शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
4
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
5
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
6
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
7
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
8
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
9
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
10
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
11
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
12
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
13
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
14
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
15
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
16
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
17
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
18
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
19
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
20
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
Daily Top 2Weekly Top 5

मंगळावरील दोन वर्षांच्या मोहिमेवर पाठवण्यासाठी नासा शोधत आहे चक्क एक ‘जोकर’, पण का?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2019 06:06 IST

कठीण समयी टीम राहावी खूश । चांगला वैज्ञानिक, इंजिनीअरही असणे गरजेचे

अंतराळवीर हे सामान्यपणे फार गंभीर किंवा शांत असतात. खरं तर त्यांच्यासाठी गंभीर असणं गरजेचंही आहे. जेणेकरून ते त्यांच्या कामावर पूर्ण लक्ष देऊ शकतील. पण नासाची टीम काहीतरी वेगळं करण्याच्या विचारात आहे. अंतराळवीरांची एक टीम २०३० मध्ये मंगळ ग्रहावर जाणार आहे. आता अशी माहिती समोर येत आहे की, नासाला या टीममध्ये ‘जोकर’ची भरती करायची आहे.

नासाचं मिशन मार्स साधारण दोन वर्षांसाठी असेल. या मिशनसाठी अशा लोकांचा शोध सुरू आहे जे टीमचा आत्मविश्वास कायम ठेवू शकतील. त्यांना टेन्शन येऊ नये म्हणून गमतीजमती करेल. या जोकरचं नेमकं काय काम असेल, यावर नासा मिशन ग्रुपकडून विचार सुरू आहे.

युनिव्हर्सिटी आॅफ फ्लोरिडामध्ये अँथ्रोपॉलॉजीचे प्राध्यापक जेफरी जॉनसन यांनी सांगितले की, ‘हे लोक कठीण आणि अडचणीच्या काळात पूर्ण टीमला एकत्र ठेवू शकतात. आम्ही अशा व्यक्तीचा शोध घेत आहोत, जो त्याचं काम चांगलं करेल आणि लोकांना हसवत ठेवेल. कारण इतक्या जास्त काळाचं मिशन असल्याने टीममधील लोकांना तणाव येणं सामान्य बाब आहे.’

प्राध्यापक जेफरी म्हणाले की, त्या व्यक्तीला केवळ हसवण्याची कला अवगत असावी, असे नाही. ही व्यक्ती एक चांगली वैज्ञानिक आणि इंजिनीअर असायला हवी. तिला एका ट्रेनिंग प्रोसेसमधूनही जायचं असेल.प्राध्यापकांनी साऊथ पोलपर्यंत पोहोचणाऱ्या रोआल्ड एमंडसनचा उल्लेख करत सांगितले की, ‘कॅप्टन स्कॉट ज्या कामात अयशस्वी झाले होते, ते काम रोआल्डने यशस्वीपणे केलं. असं झालं कारण त्यांच्या टीममध्ये एक आचारी होता. त्याचं नाव होतं अडॉल्फ लिंडस्ट्रॉम. तो फारच गमती स्वभावाचा होता. तो स्वत:ही आनंदी राहायचा आणि दुसºयांनाही हसवायचा. याने टीमचा आत्मविश्वास नेहमी कायम राहत होता.’

टॅग्स :NASAनासा