शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
4
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
5
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
6
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
7
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
8
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
9
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
10
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
11
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
12
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
13
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
14
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
15
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
16
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
17
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
18
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
19
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
20
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
Daily Top 2Weekly Top 5

बापरे! या देशात स्वतःच्या मर्जीने टीव्ही पाहिला तरी मिळते फाशी; 'हे' नियम ऐकून अंगावर येईल काटा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 21, 2026 12:46 IST

जगात एक असाही देश आहे जिथे लोक स्वतःच्या मर्जीने टीव्ही चॅनेल बदलू शकत नाहीत.

आपल्याला घरी बसून टीव्हीवर हवं ते चॅनेल पाहण्याचं स्वातंत्र्य असतं. पण जगात एक असाही देश आहे जिथे लोक स्वतःच्या मर्जीने टीव्ही चॅनेल बदलू शकत नाहीत. हा देश म्हणजे हुकूमशहा किम जोंग उनचा 'उत्तर कोरिया'. या देशात नागरिक काय पाहतील, काय ऐकतील आणि जगाकडे कोणत्या नजरेने बघतील, हे सर्व तिथले सरकार ठरवते. माहितीवर ताबा मिळवण्यासाठी उत्तर कोरियाने टेलिव्हिजनवर लावलेले निर्बंध अत्यंत थरकाप उडवणारे आहेत.

'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' कोण?... क्लिक करून आपलं मत नोंदवा!

टीव्ही खरेदी केल्यावर आधी होतं रजिस्ट्रेशन

उत्तर कोरियात जेव्हा एखादा नागरिक टीव्ही खरेदी करतो, तेव्हा त्याला तो स्थानिक प्रशासनाकडे रजिस्टर करावा लागतो. सरकारी अधिकारी या टीव्ही सेटची तपासणी करतात आणि त्यातील चॅनेलच्या फ्रिक्वेन्सीला 'फिजिकल लॉक' लावतात. एवढ्यावरच न थांबता टीव्हीवर एक अधिकृत सरकारी स्टिकर किंवा सील लावले जाते. या प्रक्रियेमुळे त्या टीव्हीवर फक्त आणि फक्त सरकारी चॅनेलच दिसतात.

केवळ ४ चॅनेल आणि सरकारचीच स्तुती

या देशात सामान्यतः फक्त १ ते ४ सरकारी चॅनेल उपलब्ध असतात. यामध्ये 'कोरियन सेंट्रल टेलिव्हिजन' हे मुख्य चॅनेल आहे. या चॅनेलवर दिवसभर देशाच्या नेत्यांची स्तुती, सैन्याची कामगिरी आणि समाजवादी मूल्यांचा प्रचार केला जातो. जगातील बातम्या किंवा मनोरंजन चॅनेल पाहण्याचा तिथे कोणताही कायदेशीर मार्ग उपलब्ध नाही. नागरिकांना बाह्य जगापासून पूर्णपणे तोडून ठेवण्यासाठी हा खेळ रचला गेला आहे.

विदेशी चित्रपट पाहिला तर मरण अटळ!

जर कोणी चोरून विदेशी चित्रपट, विशेषतः दक्षिण कोरियाचे चित्रपट किंवा हॉलिवूड सिनेमे पाहताना आढळले, तर त्याला अत्यंत कठोर शिक्षा दिली जाते. तिथल्या 'रिएक्शनरी आयडॉलॉजी ॲन्ड कल्चरल रिजेक्शन' कायद्यानुसार, बंदी असलेले कंटेंट पाहणे किंवा ते इतरांना शेअर करणे हा मोठा गुन्हा मानला जातो. यासाठी अनेक वर्षे सक्त मजुरी किंवा अगदी मृत्यूदंडाची शिक्षाही सुनावली जाऊ शकते.

घराची कधीही होऊ शकते झडती

सरकारचे एजंट कधीही कुणाच्याही घरी जाऊन टीव्ही सेटची तपासणी करू शकतात. टीव्हीच्या लॉकशी छेडछाड झाली आहे का, हे तपासले जाते. जर सील तुटलेले आढळले, तर त्या कुटुंबावर मोठी कारवाई केली जाते. केवळ टीव्हीच नाही, तर रेडिओ आणि इंटरनेटवरही अशाच प्रकारचे कडक निर्बंध लावून उत्तर कोरियाने आपल्या देशाला जगासाठी एक बंदिस्त तुरुंग बनवले आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : North Korea: Watching unauthorized TV can lead to execution!

Web Summary : In North Korea, television access is strictly controlled. Citizens must register TVs, which are then locked to government channels. Watching foreign content can result in severe penalties, including death. Surprise home inspections ensure compliance with these draconian media restrictions.
टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलnorth koreaउत्तर कोरिया