शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

डॉक्टरने प्रिस्क्रिप्शनमध्ये Rx ऐवजी लिहिले 'हे' नाव, सर्वत्र चर्चा 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 17, 2022 13:49 IST

सतना जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रात कार्यरत असलेले वैद्यकीय अधिकारी डॉ. सर्वेश सिंह यांनी लिहिलेले हे प्रिस्क्रिप्शन सध्या व्हायरल होत आहे. 

मध्य प्रदेशात मेडिकल स्टडी (Medical Study) म्हणजेच एमबीबीएसचा (MBBS) अभ्यास हिंदी भाषेत सुरू करण्यात आला आहे. दरम्यान, येथील सतनामधील एका वैद्यकीय अधिकाऱ्याने मेडिकल स्डटी हिंदीत सुरू झाल्यापासून 24 तासांच्या आत रूग्णाचे प्रिस्क्रिप्शन हिंदीमध्ये लिहिले आहे. सतना जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रात कार्यरत असलेले वैद्यकीय अधिकारी डॉ. सर्वेश सिंह यांनी लिहिलेले हे प्रिस्क्रिप्शन सध्या व्हायरल होत आहे. 

खरंतर डॉ. सर्वेश सिंह यांनी या प्रिस्क्रिप्शनमध्ये Rx ऐवजी 'श्री हरी' लिहिलं आहे आणि खाली हिंदी भाषेत सर्व औषधांची नावेही लिहिली आहेत. आता या प्रिस्क्रिप्शनची राज्यभर चर्चा होत आहे. दोन दिवसांपूर्वीच राज्याचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी आपल्या एका भाषणात म्हटले होते की, जर प्रिस्क्रिप्शनमध्ये औषधे हिंदीत लिहिली असतील तर काय नुकसान आहे? यानंतर डॉ. सर्वेश सिंह यांनी त्यांचा मुद्दा मान्य करून तो खरा करून दाखवला. 

दरम्यान, उदाहरण देताना मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान म्हणाले होते - 'Rx च्या जागी 'श्री हरी' लिहा आणि क्रोसिन खाली लिहा... यात काय अडचण आहे.' यानंतर डॉ. सर्वेश सिंह यांनी पोटदुखीने त्रस्त महिलेसाठी हिंदीत प्रिस्क्रिप्शन लिहिले. तसेच, त्या महिलेचा केस स्टडीही त्यांनी हिंदीत लिहिली. तसेच,  'श्री हरी' लिहिताना त्या प्रिस्क्रिप्शनमध्ये 5 औषधं लिहिली, सगळी नावं फक्त हिंदीत लिहिली होती.

कोण आहेत डॉ. सर्वेश सिंह?दरम्यान, डॉ. सर्वेश सिंह यांनी 2017 मध्ये  इंदूरमधील देवी अहिल्या विद्यापीठातून एमबीबीएसचे शिक्षण घेतले होते. डॉ. सर्वेश सिंह तीन वर्षांपूर्वी सतना जिल्ह्यातील कोटोर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात नियुक्ती करण्यात आली. तेव्हापासून ते येथील लोकांवर उपचार करत आहेत.

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलMadhya Pradeshमध्य प्रदेशshivraj singh chauhanशिवराज सिंह चौहानdoctorडॉक्टर