शहरं
Join us  
Trending Stories
1
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
2
मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
3
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
4
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
5
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
6
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
7
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
8
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
9
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
10
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
11
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
12
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
13
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
14
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
15
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
16
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
17
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
18
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
19
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
20
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
Daily Top 2Weekly Top 5

Shocking : नेल आर्टसाठी 'या' सलूनमध्ये करण्यात येतोय जीवंत मुंग्यांचा वापर!

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 2, 2018 17:36 IST

महिला आपलं सौंदर्य वाढविण्यासाठी अनेक उपाय करत असतात. कधी कधी तर आपल्या हटके फॅशनने सर्वांचं लेक्ष वेधून घेतात. फॅशन वर्ल्डमध्ये अनेक ट्रेन्ड धुमाकूळ घालत असतात. कधी कोणती फॅशन लोकं डोक्यावर घेतील हे सांगता येत नाही.

महिला आपलं सौंदर्य वाढविण्यासाठी अनेक उपाय करत असतात. कधी कधी तर आपल्या हटके फॅशनने सर्वांचं लेक्ष वेधून घेतात. फॅशन वर्ल्डमध्ये अनेक ट्रेन्ड धुमाकूळ घालत असतात. कधी कोणती फॅशन लोकं डोक्यावर घेतील हे सांगता येत नाही. सध्या असाच एक ट्रेन्ड एका सलूनने शोधून काढला आहे. सध्या महिलांमध्ये नेल आर्टचं क्रेझ फार वाढत आहे. चेहऱ्यासोबतच आपली नखं सुंदर बनवण्यासाठी महिला नेल आर्टचा पर्याय स्विकारतात. 

सध्या रशियातील एका सलूनमध्ये एक विचित्र ट्रेन्ड सुरू झाला आहे. या सलूनमध्ये नेल आर्ट करताना अॅक्रॅलिकची ट्यूब तयार करून त्यामध्ये जीवंत मुंग्या सोडल्या जातात. ऐकून धक्का बसला ना? या सलूनचं नाव नेल सनी सलून असं आहे. 

नेल सनी सलूनने जीवंत मुंग्या असलेल्या या नेल आर्टच्या डिझाइनचा व्हिडीओ आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर केला आहे. त्यानंतर हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून अनेक लोकं या नेल आर्टवर आपल्या प्रतिक्रिया देत आहेत. एका यूजरने या सलूनला फैलावर घेत, 'ही कोणतीही नेला आर्ट डिजाइन नाही तर हा एक सजीव आहे. हे फार क्रूरपणाचं लक्षण आहे. त्या मुंग्या नखांमध्ये मरून जातील. या यूजरप्रमाणेच अनेकांनी हे आर्ट नसून क्रूरपणाचं लक्षण आहे.' असं म्हटलं आहे. तर काही लोकांनी या सलूनच्या बाजूने बोलत म्हटलं आहे की, 'या मुंग्या आहेत. किटक आणि प्राण्यांमध्ये फार फरक आहे. अनेक लोकं घरामध्ये मुंग्यांना मारून टाकतात.'

यूजर्सच्या प्रतिक्रियांचा भडिमार झाल्यानंतर या सलूनने काही वेळातच मुंग्यांना नखांमधून बाहेर काढतानाचा व्हिडीओ इन्स्टाग्रामवर पोस्ट केला आहे. 

टॅग्स :fashionफॅशनBeauty Tipsब्यूटी टिप्स