(प्रातिकात्मक छायाचित्र)
सलमान खानच्या दबंग सिनेमात एक डायलॉग आहे "जिस चीज के लिए जितना वक्त लगता है, उतना तो लगना ही चाहिए". आता बाळाच्या जन्माचंच बघा ना. सामान्यपणे बघितलं तर एका बाळाला जन्म घ्यायला ९ महिन्यांचा कालावधी लागतो. काही आठव्या महिन्यात जन्माला येतात तर काही सातव्या महिन्यात जन्माला येतात. पण तुम्ही कधी ऐकलंय का की, १० दिवसांच्या प्रेग्नन्सीत बाळ जन्माला आलं. तुमचाही यावर विश्वास बसणार नाही पण अशी एक घटना समोर आली आहे. ही अजब घटना ब्रिटनच्या ब्रिस्टल शहरातील आहे. एका कपलला मुलीच्या जन्माच्या १० दिवसांआधी तिला समजलं की, ती प्रेग्नेंट आहे. नोव्हेंबरमध्ये ही महिला कोरोना संक्रमणामुळे हॉस्पिटलमध्ये भरती होती आणि तेव्हाही एखाद्या डॉक्टरला किंवा नर्सला किंवा महिलेला हे समजलं नाही की, ती प्रेग्नेंट आहे.
ब्रिटनच्या ब्रिस्टल शहरात राहणारी सेम हिकने ११ जानेवारीला एका मुलीला जन्म दिला. हैराण करणारी बाब ही आहे की, डिलेव्हरीच्या केवळ १० दिवसांआधी सेमचा पती जोएला टीव्ही बघताना जाणवलं की, त्याची पत्नी प्रेग्नेंट आहे. त्याने पत्नीला याबाबत विचारले आणि तिने दुसऱ्या दिवशी प्रेग्नेन्सी टेस्ट केली. ज्यातून समोर आलं की, ती नऊ महिन्यांची प्रेग्नेंट आहे. इतकेच नाही तर नऊ महिन्यांपेक्षा तीन आठवडे जास्त झाले आहेत. ही घटना पाहून सगळेच हैराण झाले आहेत कारण काहीच ध्यानीमनी नसताना त्यांच्या घरात एका मुलीने जन्म घेतला.
ब्रिस्टल पोस्टनुसार, सेम ३१ डिसेंबरला न्यू ईअरचा आनंद साजरा केल्यावर दुसऱ्या दिवशी म्हणजे १ जानेवारीला सुट्टीवर होता. त्यादिवशी तो सायंकाळी आरामात पत्नीसोबत बसून टीव्ही बघत होता. त्याने पत्नीच्या पोटावर हात ठेवला आणि त्याला जाणवलं की, पोटातून किक मारली. सेमने पत्नीला हे सांगितलं तर पत्नी हसू लाागली. तिचा यावर विश्वासच बसला नाही.
पण जेव्हा सेमने जोर देऊन सांगितले तेव्हा दुसऱ्या दिवशी प्रेग्नेसी टेस्ट करायला गेली. एका होम केअरमध्ये काम करणाऱ्या सेमने २०२० अनेकदा टेस्ट केली होती. आणि सतत तिचा रिपोर्ट निगेटीव्ह येत होता. त्यामुळे यावेळी टाळण्याचा प्रयत्न केला. पण पतीने जोर दिल्याने ती टेस्ट करायला गेली.
रिपोर्ट पाहून कपल हैराण झाले कारण डॉक्टरांनुसार सेम ९ महिने प्लस तीन आठवड्यांची प्रेग्नेंट होती. म्हणजे तिला ९ महिन्यांपेक्षा जास्त झाले होते. डॉक्टरांनी या हैराण झालेल्या कपलला सांगितले की, तयार रहा कधीही डिलेव्हरी होऊ शकते.
याच्या ठीक १० दिवसांनी म्हणजे ११ जानेवारीला केअर होमहून परतत असताना सेमला लेबर पेन सुरू झालं आणि तिने हॉस्पिटलमध्ये एका गोंडस मुलीला जन्म दिला. त्यांनी मुलीचं नाव ज्यूलिया ठेवलं. सेम आणि जोएला आधीही दोन मुलं आहेत. आठ वर्षांचा जॉनी आणि तीन वर्षांचा थॉमस.