शहरं
Join us  
Trending Stories
1
‘जन’ आक्रोश नाही, सत्ता गेली, खुर्ची गेली म्हणून ‘मन’ आक्रोश; CM फडणवीसांचे ठाकरेंना उत्तर
2
"खोलीत बोलवायचे, घाणेरड्या नजरेने बघायचे, रात्री व्हिडीओ..."; IAS अधिकाऱ्याविरोधात महिलांचे गंभीर आरोप 
3
"आपली ही तक्रार मी..."; अभिनेते किशोर कदम यांच्या पोस्टला मुख्यमंत्री फडणवीसांचा 'रिप्लाय'
4
शेअर बाजारात आधी घसरण मग तेजी; 'या' स्टॉक्सनं घसरणीसह सुरू केला व्यवहार
5
भिवंडीत भाजप युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्षासह दोन जणांची धारदार शस्त्राने निर्घृण हत्या; परिसरात तणावाचे वातावरण 
6
आसिम मुनीरनंतर बिलावल भुट्टोंची फडफड; भारताला दिली युद्धाची धमकी! म्हणाले... 
7
“राहुल गांधी म्हणजे फेक नॅरेटीव्हची फॅक्टरीच, फेक न्यूजचे बादशाह”; भाजपाने पुरावेच दिले!
8
अंगारकी चतुर्थीनिमित्त गणपतीपुळेत भाविकांचा महासागर
9
बँका आपल्या मनमर्जीनं मिनिमम अकाऊंट बॅलन्स ठरवू शकतात का? RBI गव्हर्नरांनी सांगितला नियम
10
'उत्पन्नावर आधारित' आरक्षण व्यवस्था असावी; जनहित याचिकेवर विचार करण्यास सुप्रीम कोर्टाने दर्शवली तयारी
11
डॉ. पायल तडवी आत्महत्या प्रकरण: सरकारी वकील प्रदीप घरत यांना खटल्यातून हटवल्याने न्यायालय नाराज
12
Post Office च्या MIS स्कीममध्ये ₹१,००,००० जमा कराल तर महिन्याला किती मिळेल व्याज, पाहा कॅलक्युलेशन
13
दोन मुलांची आई, १३ वर्षांनंतर कमबॅक करणार अभिनेत्री; मराठी बिझनेसमॅनसोबत बांधलेली लग्नगाठ
14
कबुतरांच्या विष्ठेमुळे मुलांना फप्फुसाचे गंभीर आजार; फायब्रोसिसवर औषधेही परिणामकारक ठरत नाहीत
15
आजचे राशीभविष्य : मंगळवार १२ ऑगस्ट २०२५; आज शक्यतो प्रवास टाळावा, अचानक खर्च उदभवण्याची शक्यता
16
पाकिस्तानचे लाड सुरूच! अमेरिकेचा आणखी एक धक्का, 'या' संघटनेवर मारला दहशवादाचा शिक्का
17
दुचाकीला बांधून पत्नीचा मृतदेह नेताना चार पोलिस ठाणी झोपेत होती का? चार मोठी, १५ छोटी गावे ओलांडली, पण...
18
लोकलची प्रवासी वाहतूक क्षमता २५ टक्के वाढणार; सीएसएमटी-खोपोली दरम्यान १५ डब्यांची गाडी धावणार
19
हत्तीचं ॲक्युपंक्चर, बिबट्याचं रूट कॅनल अन् ICU मधील माकड
20
Indian Embassy in Pakistan :'ऑपरेशन सिंदूर'नंतर पाकिस्तान घाबरला! इस्लामाबादमधील भारतीय राजदूतांना पाणी, गॅस पुरवठा थांबवला, वर्तमानपत्रांवरही बंदी

मोदी-वाजपेयी पत्रव्यवहार प्रसिद्धीस ‘पीएमओ’चा नकार

By admin | Updated: March 11, 2015 03:17 IST

गुजरातमध्ये गोध्रा हत्याकांडानंतर २००२ मध्ये झालेल्या दंगलींच्या काळात गुजरातचे तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदी आणि तेव्हाचे पंतप्रधान

नवी दिल्ली : गुजरातमध्ये गोध्रा हत्याकांडानंतर २००२ मध्ये झालेल्या दंगलींच्या काळात गुजरातचे तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदी आणि तेव्हाचे पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्यात झालेला पत्रव्यवहार माहिती अधिकार कायद्यान्वये उघड करण्यास पंतप्रधान कार्यालयाने (पीएमओ) नकार दिला आहे.‘आरटीआय’ कार्यकर्ते सुभाषचंद्र अगरवाल यांनी या पत्रव्यवहाराचा तपशील मागणारा अर्ज १५ महिन्यांपूर्वी केला होता. ‘पीएमओ’मधील जनमाहिती अधिकाऱ्याने त्यावर ३ मार्च रोजी अगरवाल यांना नकाराचे पत्र पाठविले आहे. त्यामुळे अगरवाल यांनी ७ मार्च रोजी ‘पीएमओ’मधील अपिली अधिकाऱ्याकडे अपील दाखल केले आहे. पत्रव्यवहाराची माहिती उघड करण्यास नकार देताना ‘पीएमओ’ने संबंधित त्रयस्थ पक्षांनी (थर्ड पार्टी) घेतलेल्या आक्षेपांची सबब दिली असून हा आक्षेप रास्त असल्याने ‘आरटीआय’ कायद्याच्या कलम ८(१)(एच) अन्वये महिती देता येणार नाही, असे कळविले आहे; मात्र ‘संबंधित त्रयस्थ पक्ष’ म्हणजे नेमके कोण- गुजरात मुख्यमंत्री कार्यालय, वाजपेयी की खुद्द मोदी हे या उत्तरात स्पष्ट करण्यात आलेले नाही.अर्जदारांनी मागितलेली माहिती ‘गोपनीय स्वरूपाची’ आहे व ती उघड केल्याने दंगलींच्या संदर्भात सुरू असलेल्या तपासात व खटल्यांत बाधा येईल, असा आक्षेप त्रयस्थ पक्षांनी घेतल्याचे ‘पीएमओ’ने म्हटले आहे.‘पीएमओ’चे उत्तर पुढे म्हणते की, मुख्यमंत्री हे मंत्री परिषदेचे प्रमुख असल्याने त्यांनी केलेल्या मसलतींचा तपशील उघड न करणे ही कायद्याची व राज्यघटनेची गरज आहे. त्यामुळे अर्जदारांना हवी असलेली माहिती ‘आरटीआय’ अन्वये त्यांना देता येणार नाही, हे त्रयस्थ पक्षांचे म्हणणे रास्त आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क)