शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
4
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
5
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
6
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
7
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
8
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
9
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
10
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
11
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
12
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
13
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
14
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
15
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
16
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
17
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
18
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
19
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
20
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
Daily Top 2Weekly Top 5

VIDEO: चांद नवाबचा भाऊ आला रे! पाकिस्तानी पत्रकाराचं चक्क गाढवावर बसून रिपोर्टिंग

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 20, 2018 19:51 IST

पाकिस्तानी पत्रकाराच्या व्हिडीओची सोशल मीडियावर चर्चा

नवी दिल्ली: कराची से लोग अंदरुने मुल्क ईद मनाने जा रहे है, असं म्हणणारा पाकिस्तानमधला रिपोर्टर चांद नवाब तुम्हाला नक्की आठवत असेल. एक वाक्य म्हणताना असंख्य टेक घेणाऱ्या चांद नवाबनं यूट्यूबसह सोशल मीडियावर धुमाकूळ घातला. यानंतर आता पाकिस्तानमधील आणखी एका रिपोर्टरचा व्हिडीओ सोशल मीडियावर वायरल झाला आहे. विशेष म्हणजे या पत्रकारानं चक्क गाढवावर बसून रिपोर्टिंग केलं आहे. लाहोरमध्ये रिपोर्टिंग करणाऱ्या अमीन हाफिज यांचा व्हिडीओ सध्या तुफान वायरल झाला आहे. गाढवावर बसून रिपोर्टिंग करणारे हाफिज यादरम्यान खालीदेखील पडले. पाकिस्तानमधले प्रसिद्ध पत्रकार हामिद मीर यांनी हा गमतीशीर व्हिडीओ ट्विटरवर शेअर केला आहे. सध्या या व्हिडीओची सोशल मीडियावर जोरदार चर्चा आहे. पाकिस्तानमधल्या जिओ न्यूज या वृत्तवाहिनीनं गाढवांच्या वाढत्या संख्येवर एक विशेष वृत्तांत तयार केला. पंजाब लाईवस्टॉक विभागाच्या आकडेवारीनुसार एकट्या लाहोरमध्ये 41 हजारहून अधिक गाढवं आहेत. पाकिस्तान गाढवांच्या संख्येत जगात तिसऱ्या क्रमांकावर पोहोचला आहे. गाढवांना साथीचे रोग होऊ नयेत म्हणून शहरात त्यांच्यासाठी स्वतंत्र रुग्णालयं तयार करण्यात आली आहेत. या ठिकाणी पशू वैद्य आजारी गाढवांवर उपचार करतात. सोबतच ठणठणीत असणाऱ्या गाढवांची प्रकृती कायम उत्तम राहावी, यासाठी त्यांना औषधंसुद्धा देतात. विशेष म्हणजे ही सुविधा मोफत उपलब्ध आहे. पाकिस्तानातील गाढवांची किंमत सरासरी 35 ते 55 हजार रुपये इतकी आहे. एका गाढवापासून मालक दिवसाला सरासरी हजार रुपये कमावतो. याशिवाय गाढव विकल्यावरही चांगली रक्कम हाती येते. विशेष म्हणजे गाढव वयाच्या अवघ्या चौथ्या वर्षापासून त्याच्या मालकाला कमाई करुन देतं. 

टॅग्स :Pakistanपाकिस्तानJournalistपत्रकार