शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! मनोज जरांगे पाटलांना आझाद मैदानावर आंदोलनासाठी परवानगी, अटीशर्तीही घातल्या
2
'डोनाल्ड ट्रम्प यांचा कॉल अन् PM मोदींनी ५ तासात युद्ध थांबवले', राहुल गांधींची बोचरी टीका
3
अभिनेतापासून राजकारणी बनलेल्या थलापती विजय वादात! TVK रॅलीत बाउन्सरने कार्यकर्त्यांना व्यासपीठावरुन खाली फेकले, गुन्हा दाखल, व्हिडीओ व्हायरल
4
"ज्यांनी बिहारींना शिवीगाळ केली, त्यांना..."; भाजपाचा काँग्रेस खासदार राहुल गांधींवर हल्लाबोल
5
गुजरातमध्ये निनावी पक्षांना ₹४३०० कोटींची देणगी..; राहुल गांधींचा निवडणूक आयोगावर हल्लाबोल
6
ग्रीन टी की ब्लॅक टी... वजन कमी करण्यापासून ते हृदयाच्या आरोग्यासाठी, जास्त फायदेशीर काय?
7
५५ वर्षांची आई आणि १७ मुले! हे कुटुंब कसं चालवतंय आपला उदरनिर्वाह?
8
जम्मू-काश्मीरमध्ये जोरदार पाऊस; भारताने पुन्हा दाखवली माणुसकी, पाकिस्तानला दिला मोठा इशारा!
9
"हिंदू राष्ट्र म्हणजे केवळ हिंदू नाही, तर..."; समाजातील दुहीवर मोहन भागवतांचं स्पष्ट भाष्य
10
गोविंदाने पत्नी सुनीतासोबत साजरी केली गणेश चतुर्थी, घटस्फोटांच्या अफवांना लावला पूर्णविराम
11
धक्कादायक! भटक्या कुत्र्यांची दहशत, चावल्यामुळे नववीच्या विद्यार्थ्याचा तडफडून मृत्यू
12
अचानक राजीनामा दिल्यानंतर, काय करतायत जगदीप धनखड? पत्नी वारंवार का जात आहे राजस्थानला?
13
Mobile Ban School: शाळेत मोबाईल वापरण्यावर बंदी; दक्षिण कोरियाने का घेतला निर्णय?
14
Rishi Panchami 2025: ऋषींनी आपल्यासाठी काय केले? हे जाणून घेण्यासाठी 'हा' एक श्लोक पुरेसा आहे!
15
हृदयद्रावक! "भाऊ, सर्वनाश झाला, आपला मुन्नू गेला..."; ढसाढसा रडत मोठ्या भावाला फोन
16
पंजाबमध्ये पुरामुळे कहर, नवोदय विद्यालयात ४०० मुले आणि शाळेतील कर्मचारी अडकले; पालक प्रशासनावर संतापले
17
"यावर्षी तुमच्याशिवाय घर अपूर्ण वाटतंय...", बाप्पाला घरी न आणल्यामुळे भावुक झाली शिल्पा शेट्टी
18
"खू्प कर्ज झालंय..."; सचिन-शिवानीने आधी चार वर्षाच्या मुलाला विष दिलं अन् स्वतःला संपवलं; चिठ्ठीत काय?
19
युतीचा श्रीगणेशा! उद्धव ठाकरे सहकुटुंब राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपतीचं घेतले दर्शन
20
R Ashwin: आर. अश्विन आयपीएलमधून निवृत्त, फक्त विदेशी क्रिकेट लीगमध्ये खेळणार!

Record Clapping: तुम्ही एका मिनिटात किती टाळ्या वाजवू शकता? या तरुणाने बनवला गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 6, 2022 17:14 IST

Faster Clapper: डाल्टन मेयर नावाच्या तरुणाने एका मिनिटात सर्वाधिक टाळ्या वाजवण्याचा गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड केला आहे.

Man Claps 1140 Time In A Minute: आपल्या दैनंदिन जीवनात आपण अनेकवेळा टाळ्या वाजवतो. पण तुम्ही कधी विचार केलाय का की, तुम्ही दिवसभरात किंवा एका मिनिटात किती टाळ्या वाजवू शकता? एका तरुणाने हजाराचा टप्पा ओलांडत गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नाव नोंदवले आहे.

एका मिनिटात 1140 टाळ्याएका तरुणाचा टाळ्या वाजवतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. व्हिडिओ गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डच्या अधिकृत यूट्यूब चॅनेलवर देखील पोस्ट करण्यात आला आहे. या तरुणाने टाळ्या वाजवण्याचा पराक्रम कसा केला हेही यात दिसत आहे. डाल्टन मेयर असे या तरुणाचे नाव असून, तो अमेरिकेचा रहिवासी आहे आहे. या तरुणाने एका मिनिटात तब्बल 1140 टाळ्या वाजवल्या.

मनगट आणि बोटांचा वापरमीडिया रिपोर्ट्सनुसार, डाल्टन मेयरने हा रेकॉर्ड बनवण्यासाठी रिस्ट-क्लॅपिंग तंत्राचा वापर केला. या तंत्रात दुसऱ्या हाताच्या तळव्याला मनगट आणि बोटे वापरून टाळी वाजवावी लागते. या मुलाने मार्चमध्येच हा अनोखा विश्वविक्रम केला होता, ज्याला आता मान्यता मिळाली आहे. या विक्रमाला अधिकृत मान्यता मिळाली असून या विक्रमाचा गिनीज बुकमध्ये समावेश करण्यात आला आहे. याआधी एका मिनिटात सर्वाधिक टाळ्या वाजवण्याचा विक्रम एली बिशपच्या नावावर होता, ज्यांने एका मिनिटात 1103 टाळ्या वाजवल्या होत्या. 

टॅग्स :Jara hatkeजरा हटकेInteresting Factsइंटरेस्टींग फॅक्ट्सInternationalआंतरराष्ट्रीयguinness book of world recordगिनीस बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड