शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
6
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
7
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
8
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
9
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
10
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
11
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
12
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
13
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
14
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
15
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
16
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
17
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

प्रेरणादायी! सफाई कामगाराची मुलगी झाली 500 कोटींची मालकीण; जाणून घ्या, 'तिची' यशोगाथा

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 25, 2022 16:02 IST

Jane Lu: जेन लूने अकाउंटंटची नोकरी सोडली. तेव्हा तिला लोकांचे टोमणे ऐकावे लागले. तिला वाईट ठरवलं गेलं, पण ती डगमगली नाही.

स्वप्न पूर्ण करण्यासाठी कठोर परिश्रम केले तर एक दिवस ती नक्कीच पूर्ण होतात. ऑस्ट्रेलियात राहणाऱ्या जेन लूसोबत असंच काहीसं घडलं आहे. तिने अकाउंटंटची नोकरी सोडली. तेव्हा तिला लोकांचे टोमणे ऐकावे लागले. तिला वाईट ठरवलं गेलं, पण ती डगमगली नाही. लोकांची पर्वा न करता जेनने तिचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी प्रयत्न सुरूच ठेवले आणि ती यात यशस्वी देखील झाली.

जिद्द आणि कठोर मेहनतीच्या जोरावर तिने ऑनलाईन कपड्यांची कंपनी सुरू केली आणि आता ती करोडपती झाली आहे. आज तिचा व्यवसाय तब्बल 120 हून अधिक देशांमध्ये पसरला आहे आणि फॅशन जगतातही तिची एक स्वतंत्र ओळख निर्माण झाली आहे. आजपर्यंत जेन लू 500 कोटींहून अधिक संपत्तीची मालकीण बनली आहे.

पालकांना न सांगता सोडली नोकरी 

जेन लूचे पालक चीनमध्ये राहायला गेले. त्यांनी सुरुवातीला सफाई कामगार म्हणून काम केले. जेनने एका मोठ्या कंपनीत अकाउंटंट म्हणून काम करावं असं त्यांना वाटत होतं. पण जेनला व्यवसाय करायचा होता. अशा स्थितीत तिने पालकांना न सांगता नोकरी सोडली. ती सकाळी लवकर घरातून निघायची, ज्यामुळे तिच्या आई-वडिलांना वाटायचे की ती कामावर जात आहे, परंतु जेन यावेळी तिच्या स्वप्नांना पाठलाग करण्यात व्यस्त होती.

गॅरेजमध्ये सुरू केलं कपड्यांचं दुकान 

जेनने गुपचूप तिच्या पालकांच्या गॅरेजमध्ये कपड्यांचं दुकान सुरू केलं. ती तिथे कपडे ठेवायची आणि विकायची. हळूहळू तिने एका गोडाऊनमध्ये दुकान सुरू केलं, त्याचदरम्यान तिने हे कपडे ऑनलाईन विकण्याचा विचार केला. त्यानंतर जेनने शोपो नावाची फॅशन कंपनी स्थापन केली. 2012 पर्यंत या कंपनीचे सोशल मीडियावर 20 हजारांहून अधिक फॉलोअर्स होते. हळूहळू जेनच्या कंपनीचे कपडे विकले गेले आणि ती 500 कोटींची मालक झाली. आता तिच्याकडे आलिशान घर, आलिशान गाड्या आहेत. 2016 च्या फोर्ब्सच्या यादीतही जेनचे नाव समाविष्ट झाले आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"