शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
4
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
5
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
6
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
7
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
8
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
9
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
10
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
11
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
12
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
13
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
14
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
15
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
16
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
17
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
18
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
19
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
20
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी

पिंपरी चिंचवड ठरतोय सुख-सोयींनी संपन्न शहर

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 11, 2017 13:06 IST

या सर्व्हेत उद्योन्मुख शहरांची निवड करण्यासाठी काही निकषांचा अभ्यास करण्यात आला.

ठळक मुद्देएका गृहप्रकल्प सल्लागार कंपनीने केलेल्या सर्वेक्षणात पिपंरी-चिंचवडला महाराष्ट्रातील सर्वात सुख-सोयीयुक्त शहर असं संबोधण्यात आलंयएका आकडेवारीनुसार, पिंपरी-चिंचवडमध्ये दरडोई १६५ लीटर पाणीपुरवठा करण्यात येतो . याव्यतिरिक्त पिपंरी चिचंवड शहराला मोठे पर्यटन क्षेत्र लाभलं आहे. 

सर्व सुख-सोयींनी समृद्ध असलेल्या शहरांमध्ये पिपंरी चिंचवडची गणना केली गेली आहे. एका गृहप्रकल्प सल्लागार कंपनीने केलेल्या सर्वेक्षणात पिपंरी-चिंचवडला महाराष्ट्रातील सर्वात सुख-सोयीयुक्त शहर असं संबोधण्यात आलंय. पुण्यापासून अगदी काहीच अंतरावर असलेल्या पिपंरी चिंचवडचा विकास तेथील औद्योगिक विकासामुळे झाला असल्याचं काहीजण सांगतात. तसंच पालिकेने आणि राज्य सरकारने अवलंबिलेल्या काही उपक्रमांमुळेदेखील पिपंरी चिचंवड उद्योन्मुख आणि सुख-सोयींनी संपन्न असं शहर बनलं आहे. चला पाहूया या शहरात अश्या कोणत्या सुख-सोयी आहेत.

या सर्व्हेत उद्योन्मुख शहरांची निवड करण्यासाठी काही निकषांचा अभ्यास करण्यात आला. त्यामध्ये शहरांचं नियोजन, दैनंदिन गरजांचे व्यवस्थापन, आरामदायी आणि मनोरजंनाची साधने, तेथील प्रशासन, सुरक्षितता आणि प्रदुषणविरहित पर्यावरण आदी निकष समोर ठेवून महाराष्ट्रातून सर्वोत्कृष्ट शहरांची निवड करण्यात आली आहे. केंद्र सरकारच्या स्मार्ट सिटी योजनेच्या तिसऱ्या फेरीत ३० शहरांची निवड करण्यात आली होती. त्यामध्ये पिपंरी चिंचवडचाही समावेश आहे. सुरुवातीला पुणे आणि पिंपरी चिंचवड या दोन्ही शहरांचा विकास एकत्र करण्यात येणार होता. मात्र दोन्ही शहरं मोठी आहेत आणि दोन्हींच्या पालिकाही वेगळ्या असल्याकारणाने दोघांचाही सर्व्हे वेगवेगळा करण्याचं ठरवण्यात आलं.

स्मार्ट सिटी अंतर्गत माहिती तंत्रज्ञानाचा वापर करून शहरातील सुविधांचे सक्षमीकरण करणे, पाणीपुरवठा वितरण व्यवस्था, पथदिवे, सिग्नल यंत्रणा, घनकचरा व्यवस्थापन, सांडपाणी व्यवस्थापन, पार्किंग आदी विविध पायाभूत सुविधांचा विकास, नागरिकांना चांगल्या क्षमतेच्या पायाभूत सुविधा या सगळ्यांचा विचार करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आलं आहे. त्यातील अनेक सुविधा पालिकेने नागरिकांना पुरवल्या आहेत.क्लिन सिटी म्हणूनही या शहराकडे पाहिलं जातं. शहर स्वच्छ असावे यासाठी पिंपरी चिंचवड पालिकेने अनेक उपाययोजना आखल्या आहेत. त्याअंतर्गत त्यांनी जनजागृती करून घनकचरा व्यवस्थापनाचे धडे नागरिकांना दिले होते. एवढंच नव्हे तर उघड्यावर शौचाला बसणाऱ्यांमध्येही आता घट झाली आहे. जिल्ह्यातील प्रत्येक गावातील प्रत्येक घरात शौचालय असावे यासाठी पालिकेने आणि स्थानिक लोकप्रतिनिधींनी बरेच प्रयत्न केले आहेत.

एवढंच नव्हे तर या शहरात जवळपास ९० टक्के बांधकामे वैध व कायदेशीर असल्याचे सर्व्हेमध्ये म्हटलं गेलंय. या शहरात अनेक देशी-विदेशी कंपन्या आहेत. तसंच अपारंपारिक ऊर्जेच्या निर्मितीवरही भर देण्यात आला आहे. एका आकडेवारीनुसार, पिंपरी-चिंचवडमध्ये दरडोई १६५ लीटर पाणीपुरवठा करण्यात येतो . लहान मुलांच्या मनोरंजनासाठी १६४ विकसित उद्यानं येथे तयार आहेत. तर जवळपास २२ लाखांहून अधिक वृक्षांची नोंद या शहरात करण्यात आली आहे. सर्वात महत्वाचं म्हणजे मेट्रो प्रकल्पाचेही काम या शहरात सुरू असून लवकरच पिंपरी चिंचवडकरांना मेट्रोची सफर करता येणार आहे. याव्यतिरिक्त पिपंरी चिचंवड शहराला मोठे पर्यटन क्षेत्र लाभलं आहे. अशा विविध पैलूंचा अभ्यास करूनच पिंपरी चिंचवडला सुख-सोयींनी संपन्न असे शहर म्हटलं गेलं आहे.