शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
4
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
5
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
6
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
7
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
8
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
9
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
10
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
11
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
12
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
13
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
14
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
15
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
16
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
17
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
18
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
19
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
20
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

शास्त्रज्ञांनी तयार केला सर्वात पांढरा रंग; घराला करेल इतके थंड की, AC ची गरज भासणार नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 19, 2021 19:13 IST

या रंगाची गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद झाली आहे.

अमेरिकेतील इंडियाना येथील पुर्झू विद्यापीठाच्या प्रयोगशाळेत जगातील सर्वात पांढरा शुभ्र रंग तयार करण्यात आला आहे. शास्त्रज्ञांचा असा दावा आहे की, या पांढऱ्या रंगाच्या मदतीने घर अतिशय थंड पडेल आणि घरात एसी बसवण्याचीही गरज भासणार नाही. या पांढऱ्या रंगाने गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये सर्वात पांढरा रंग म्हणून स्थान मिळवलं आहे.

का बनवला हा रंग ?

तुम्हाला प्रश्न पडला असेल की, की शास्त्रज्ञांनी इतका पांढरा रंग का बनवला ? मुळात त्यांचा हेतू कोणताही जागतिक विक्रम मोडणं नाही, तर जागतिक तापमानवाढ थांबवणे हा आहे. विद्यापीठातील मेकॅनिकल इंजिनिअरिंगचे प्राध्यापक शिउलीन रुआन म्हणाले की, आम्ही सात वर्षांपूर्वी हा प्रकल्प सुरू केला होता. आमच्या मनात विजेची बचत आणि ग्लोबल वॉर्मिंग कमी करण्यासारख्या गोष्टी होत्या. मग आम्हाला सुर्याचा प्रकाश परावर्तित करणारा पांढरा रंग तयार करण्याचा विचार आला. त्यानंतर आम्ही हा रंग बनवण्याचे काम सुरू केलं.

काय आहेत वैशिष्ट्य ?रुआन यांनी पुढं सांगितलं की, हा पांढरा रंग सुर्याच्या अतिनिल किरनांना वेगाने परावर्तित करतो. हा रंग 98.1% सोलर रेडिएशन थांबवतो आणि इन्फ्रारेड हीट उत्सर्जित करतो. हा कलर सुर्याची गरम किरने परावर्तित करत असल्यामुळे घरातील तापमान कमी होतं आणि गरमीपासून रक्षण केला जात. या कलरमुळे घरात एसीदखील लावण्याची गरज भासणार नाही, असंही ते म्हणाले.

AC पेक्षा पावरफुलरुआन सांगतात की, एक हजार चौरस फूट घताला हा कलर मारल्यास 10 किलोवॅट कूलिंग पॉवर तयार होते. म्हणजेच, हा कलर घरात बसवलेल्या एअर कंडिशनरपेक्षा अधिक शक्तिशाली आहे. हा अल्ट्रा व्हाईट पेंट बाजारात आणण्यासाठी विद्यापीठाच्या शास्त्रज्ञांनी एका कंपनीशी चर्चाही केली आहे. त्यामुळे लवकरच हा पांढरा रंग सामान्य नागरिकांसाठी उपलब्ध होऊ शकतो.

टॅग्स :Internationalआंतरराष्ट्रीयAmericaअमेरिकाInteresting Factsइंटरेस्टींग फॅक्ट्स