शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

RTI दाखल करून मागितला श्रीकृष्ण देव असल्याचा पुरावा 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 3, 2018 08:45 IST

माहितीच्या अधिकारामुळे सरकारी कारभारात पारदर्शकता येऊन सर्वसामान्यांच्या महत्त्वाची माहिती मिळणे सोपे झाले असले तरी त्याचा दुरुपयोग करणाऱ्यांचे प्रमाणही अधिक आहे.

मथुरा - माहितीच्या अधिकारामुळे सरकारी कारभारात पारदर्शकता येऊन सर्वसामान्यांच्या महत्त्वाची माहिती मिळणे सोपे झाले असले तरी त्याचा दुरुपयोग करणाऱ्यांचे प्रमाणही अधिक आहे. असाच प्रकार मथुरा येथे समोर आला आहे. छत्तीसगडमधील एका आरटीआय कार्यकर्त्याने मथुरा येथील जिल्हा प्रशासनाकडे आरटीआय दाखल करून भगवान श्रीकृष्णाचा जन्म, त्याचा गाव, त्याने केलेले चमत्कार आणि त्याच्या देव असण्याबाबतची माहिती आणि पुरावे देण्याची मागणी केली आहे. अशा प्रकारच्या आरटीआयमुळे जिल्हा प्रशासन गोंधळून गेले आहे. या आरटीआयला नेमके काय उत्तर द्यावे, हा प्रश्न त्यांना पडला आहे. छत्तीसगड येथील आरटीआय कार्यकर्ते जैनेंद्र कुमार गेंदले यांनी मथुरा जिल्हा प्रशासनाला आरटीआयच्या माध्यमातून तीन प्रश्न विचारले आहेत. 3 सप्टेंबर रोजी कृष्ण जन्माष्टमीनिमित्त देशभरात सुट्टी दिली गेली होती. त्यामुळे भगवान श्रीकृष्णाच्या जन्म प्रमाणपत्राची प्रमाणित प्रत उपलब्ध करून द्यावी जेणेकरून श्रीकृष्णाचा जन्म त्याच तारखेला झाला हे सिद्ध होईल. तसेच ते खरेच देव होते का? असतील तर ते कोणत्या प्रकारचे देव होते. याबाबत पुरावाही देण्यात यावा, अशी मागणी या आरटीआयमधून करण्यात आली आहे. तसेच श्रीकृष्णाचा गाव कोणता होता? त्यांनी आपल्या जीवनकाळात कोणकोणते चमत्कार केले? यांचीही माहिती देण्याचे मागणी गेंदले यांनी केली आहे. दरम्यान, या विचित्र आरटीआयबाबत एडीएम (कायदा आणि सुव्यवस्था) रमेशचंद्र यांनी सांगितले की, हिंदू धर्माशी संबंधित तमाम ग्रंथ, पुस्तके आणि इतर साहित्यामध्ये श्रीकृष्णाबाबत वर्णन केलेले आहे. आता धार्मिक आस्थेशी संबंधित असलेल्या अशा प्रश्नांना काय उत्तर द्यायचे याबाबत विचार सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले.  

टॅग्स :RTI Activistमाहिती अधिकार कार्यकर्ताHinduहिंदूAdhyatmikआध्यात्मिक