शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
5
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
6
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
7
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
8
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
9
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
10
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
11
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
12
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
13
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
14
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
15
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
16
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
17
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
18
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
19
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

पोटातून सोन्याच्या बिस्किटांची तस्करी करताना एकाला अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 4, 2017 15:34 IST

सोन्याची बिस्किटे घेऊन एवढ्या लांबून प्रवास करूनही तो प्रवासी अगदी व्यवस्थित होता. त्यामुळे त्याला हॉस्पिटलमध्ये एक्स-रे काढण्यासाठी रवाना करण्यात आले.

ठळक मुद्देश्रीलंकन एअरवेजने प्रवास करणाऱ्या एका प्रवाशाला रविवारी सकाळी विशाखापट्टणम येथील विझाग विमानतळावर पकडण्यात आले.सुरक्षा रक्षक आणि कस्टम्स कर्मचाऱ्यांनी त्याची झडती घेतली तरी त्यांना काहीच सापडले नाही. शेवटी त्यानेच सोन्याची बिस्किटे गिळली असल्याचे कबुल केले. पोटाच्या आतून कोणत्याही प्रकारची तस्करी केल्याचा हा प्रकार भारतात पहिल्यांदाच झाल्याने सगळ्यांच्याच भुवया उंचावल्या आहेत. 

लोकं वस्तूंच्या तस्करीसाठी वेगवेगळ्या युक्त्या आजमावतात. त्यातही परदेशातून भारतात एखाद्या वस्तूची तस्करी करण्यासाठी वेगवेगळ्या शक्कली लढवल्या जातात. पण एका श्रीलंकन व्यक्तीने चक्क पोटातून सोन्याच्या बिस्किटांची तस्करी केल्याचे नुकतेच उघड झाले आहे. श्रीलंकन एअरवेजने प्रवास करणाऱ्या एका प्रवाशाला रविवारी सकाळी विशाखापट्टणम येथील विझाग विमानतळावर पकडण्यात आले. त्याने त्याच्या पोटातून तब्बल १४ सोन्याची बिस्किटं लपवून तस्कर करत होता. त्याच्या विचित्र पद्धतीने चालण्यावरून सुरक्षा रक्षक आणि कस्टम्स अधिकाऱ्यांना त्याच्यावर संशय आला.

एका वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, त्या प्रवाश्याचे वागणे पाहून तेथील सुरक्षा रक्षकांना संशय आला. शिवाय तो ग्रीन कस्टम्स चॅनेलच्या दिशेने घाईघाईत जाताना दिसला. कस्टम्स ऑफिसमध्ये जाण्यासाठी त्याच्याकडे कोणत्याही प्रकारचे सामान नव्हते, त्यामुळे तेथील रक्षकांचा संशय आणखी बळावला. सुरक्षा रक्षक आणि कस्टम्स कर्मचाऱ्यांनी त्याची झडती घेतली तरी त्यांना काहीच सापडले नाही. शेवटी त्यानेच सोन्याची बिस्किटे गिळली असल्याचे कबुल केले. 

त्याच्या या जबाबानंतर सगळेच आश्चर्यचकित झाले. सोन्याची बिस्किटे घेऊन एवढ्या  लांबून प्रवास करूनही तो प्रवासी अगदी व्यवस्थित होता. त्यामुळे त्याला विझाग येथील किंग-जॉर्ज हॉस्पिटलमध्ये एक्स-रे काढण्यासाठी रवाना करण्यात आले. एक्स-रेच्या रिपोर्टसमध्ये त्याच्या पोटात सोन्याची बिस्किटे असल्याचे स्पष्ट झाले. विशेष म्हणजे कोणत्याही शस्त्रक्रियेशिवाय डॉक्टरांनी त्याच्या पोटातील सोन्याची बिस्किटे बाहेर काढली. डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, त्या प्रवाशाने आधी ७ बिस्किटे आणि नंतर ७ बिस्किटे खाल्ली होती. या प्रवाशाची तब्येत आता व्यवस्थित असून पुढील चौकशीकरता कस्टम्स अधिकाऱ्यांना सुपूर्द करण्यात येणार आहे. पोटाच्या आतून कोणत्याही प्रकारची तस्करी केल्याचा हा प्रकार भारतात पहिल्यांदाच झाल्याने सगळ्यांच्याच भुवया उंचावल्या आहेत. 

सर्व प्रतिमा - ANI