शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीतील स्फोटाचं पुलवामा कनेक्शन समोर, सलमानने काश्मीरमधील तारिकला विकली होती ती कार
2
बिहारमध्ये दुसऱ्या टप्प्यासाठी आज मतदान, २० जिल्हे, १२२ मतदारसंघ, ३.७ कोटींवर मतदार
3
दिल्लीतील स्फोट हा आत्मघाती हल्ला? समोर येतेय अशी माहिती, पोलिसांकडून गुन्हा दाखल
4
ना स्फोटाच्या ठिकाणी खड्डा, ना मृतांच्या शरीरात सापडले तारा आणि खिळे, या कारणांनी गुढ वाढवलं
5
दिल्लीत लाल किल्ला मेट्रो स्टेशनजवळ झालेल्या स्फोटातील जखमी आणि मृतांची यादी समोर
6
देशातील ७०% कैदी अजूनही दोषी नाहीत, केवळ ८% जणांनाच मिळाली कायदेशीर मदत
7
व्हिडीओत संपादनात चूक, दिशाभूल केल्याचा ठपका, बीबीसीचे प्रमुख संचालक, वृत्त प्रमुखांचा राजीनामा
8
पासवर्ड बदला, अन्यथा डल्ला, ७६ लाख लोकांचा आहे एकच पासवर्ड; पासवर्ड चोरल्यास बसू शकतो फटका
9
निवड समितीसोबतचा पंगा मोहम्मद शमीला भोवणार? कसोटी संघातील पुनरागमन अनिश्चित काळ लांबणीवर जाण्याची शक्यता
10
कंपनीला कर्मचाऱ्यांनीच घातला दीड कोटीचा गंडा, बनावट कॅश व्हाऊचरची छपाई, अतिरिक्त पगार
11
लाल किल्ल्याजवळ कारचा भीषण स्फोट, ८ ठार; 'प्रत्येक अँगलने तपास करा', गृहमंत्री अमित शाह यांचे तातडीचे आदेश!
12
दिल्लीतील ‘ब्लास्ट’, मागील पाच वर्षांतील केरळनंतरचा ठरला सर्वात मोठा स्फोट
13
लाल किल्ल्याजवळ स्फोट, दुर्घटनेनंतर देश हादरला! राहुल गांधी ते शरद पवार... कोण काय म्हणाले?
14
लाल किल्याजवळील स्फोटाने देश हादरला; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा अमित शाह यांना फोन, पोस्ट करत म्हणाले-
15
Red Fort Blast Video: अनेकांच्या उडाल्या चिंधड्या! स्फोटानंतरची दृश्ये बघून होईल थरकाप, नेमकी कुठे घडली घटना?
16
Prem Chopra : दिग्गज अभिनेते प्रेम चोप्रा यांच्या प्रकृतीत सुधारणा; लीलावती रुग्णालयात दाखल
17
Red Fort Blast:  कार हळूहळू सिग्नलजवळ येऊन थांबली अन् झाला स्फोट; पोलीस आयुक्तांनी सांगितली घटना
18
लाल किल्ल्याजवळील स्फोटानंतर महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेशमध्ये हाय अलर्ट! तपास यंत्रणा सतर्क
19
Delhi Red Fort Blast: मोठी बातमी! दिल्लीत लाल किल्ल्याजवळ भीषण स्फोट, 8 जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
20
अभिनेते धर्मेंद्र व्हेंटिलेटरवर? आयसीयूत सुरु आहेत उपचार; टीमने दिली हेल्थ अपडेट, म्हणाले...

८ महिन्यात मृत्यू होईल..; हे ऐकल्यावर युवकानं 'असं' काही केलं, ज्यानं डॉक्टरही हैराण झाले

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 4, 2022 08:33 IST

सुरुवातीला मला डोकेदुखी होत होती. विशेष म्हणजे मी जेव्हा काम करायचो तेव्हा शरीरात वेदना जाणवायच्या.  पाब्लोनं त्याकडे दुर्लक्ष केले.

एखाद्याला कॅन्सर आहे आणि तो जास्तीत जास्त ६ ते ८ महिने जगू शकतो असं डॉक्टरांनी सांगितलं तर त्या व्यक्तीची अवस्था काय असेल हे सांगता येणं कठीण आहे. कॅन्सरच्या शेवटच्या स्टेजला असेल तर मृत्यू अटळ असल्याचं बोललं जातं. परंतु एका व्यक्तीनं डाइट प्लॅनमध्ये बदल करून चक्क मृत्यूला चकवा दिला आहे. त्याला कॅन्सर झाला होता. त्याच्या आजारावर आता उपचार नाहीत असं डॉक्टरांनी हतबल होऊन सांगितले. त्याचसोबत तो ६ ते ८ महिने जगेल असं म्हटलं. मात्र आज ८ वर्ष झाल्यानंतरही तो जिवंत आहे.

या व्यक्तीचं नाव पाब्लो केली(Pablo Kelly) असं आहे. तो इंग्लंडचा रहिवासी आहे. पाब्लो कॅन्सर पीडित होता. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार त्याच्यावर किमोथेरेपी सुरू होती. परंतु त्याने ते न ऐकता स्पेशल किटो डाइट निवडला. किटो डाइट प्लॅनमुळे त्याच्या आरोग्यात सुधारणा झाल्याचा दावा पाब्लोनं केला. माझी सध्याची प्रकृती पाहून डॉक्टरही हैराण आहेत. हे चमत्कारापेक्षा कमी नाही. तू खूप भाग्यवान आहेस असं डॉक्टर पाब्लोला म्हणाले. तसेच किमोथेरेपी आणि रेडियोथेरपी करण्याचा सल्लाही डॉक्टर देतात.

पाब्लोनं सांगितले की, सुरुवातीला मला डोकेदुखी होत होती. विशेष म्हणजे मी जेव्हा काम करायचो तेव्हा शरीरात वेदना जाणवायच्या.  पाब्लोनं त्याकडे दुर्लक्ष केले. परंतु जेव्हा प्रकृतीमुळे कामात अडथळा येऊ लागला तेव्हा वास्तव्यात काहीतरी भयंकर असल्याचं समोर आलं. जेव्हा डायग्नोसिस केले तेव्हा कॅन्सर असल्याचं कळालं. कॅन्सर रिपोर्ट आल्यानंतर लवकरात लवकर रेडियोलॉजीच्या माध्यमातून उपचार करण्याचा सल्ला दिला. रेडियोलॉजी उपचार सुरू झाल्यावर माझी दाढी आणि डोक्यावरील केस काढले.त्यानंतर ऑन्कोलॉजिस्टसोबत बोलल्यानंतर त्यांनी सांगितले जरी उपचार झाले तरी १२-१३ महिने जीवित राहू शकतो आणि उपचार नाही केले तर ६-८ महिन्यात मृत्यू होण्याची शक्यता आहे. ही २०१४ ची घटना आहे.

परंतु पाब्लोनं दुसरा मार्ग निवडला. त्याने जेवणात बदल केला. कार्बोहाइड्रेट नसणारे जेवण खाल्लं. त्यामुळे त्याच्या ट्यूमरचा आकार छोटा झाला. तेव्हा डॉक्टरांना सर्जरी करून ट्यूमर काढणं शक्य झालं. २०१७ मध्ये पहिली सर्जरी झाली होती. आजही ते टर्मिनल ब्रेन कॅन्सरनं पीडित आहेत. परंतु आता ते इतर कॅन्सर पीडितांना जगण्यासाठी प्रेरणा देत असतात. अलीकडच्या काळात किटो डाइट प्लॅन फिटनेस इन्फुएंसर्सने लोकप्रिय केला आहे. त्यामुळे वजन कमी होतं असा दावा केला जात आहे. परंतु कॅन्सरच्या उपचारासाठी किटो डाइटची शिफारस डॉक्टर करत नाहीत.

(टीप-कुठल्याही वैद्यकीय कारणासाठी डॉक्टरांचा सल्ला घेणं आवश्यक आहे)