST

पॉर्नहबवर गणिताचे व्हिडीओ अपलोड करून बक्कळ कमाई

पॉर्नहब नाव ऐकताच आपल्या डोक्यात सर्वात आधी विचार येतो पॉर्न फिल्मचा. पण पॉर्नहबचा वापर गणित शिकवण्यासाठी केला जाऊ शकतो अशी कल्पना कधी केलीय का? मात्र तैवानमधील एक शिक्षक पॉर्नहबवर गणिताचे धडे देत आहेत. चांगशू सरांच्या व्हिडीओला लाखो व्ह्यूज मिळत असून त्यातून ते वर्षाकाठी २ कोटींची कमाई करत आहेत.

पॉर्नहबवर लोक पॉर्न पाहायला येतात. तिथे येऊन कोण कशाला गणित शिकेल, असा विचार काहींच्या मनात येईल. पण चांगशू यांच्या व्हिडीओला तुफान प्रतिसाद मिळत आहे. चांगशू सर अतिशय सोप्या पद्धतीनं गणित शिकवत असल्यानं अनेकजण पॉर्नहबवर येऊन त्यांचे व्हिडीओ पाहतात. चांगशूमॅथ666 या नावानं सरांचं पॉर्नहबवर व्हेरिफाईड अकाऊंट आहे. त्यांनी एक्स व्हिडीओज आणि इतर पॉर्न साईट्सवरदेखील अकाऊंट सुरू करण्याचा प्रयत्न केला. मात्र इतर साईट्सवर नॉन-अडल्ट क्लिप्स चालत नसल्यानं त्यांना फारसा प्रतिसाद मिळाला नाही.

अधिकाधिक लोकांनी सोप्या, सहज पद्धतीनं गणित शिकावं, असं मला वाटतं. त्यासाठी मी कोणतं व्यासपीठ वापरतो, हे तितकंसं महत्त्वाचं नाही, असं मत चांगशू यांनी व्यक्त केलं. अडल्ट व्हिडीओ प्लॅटफॉर्मवर गणित शिकवणाऱ्यांची संख्या कमी आहे आणि तिथे व्हिडीओ पाहण्यासाठी येणाऱ्यांची संख्या अधिक आहे. त्यामुळे तिथे व्हिडीओ अपलोड केल्यास बरेच लोक व्हिडीओ पाहतील, असा विचार मी केला होता, असं चांगशू यांनी यांनी सांगितलं.