शहरं
Join us  
Trending Stories
1
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
2
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
3
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
4
बेडरुम व्हिडीओ, २०२० चं 'ते' सीक्रेट अफेअर... प्रियंकाच्या क्राईम फाईलबाबत खळबळजनक खुलासा
5
होर्मुझमध्ये अमेरिकेचा 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
6
"...तेव्हा मी जगाचा निरोप घ्यावा!"; आशा भोसलेंची शेवटची इच्छा ऐकून चाहत्यांचे डोळे पाणावले
7
लहानशा देशात इराणनं लपवलाय 'खजिना'; इथूनच चालतो ड्रोन-मिसाइलचा खेळ, अमेरिकेलाही देतात चकवा
8
Raj Thackeray : "आशाताई'-दि लास्ट एम्परर, आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर वादळं पहिली, तरीही..."; राज ठाकरेंची भावुक पोस्ट
9
TCS ची मोठी घोषणा! यावर्षी २५ हजार फ्रेशर्सना देणार नोकरी; युवा टॅलेंटवर कंपनीचा फोकस
10
ना हृदय... ना मेंदू! तरीही समुद्राच्या अथांग गर्तेत राज्य करतो 'हा' जीव; नेमकं गुपित काय?
11
GT विरुद्धही भावाला प्लेइंग इलेव्हनमध्ये मिळाली नाही जागा; तरी LSG ला सपोर्ट करताना दिसली सारा तेंडुलकर
12
"मदरशांसाठी 600 कोटींचं बजेट पण विकासासाठी निधी नाही...!" प. बंगालच्या रॅलीतून पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल
13
बंद घराची कौले काढून चोरी; दहा तोळे सोने व १७ हजारांची रोकड लंपास!
14
Payal Nag : नियतीला झुकवणाऱ्या पायलची सुवर्णगाथा! अपघातात हात-पाय गमावले, तिरंदाजीतून जग जिंकले
15
LSG vs GT : पंतसमोर पहिला डाव जिंकला; गिलचा आनंद गगनात मावेना! 'तो' व्हिडिओ व्हायरल
16
युद्धविराम रद्द झाला तर जगावर मोठे संकट येणार; जागतिक बँकेचे प्रमुख अजय बंगा यांचा इशारा
17
सोशल मीडियाचा अतिवापर आणि अश्लील कंटेंटला बसणार लगाम! इन्स्टाग्रामने आणले नवीन 'टीन रूल्स'
18
“मंगेशकर कुटुंबातील ईश्वरीय आवाज लाभलेला तारा निखळला”; CM फडणवीसांकडून आशाताईंना श्रद्धांजली
19
US-इराणमधील चर्चा फिस्कटली, पुन्हा युद्धाचे ढग; भारत अलर्ट मोडवर, 'स्पेशल ऑपरेशन' लॉन्च
20
अमेरिका-इराण चर्चा निष्फळ! पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया आली समोर; परराष्ट्र मंत्री इशाक डार म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

ना हृदय... ना मेंदू! तरीही समुद्राच्या अथांग गर्तेत राज्य करतो 'हा' जीव; नेमकं गुपित काय?

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 12, 2026 16:30 IST

मेंदू आणि हृदय नसूनही हा जीव समुद्रात कसा जिवंत राहतो?

निसर्गाच्या अथांग पसाऱ्यात असे अनेक जीव आहेत, ज्यांची रचना मानवी कल्पनेच्या पलीकडे आहे. सहसा कोणत्याही जीवाला जिवंत राहण्यासाठी हृदय आणि मेंदू या दोन गोष्टी अत्यंत आवश्यक असतात. मात्र, समुद्राच्या खोल निळ्या पाण्यात एक असा जीव राहतो, ज्याच्याकडे ना हृदय आहे, ना मेंदू! तरीही हा जीव अत्यंत सक्रियपणे आपले जीवन जगतो. आपण बोलत आहोत समुद्रातील सर्वात सुंदर आणि तितक्याच गूढ अशा 'स्टारफिश'बद्दल...

मेंदूशिवाय कसं चालतं शरीर?

स्टारफिशकडे आपल्यासारखा मेंदू नसला तरी, निसर्गाने त्याला एक खास 'नर्व्ह रिंग' दिली आहे. ही रिंग त्याच्या तोंडाच्या भोवती असते आणि तीच त्याच्या संपूर्ण शरीराचे नियंत्रण करते. त्याच्या प्रत्येक हातामध्ये विशेष नसा पसरलेल्या असतात, ज्याला 'रेडियल नर्व्हज' म्हणतात. यामुळे तो स्पर्श आणि हालचालींना प्रतिसाद देऊ शकतो. याला विज्ञानाच्या भाषेत 'डिसेंट्रलाइज्ड सिस्टीम' म्हटले जाते.

रक्ताच्या जागी फिरतं समुद्राचं पाणी!

स्टारफिशची सर्वात मोठी खासियत म्हणजे त्याच्या शरीरात लाल रक्त नसते. मग हा जीव जिवंत कसा राहतो? तर, त्याच्या शरीरात रक्ताऐवजी समुद्राचे पाणीच फिरत असते. याला 'वॉटर वॅस्क्युलर सिस्टीम' म्हणतात. या प्रणालीद्वारेच शरीरात ऑक्सिजन आणि पोषक तत्वे पोहोचवली जातात. समुद्राच्या पाण्याचा वापर करून स्वतःला जिवंत ठेवणारा हा खरोखरच अजब जीव आहे.

तुटलेला हात पुन्हा येतो!

स्टारफिशकडे एक जबरदस्त सुपरपॉवर आहे, ती म्हणजे 'रीजनरेशन'. जर एखाद्या अपघातात किंवा शिकारीच्या हल्ल्यात स्टारफिशचा हात तुटला, तर तो पुन्हा पूर्णपणे विकसित होतो. काही प्रजातींमध्ये तर इतकी शक्ती असते की, केवळ एका तुटलेल्या हातापासून संपूर्ण नवीन शरीर तयार होऊ शकते. यामुळेच हा जीव समुद्रात स्वतःचे अस्तित्व टिकवून ठेवण्यास यशस्वी ठरतो.

कशी हालचाल करतो स्टारफिश?

तुम्हाला वाटेल स्टारफिश एकाच जागी पडून असतो, पण तसं नाही. त्याच्या शरीराच्या खालच्या बाजूला शेकडो छोटे 'ट्यूब फीट' असतात. हायड्रोलिक दाबाच्या साहाय्याने हे पाय रेंगतात आणि स्टारफिशला समुद्राच्या तळाशी फिरण्यास मदत करतात. याशिवाय त्याच्या प्रत्येक हाताच्या टोकावर 'आयस्पॉट्स' असतात, जे त्याला उजेड आणि अंधार ओळखण्यास मदत करतात.

English
हिंदी सारांश
Web Title : Starfish: Brainless, Heartless Wonder Thrives in Ocean's Depths; Mystery Revealed!

Web Summary : Starfish, lacking a brain and heart, navigate the ocean depths using a nerve ring and seawater-based vascular system. They regenerate lost limbs and move with hundreds of tube feet, sensing light with eyespots, showcasing nature's remarkable adaptations.
टॅग्स :Jara hatkeजरा हटके