शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
2
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
3
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामनंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
4
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
5
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
6
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
7
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
8
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
9
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
10
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
11
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
12
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
13
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
14
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
15
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
16
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
17
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
18
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
19
Amravati Accident: कॅन्टीनला चहासाठी जाण्याच्या सवयीने चार युवकांचा घात; नागपूर-अकोला महामार्गावर ट्रकने कारला उडवले
20
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
Daily Top 2Weekly Top 5

Raksha Bandhan 2020: इको फ्रेंडली 'कोरोना राखी' सुपरहिट; ग्राहकांकडून मोठी मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 3, 2020 16:57 IST

Raksha Bandhan 2020: नव्या संकल्पनेला ग्राहकांचा उत्तम प्रतिसाद; कोरोना राखीला मोठी मागणी

हैदराबाद: देशभरात रक्षाबंधनाचा सण साजरा होत आहे. मात्र कोरोना संकटामुळे रक्षाबंधनावेळी असणारा असलेला उत्साह दिसत नाही. त्यामुळे यंदा राख्यांना फारशी मागणी आहे. मात्र तेलंगणामधल्या एका दुकानात विकली जाणारी कोरोना राखी सध्या परिसरात चर्चेचा विषय ठरत आहे. ही राखी पर्यावरणपूरक असून ती शेणापासून तयार करण्यात आली आहे.कोरोना संकटाचा मोठा फटका रक्षाबंधनाला बसला आहे. मात्र या परिस्थितीतही काहींनी कल्पना लढवत नवे मार्ग शोधले आहेत. तेलंगणात आकाश नावाची व्यक्ती कोरोना राखी विकत आहे. 'यावर्षी कोरोनामुळे विक्रीवर परिणाम झाला आहे. त्यामुळे राखी विकल्या जाव्यात यासाठी मी काहीतरी नवीन करण्याचं ठरवलं. यावर्षी मी गायीच्या शेणापासून तयाप केलेल्या कोरोना राख्या विकत आहे. काही लोकांनी त्या खरेदी केल्या आणि त्या त्यांना आवडल्या,' असं आकाश यांनी सांगितलं. काही जण सण लक्षात घेऊन व्यवसाय करतात. मात्र कोरोनामुळे व्यवसायावर प्रतिकूल परिणाम झाला आहे. 'मी तयार केलेल्या राख्या विकल्या जातील का, याबद्दल साशंकता होती. मात्र त्यांची विक्री होणं अत्यंत गरजेचं होतं. अन्यथा मोठं नुकसान झालं असतं. राख्यांच्या विक्रीसाठी आणखी वर्षभर वाट पाहावी लागली असती,' अशा शब्दांत आकाश यांनी व्यवसायातील समस्या बोलून दाखवली.कोरोनामुळे यंदा रक्षाबंधन दरवर्षीप्रमाणे साजरं होताना दिसत नाही. खबरदारीचा उपाय म्हणून अनेक जण बाहेर पडलेले नाहीत. अनेकांनी रक्षाबंधन साजरं करणं नाईलाजास्तव टाळलं आहे. त्याचा फटका राखी उत्पादकांना आणि विक्रेत्यांना बसला आहे. राख्यांची बाजारपेठ काही हजार कोटींची आहे. या बाजारपेठेला यंदा कोरोनामुळे फटका बसला आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याRaksha Bandhanरक्षाबंधन