शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
2
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
3
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
4
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
5
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
6
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
7
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
8
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
9
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
10
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
11
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
12
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
13
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
14
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
15
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
16
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
17
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
18
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
19
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
20
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक

नेटचे फंडे

By admin | Updated: August 28, 2016 02:06 IST

डिस्को ड्रोन - पॅरोट कंपनीने नुकतीच आपल्या नव्या डिस्को ड्रोनची घोषणा केली. नुकत्याच झालेल्या कन्ज्युमर इलेक्ट्रिक शो मध्ये तो सादर केला गेला. विशेष म्हणजे, या डिस्को

- प्रसाद ताम्हनकरडिस्को ड्रोन - पॅरोट कंपनीने नुकतीच आपल्या नव्या डिस्को ड्रोनची घोषणा केली. नुकत्याच झालेल्या कन्ज्युमर इलेक्ट्रिक शो मध्ये तो सादर केला गेला. विशेष म्हणजे, या डिस्को ड्रोन बरोबरच ग्राहकांना स्कायकंट्रोलर २ आणि कॉकपीट्ग्लासेस असा संपूर्ण सेटच देण्यात येणार आहे. याच्या जोडीला स्मार्ट फोन इंस्टॉल करताच हे दोन्ही कार्यरत होणार आहेत. मजबूत अशा फिक्स्ड विंग्जचे डिझाइन या ड्रोनला देण्यात आलेले असून, प्रचलित अशा चार पंखांच्या डिझाइनला जाणीवपूर्वक टाळण्यात आलेले आहे. एका चार्जिंगवरती ४५ मिनिटे काम करणारे हे ड्रोन ५० मैल प्रतितास अशा वेगाने उडू शकते. अत्यंत उच्च दर्जाचे हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर वापरून तयार करण्यात आलेले हे ड्रोन बिगिनर्ससाठी उपयुक्त मानले जात आहे. याची उड्डाण क्षमता आणि व्हिडीओ रेकॉर्डिंगचा दर्जादेखील अतिशय दर्जेदार आहे. सप्टेंबर महिन्यापासून उपलब्ध होणारे हे ड्रोन उपलब्ध होणार आहे.सिंधू गुगल सर्चमध्ये अव्वल - आॅलिंपिकच्या काळात गुगल सर्चवरती रिओ आणि खेळाडूंच्या सर्चची झुंबड उडाली होती. मात्र, या सर्वांत अव्वल स्थान पटकावले ते भारताच्या पी. व्ही. सिंधूने. ती गुगल सर्चवर सर्वात जास्त शोध घेतली गेलेली खेळाडू असल्याचे गुगलनेच नुकतेच जाहीर केले. तर भारतीयांकडून सर्वात जास्त सर्च केला गेलेला खेळाडू उसेन बोल्ट ठरला आहे. पी. व्ही. सिंधू नंतर भारताच्याच साक्षी मलिकचा नंबर लागलेला आहे. उपांत्य फेरी जिंकल्यानंतर सिंधूच्या आणि कास्य पदक मिळाल्यानंतर साक्षीविषयीच्या माहितीसाठी गुगल सर्चवरती मोठ्या प्रमाणावरती नेटिझन्सनी गर्दी केल्याचे यातून दिसून आले. गुगल सर्चवरती इतर सर्वाधिक सर्च झालेल्या भारतीय खेळाडूंमध्ये यानंतर किदंबी श्रीकांत, नरसिंग यादव, साईना नेहवाल, ललिता बाबर यांचा नंबर लागलेला आहे.फेसबुकवर आॅटो प्ले व्हिडीओ विथ व्हॉइस - फेसबुकने 'आॅटो प्ले व्हिडीओ'ची सुविधा उपलब्ध करून दिली आणि फेसबुकचे चाहते एकदमच खूश झाले. हे नवे फीचर अल्पावधीतच लोकप्रिय झाले. मात्र, हे वापरताना फेसबुक युजर्सला सगळ्यात मोठी समस्या येत होती, ती म्हणजे आवाजाची. फेसबुकचे व्हिडीओ आपोआप चालू तर होत होते. मात्र, त्यांना आवाजच नसायचा. आवाजासाठी मोबाइलच्या व्हॉल्युम बटणाची मदत घ्यावीच लागायची. या समस्येविषयी अनेक तक्रारी मिळाल्यानंतर फेसबुकने आता आवाजासाठी प्रयत्न सुरू केले असून, नुकतीच 'आॅटो व्हॉइस प्ले'ची चाचणी घेण्यास सुरुवात करण्यात आली आहे. काही ठरावीक युजर्सला हा आॅप्शन उपलब्ध करून देण्यात आला असून, त्यांच्याकडून याबद्दल मते घेतली जातील. अर्थात, या फीचरमुळे सार्वजनिक ठिकाणी अचानक आवाज सुरू होण्याने अडचण निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेता, सेटिंगमध्ये जाऊन हा आॅप्शन डिसेबल करण्याची व्यवस्था देण्यात येणार आहे.एप्रिलिया एस आर १५० - इटलीची कंपनी एप्रिलिया भारतासाठी तशी नवी नाही. पॅजीयो गाड्यांच्या उत्पादनामुळे आपण तिला ओळखतोच. मात्र, आता दुचाकीच्या बाजारपेठेतदेखील यशस्वी होण्यासाठी एप्रिलियाने कंबर कसली असून, नुकतीच आपली 'एप्रिलिया एस आर १५' ही स्कूटर त्यांनी भारतीय बाजारपेठेत दाखल केली आहे. 154cc engine delivering 11.4bhp and 11.5Nm of torque अशी फीचर्स यात उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत. साधारण ६५,००० रुपये अशी याची किंमत असणार आहे. विशेष असे इटालियन डिझाइन लाभलेल्या या स्कूटरमध्ये, फ्रंट डिस्क आणि रिअर ड्रम ब्रेक सेटअप असणार आहे. बारामतीच्या कंपनीच्या युनिटमध्ये या स्कूटरचे ९०% भाग तयार करण्यात आलेले आहेत. पेटीएमसारख्या वेबसाइटवरती अवघे दोन हजार रुपये भरून स्कूटरची आॅनलाइन नोंदणी करता येणार आहे.