शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

एक किस की किमत तुम क्या जानो! 'तो' पोहोचला रुग्णालयात, 'ती' पोहोचली तुरुंगात

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 4, 2020 17:18 IST

मित्रावर रुग्णालयात उपचार सुरू; मैत्रिणीची तुरुंगात रवानगी

मिशिगन: किस करताना जीभ चावल्याप्रकरणी महिलेला अटक करण्यात आल्याची धक्कादायक घटना अमेरिकेच्या मिशिगनमधल्या डेट्रॉईटमध्ये घडली आहे. महिलेनं किस करताना जीभ चावल्यानं तिचा मित्र जखमी झाला. यानंतर त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं. महिलेनं जवळपास १ इंच जीभ चावल्याचं पोलिसांनी सांगितलं. यानंतर पोलिसांनी महिलेची रवानगी तुरुंगात केली. युलेट्टे वेडगेवर्थ नावाच्या ५२ वर्षीय महिलेनं किस करताना तिच्या मित्राची जीभ चावली. या प्रकरणी तिला १ वर्ष तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली. मी माझ्या २७ वर्षांच्या कारकिर्दीत पहिल्यांदाच अशा प्रकारचा खटला पाहिल्याचं सरकारी वकील एरिक स्मिथ यांनी सांगितलं. 'युलेट्टे मंगळवारी तिच्या ६८ वर्षीय मित्राच्या घरी गेली होती. त्यावेळी त्यांनी एकमेकांना किस केलं. याला दोघांचीही संमती होती. त्यावेळी युलेट्टेनं तिच्या मित्राच्या जीभेचा चावा घेतला,' अशी माहिती स्मिथ यांच्या कार्यालयातून देण्यात आली.युलेट्टेच्या मित्रानं घटनेची माहिती पोलिसांना दिली. त्यानंतर काही वेळातच पोलीस त्याच्या घरी दाखल झाले. त्यावेळी त्याच्या जिभेचा एक इंच भाग पोलिसांना बराच वेळ सापडला नाही. अखेर बेडरुममध्ये त्यांना जीभेचा तुकडा सापडला. पीडित आणि युलेट्टे एकमेकांचे जुने मित्र असल्याची माहिती स्मिथ यांच्या कार्यालयानं दिली. मात्र या दोघांनी त्यांच्या नात्याबद्दल दिलेली माहिती वेगवेगळी आहे. आपण डेट करत नसल्याचं युलेट्टेनं पोलिसांना सांगितलं. तर आपण डेट करत असल्याचा दावा पीडित मित्रानं केला. युलेट्टे तिच्या मित्राच्या घरी गेला असताना दोघं किस करत होते. त्यावेळी पीडित मित्रानं युलेट्टेच्या तोंडात जीभ घातली. युलेट्टेनं मित्राला तसं न करण्यास सांगितलं. त्यानंतर त्यांनी पुन्हा किस केलं. त्यावेळी मित्रानं पुन्हा जीभ तोंडात घातली. यानंतर युलेट्टेनं त्याच्या जीभेचा चावा घेतला. पीडित मित्राच्या तोंडातून रक्तस्राव सुरू झाल्यानं त्याला रुग्णालयात नेण्यात आलं. सध्या त्याच्यावर उपचार सुरू आहेत.  

टॅग्स :Americaअमेरिका