शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिकेचे जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
2
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
3
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
4
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
5
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
6
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
7
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
8
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
9
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
10
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
11
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
12
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
13
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
14
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
15
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
16
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
17
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
18
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
19
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
20
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
Daily Top 2Weekly Top 5

गेल्या 23 वर्षांपासून नर्सने कापले नाहीत केस; आता लोक म्हणतात, 'Rapunzel'

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 10, 2021 17:13 IST

Russian woman who hasn't cut her hair for 23 YEARS : अँझेलिका बारानोवा (Anzhelika Baranova) नावाची ही 28 वर्षीय रशियन नर्स दावा करते की, तिचे केस इतके लांब झाले आहेत की ते जमिनीला स्पर्श करतात.

रशियातील (Russian) एका नर्सने गेल्या 23 वर्षांपासून आपले केस कापले नाहीत. हे ऐकून तुम्हाला थोडे विचित्र वाटेल पण हे पूर्णपणे सत्य आहे. रशियातील या नर्सने दोन दशकांहून अधिक काळानंतरही केस कापण्यास नकार दिला आहे आणि तिचे केस आता जवळजवळ जमिनीला स्पर्श करत आहेत.

अँझेलिका बारानोवा (Anzhelika Baranova) नावाची ही 28 वर्षीय रशियन नर्स दावा करते की, तिचे केस इतके लांब झाले आहेत की ते जमिनीला स्पर्श करतात. तसेच, आठवड्यातून फक्त दोन वेळा केस धुतले जातात आणि केस कोरडे करण्यासाठी हवेत सोडून देते, असे नर्सने सांगितले. दरम्यान, लोक आता या नर्सला रॅपन्झेल म्हणत आहेत. रॅपन्झेल ही एक जर्मन परीकथा आहे, ज्यात रॅपन्झेल नावाच्या मुलीचे असंभव रुपाने केस  लांब आहेत.

नर्स म्हणाली की, या केसांमुळे मला काही वेळा अस्वस्थ वाटते. मात्र, केस पाहून मिळणारा आनंद हा इतर समस्या विसरून जाणारा आहे. तसेच, तिने रिपोर्टमध्ये म्हटले आहे की, माझे केस लहानपणापासून सुंदर होते, त्यामुळे मी पाच वर्षांची असल्यापासून मी ते कापले नाहीत. याशिवाय, मी कधीही कोणत्याही विशिष्ट हेतूसाठी हे केस वाढवले नाहीत. या केसांची योग्यरित्या मी काळजी घेते. 

दरम्यान, या लांब केसांच्या काळजीबद्दलही नर्सने सांगितले. ती म्हणाली, कंगवा फिरवण्यासाठी आठवड्यातून दोन वेळा केस योग्य कंडिशनरने धुवून घेते, मग ते नैसर्गिकरित्या सुकू देते आणि खूप काळजीपूर्वक कंगवा फिरवते. तसेच, माझ्या चाहत्यांना वाटते की, लांब केस सुंदर दिसतात.

टॅग्स :Jara hatkeजरा हटकेrussiaरशिया