शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

प्रेग्नंट महिलेला टोमणा मारणं बॉसला पडलं महागात; द्यावी लागणार 38 लाखांची नुकसानभरपाई 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 25, 2022 09:38 IST

एका महिलेच्या बॉसने तिला गरोदरपणात खूप टोमणे मारले. यामुळे वैतागलेल्या महिलेने थेट न्यायालयात धाव घेतली.

काही ठिकाणी महिलांना कामाच्या जागीस अनेकदा भेदभावाला सामोरं जावं लागतं. काम करताना अनेक महिलांना मानसिक त्रासही सहन करावा लागतो. अशाच एका प्रकरणात गर्भवती महिलेला काम करताना त्रास देणाऱ्या बॉसला न्यायालयाने लाखो रुपयांचा दंड ठोठावला आहे. ब्रिटनमध्ये एका महिलेच्या बॉसने तिला गरोदरपणात खूप टोमणे मारले. यामुळे वैतागलेल्या महिलेने थेट न्यायालयात धाव घेतली. तिला टोमणे मारल्यामुळे बॉसला तब्बल 38 लाख रुपयांची नुकसानभरपाई द्यावी लागल्याची घटना आता समोर आली आहे. 

चेशायरमधल्या गेलॅटो कॅफेमध्ये ही घटना घडली आहे. तिथे अ‍ॅबी नावाची महिला काम करायची. गरोदरपणाच्या सहाव्या महिन्यात जेव्हा तिला आईस्क्रीम काढण्यासाठी आणि बॉक्स उचलण्यासाठी खाली वाकताना त्रास होऊ लागला, तेव्हा पुरुष कर्मचाऱ्यांनी तिला कामाच्या ठिकाणी टोमणे मारायला सुरुवात केली. याबाबत तिने आपल्या बॉसकडे तक्रार केली असता त्याचे उत्तर ऐकून महिलेला मोठा धक्का बसला.

मिररच्या रिपोर्टनुसार, बेकरी आणि आईस्क्रीमच्या दुकानात काम करणाऱ्या महिलेने खाली वाकून केक उचलण्यास नकार दिला. त्यानंतर सहकारी कर्मचाऱ्याने त्याच्या पत्नीच्या प्रेग्नन्सीचा हवाला देऊन सांगितलं, की त्यानं तिला या स्थितीत काम करू दिलं नसतं. अ‍एबीने याबाबत बॉस फैसल मोहम्मद यांच्याकडे तक्रार केली असता, त्यावर तोडगा काढण्याऐवजी त्याने तिला टोमणे मारले. महिलेचा बॉस म्हणाला, की 'जर ती असं काम करू शकत नसेल, तर तिने दुसरी नोकरी शोधावी. कारण तिला याच कामाचे पैसे मिळतात.' 

कामाच्या ठिकाणी भेदभाव आणि बॉसच्या उत्तरामुळे संतापलेल्या ए‍बीने हे प्रकरण न्यायालयात नेलं. या नोकरीमुळे महिलेच्या बाळाला नुकसान पोहोचण्याचा धोका असल्याचा युक्तिवाद न्यायालयाने मान्य केला. तिच्या कामगिरीच्या जोरावर महिलेला 4 महिन्यांत प्रमोशन मिळालं होतं; पण गर्भवती असल्याने तिच्याशी भेदभाव केला जाऊ लागला. शिवाय तिचा पगारही कमी करून तिला डिमोट करण्यात आलं. हे प्रकरण न्यायालयात पोहोचल्यावर न्यायालयाने कंपनीला एबीला 38 लाख रुपयांहून अधिक नुकसानभरपाई देण्यास सांगितलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.  

टॅग्स :Pregnancyप्रेग्नंसी