शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
2
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
3
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
4
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
5
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
6
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
7
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
8
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
9
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
10
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
11
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
12
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
13
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
14
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
15
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
16
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
17
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
18
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
19
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
20
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
Daily Top 2Weekly Top 5

बाजारात जायचं असो वा जिम सगळीकडेच लग्नाचा ड्रेस घालून जाते 'ही' महिला, पण का?

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 2, 2019 12:30 IST

प्रत्येकालाच लग्न नेहमी लक्षात राहील असंच करायचं असतं. भारतात तर लग्नावर भरभरून खर्च केला जातो. भारतीय लग्नात सर्वात जास्त खर्च हा नवरी-नवरदेवाच्या लग्नातील कपड्यांवर होतो.

प्रत्येकालाच लग्न नेहमी लक्षात राहील असंच करायचं असतं. भारतात तर लग्नावर भरभरून खर्च केला जातो. भारतीय लग्नात सर्वात जास्त खर्च हा नवरी-नवरदेवाच्या लग्नातील कपड्यांवर होतो. हे त्यांना माहीत असतं की, ते लग्नात घातलेले कपडे पुन्हा कधीही घालणार नाही तरिही. पण टॅमी हॉल याबाबत वेगळा विचार करते. ती तिच्या लग्नातील ड्रेसचा पूर्ण पैसा वसूल करत आहे. ती सुपरमार्केटपासून ते  जिमपर्यंत सगळीकडे तिचा वेडिंग ड्रेस घालून जाते. तेही दिमाखात.

ती असं का करतीये?

दक्षिण ऑस्ट्रेलियात राहणारी टॅमी ४३ वर्षांची आहे. तिने गेल्यावर्षी ऑक्टोबरमध्ये ऑर्केस्ट्रा मॅनेजर कॅरन फ्रॉस्टसोबत समलैंगिक विवाह केला. टॅमीने तिच्या लग्नासाठी ९८५ पाउंडचा व्हाइट ड्रेस खरेदी केला होता. भारतीय करन्सीनुसार ही किंमत ८६००० रूपये इतकी होते. 'द सन' सोबत बोलताना टॅमी सांगते की, 'एका ड्रेसवर इतका खर्च केल्यानंतर हा ड्रेस एकदाच घालणं, हे जरा अजब आहे. मी तर त्या कपड्यांवर खर्च केलेल्या किंमतीवर न्याय करत आहे'.

टॅमी सांगते की, 'मला हे माहीत आहे की, मी जेव्हा हा ड्रेस घालून बाहेर पडते, तेव्हा लोक मला कसे बघतात. पण मी माझ्या मनाचं ऐकते. मी भारतात फिरायला गेली होती. त्यानंतर मला जाणवलं की, आपण एक समाजाच्या रूपात किती उपभोग करतो. नंतर मी स्वत:शीच ठरवलं की, मी एक वर्ष कपडे किंवा शूज घेणार नाही'.

टॅमीसाठी स्वत:सोबत केलेलं प्रॉमिस निभावणं सोपं होतं. पण यादरम्यान तिचं लग्न ठरलं. ती तिचं प्रॉमिस तोडणार होती. पण तिने विचार केला की, इतके पैसे खर्च करूनही ती केवळ काही तासांसाठीच हा ड्रेस घालणार. ही बाब तिला आवडली नाही. टॅमीने तेव्हाच ठरवलं की, ती हा ड्रेस लग्नात एकदाच नाही तर त्यानंतर पुन्हा पुन्हा वापरेल. आता ती तेच करत आहे. 

टॅग्स :Jara hatkeजरा हटकेSocial Viralसोशल व्हायरल