शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
4
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
5
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
6
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
7
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
8
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
9
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
10
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
11
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
12
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
13
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
14
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
15
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
16
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
17
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
18
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
19
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
20
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
Daily Top 2Weekly Top 5

अजबच की! मोबाईलवर मैत्री, पहिल्याच भेटीत लग्न अन् १७ दिवसांत घडला भलताच प्रकार

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 29, 2021 16:09 IST

पहिल्यांदा भेटले अन् लग्न केलं; त्यानंतर प्रकरण कोर्टात गेलं

जोधपूर: राजस्थानाच्या जालौर जिल्ह्यात एक अजबर प्रकार घडला आहे. एका तरुण-तरुणीची मोबाईलवरून मैत्री झाली. या मैत्रीचं रुपांतर अवघ्या काही दिवसांत प्रेमात झालं. त्यानंतर त्यांनी पळून जाऊन लग्न केलं. विशेष म्हणजे पहिल्याच भेटीत प्रेमी युगुलानं विवाह केला. लग्नानंतर काही दिवसांतच तरुणी माहेरी गेली. तरुणानं न्यायालयात याचिका दाखल केली. 

तरुणीला तिच्या कुटुंबापासून सोडवण्यात यावं अशी मागणी तरुणानं न्यायालयानं केली. त्यानंतर न्यायालयात तरुणाच्या याचिकेवर सुनावणी सुरू झाली. त्यात तरुणीनं कुटुंबासोबत राहण्याची इच्छा व्यक्त केली. न्यायालयानं तिला आई वडिलांसोबत राहण्यास परवानगी दिली. विशेष म्हणजे हा सगळा घटनाक्रम अवघ्या १७ दिवसांत घडला.

जालोरच्या सायला परिसरात वास्तव्यास असलेल्या जीतराम मालीनं उच्च न्यायालयात त्याच्या पत्नीला माहेरच्यांनी सोडावं यासाठी याचिका दाखल केली. त्यानंतर न्यायालयानं तरुणाच्या पत्नीला न्यायालयात हजर  राहण्यास सांगितलं. न्यायमूर्ती संदीप मेहता आणि न्यायमूर्ती मनोज कुमार यांच्या खंडपीठासमोर पोलिसांनी तरुणीला हजर केलं. त्यावेळी कुटुंबासोबत राहण्याची इच्छा तरुणीनं व्यक्त केली.

'आमची ओळख मोबाईलवर झाली. त्यानंतर मैत्री झाली. मैत्रीचं रुपांतर पुढे प्रेमात झालं. पहिल्याच भेटीत आम्ही लग्न केलं. मात्र आमचं पटणार नाही याची कल्पना मला काही दिवसांतच आली. त्यामुळे मी आई वडिलांसोबत राहण्याचा निर्णय घेतला,' असं तरुणीनं न्यायालयाला सांगितलं. त्यानंतर न्यायालयानं तरुणीला आई वडिलांसोबत राहण्याची परवानगी दिली.