शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

या हुकूमशहाने वडील आणि आजोबांचा मृतदेह आजही ठेवला आहे सुरक्षित!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 9, 2019 15:15 IST

उत्तर कोरियाचा हुकूमशहा किम जोंग हे नेहमीच चर्चेत असतात. त्यामुळे सर्वांनाच माहीत आहेत. त्यांच्या देशातील नियमांमुळे ते नेहमीच चर्चेत असतात.

उत्तर कोरियाचा हुकूमशहा किम जोंग हे नेहमीच चर्चेत असतात. त्यामुळे सर्वांनाच माहीत आहेत. त्यांच्या देशातील नियमांमुळे ते नेहमीच चर्चेत असतात. कितीतरी कठोर नियम तुम्हाला चांगलेच माहीत असतील. पण तुम्हाला हे वाचूनही आश्चर्य वाटेल की, किम जोंग यांनी त्यांचे आजोबा आणि वडिलांचे मृतदेह अजूनही सुरक्षित ठेवले आहेत. 

मीडिया रिपोर्ट्सनुसार, किम जोंग यांचे वडील किम जोंग इल आणि आजोबा किम जोंग इल सुंग यांचे पार्थिवं कुमसुसन मेमोरिअल पॅलेसमध्ये सांभाळून ठेवण्यात आले आहेत. हा पॅलेस या दोघांच्या पार्थिवांसाठी खासकरून तयार करण्यात आला होता. इथे असा रिवाज आहे की, कुमसुसन पॅलेसच्या जवळ जाणाऱ्या लोकांना या पार्थिवांसमोर तीनदा वाकून नमन करावं लागतं. 

कुमसुसन मेमोरिअल पॅलेसच्या सुरक्षेसाठी दिवसरात्र जवान तैनात असतात. तर या पॅलेसमध्ये ठेवण्यात आलेल्या किम जोंग यांच्या वडिलांच्या आणि आजोबांच्या पार्थिवांची देखरेख रशियातील लेनिन लॅब करते. लेनिन लॅबच्या वैज्ञानिकांच्या टीमने या नेत्यांच्या पार्थिवांना संरक्षित केलं आहे. याच लॅबच्या वैज्ञानिकांनी १९२४ मध्ये रशियाचे नेते व्लादिमीर लेनिन यांच्या पार्थिवाची एम्बामिंग केली होती.

एम्बामिंगच्या माध्यमातून मृत शरीरांना लवचिक आणि त्वचा तरूण ठेवता येते. पार्थिवांची एम्बामिंग करण्यात अनेक महिन्यांचा कालावधी लागतो. याच प्रक्रियेच्या माध्यमातून किम जोंग यांच्या वडिलांचे आणि आजोबांचे मृत शरीर सुरक्षित केले आहेत.

किम जोंग यांच्या वडिलांच्या आणि आजोबांच्या शरीराची एम्बामिंग दर दोन वर्षांनी केली जाते. २०१६ मध्ये मॉस्कोमध्ये रिलीज करण्यात आलेल्या एका रिपोर्टनुसार, या नेत्यांच्या शवांना पहिल्यांदा एम्बामिंग करण्यासाठी साधारण २ लाख डॉलर म्हणजेच १ कोटी ४१ लाख रूपये खर्च आला होता. 

टॅग्स :Kim Jong Unकिम जोंग उनSouth Koreaदक्षिण कोरिया