शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai: कबुतरांना खायला घातलं, वांद्र्यात एका महिलेसह चार जणांविरोधात गुन्हा दाखल!
2
उद्योग क्षेत्राला बूस्टर; ४० हजारांवर रोजगार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ९ कंपन्यांशी करार
3
सूर्यकुमार यादवने पाकिस्तानच्या जखमेवर चोळलं मीठ, सुपर ४ मधील लढतीबाबत म्हणाला...
4
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
5
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
6
पाक-सौदीसोबत आता इतर अरब राष्ट्रेही एकत्र? पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांचा दावा
7
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज
8
‘निवडणूक आयोग जागा राहिला, चोरी पाहत राहिला...’, राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
9
राज्यात पीक पेरा नोंदणी ४७ टक्केच नोंदणीस दुसऱ्यांदा ३० पर्यंत मुदतवाढ
10
अमेरिकेत टिकटॉकचं गौडबंगाल! डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉकच्या बाबतीतही आता आपला निर्णय फिरवला
11
बदलापूरसारखी दुसरी घटना घडण्याची वाट बघताय का?; हायकोर्टाचा संतप्त सवाल
12
आधी जिल्हा परिषद निवडणुकांचा बार! याचिका निकाली निघाल्याने मार्ग जवळपास मोकळा
13
आयोग नव्हे, मतदारच राजा !
14
विमानतळासह एरोसिटीला जोडणाऱ्या कॉरिडॉरला मंजुरी; केंद्राच्या निर्णयाने सिडकोस दिलासा, तीन किमीच्या मार्गासाठी ४४.४८ कोटींचा खर्च
15
चौथ्या मजल्यावरून पडून चिमुकला वाचला; पण कोंडीत जीव गेला
16
मते चोरी हाेणार नाहीत, याची काळजी घ्या; राज ठाकरे यांच्या सूचना
17
सिडकोच्या कंपनीतील कामगारांचा ४० वर्षे प्रलंबित प्रश्न अखेर सुटला; ११ कामगारांना प्रत्येकी १० लाखांचा धनादेश
18
ऑलिम्पिक यजमानपदासाठी अहमदाबाद तयार आहे?
19
‘नॅनो बनाना’ची जादू, ‘रेट्रो’ फोटो, त्यामागचे धोके!
20
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले

पुरुषांचा निषेध; हजारो तरुणी कापताहेत केस! दक्षिण कोरियामध्ये ऑलिम्पिकवरून 'घमासान'

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 25, 2021 07:44 IST

न सॅन ही साऊथ कोरियाची अशीच एक गुणवान खेळाडू. तिनंही यंदाच्या ऑलिम्पिकमध्ये पहिल्यांदाच सहभाग घेताना तब्बल तीन सुवर्णपदकं पटकावली !.. त्याचं कौतुक झालंच, पण त्यापेक्षाही जास्त तिला सामोरं जावं लागलं ते शिव्या-शापांना आणि पुरुषांच्या टीकेला ! 

नीरज चोप्रा. यंदाच्या टोकिओ ऑलिम्पिकमध्ये पहिल्यांदाच  सहभागी झाला आणि पहिल्याच प्रयत्नात त्यानं सुवर्णपदक पटकावलं.. नीरजचं कौतुक आणि सन्मानसोहळ्यांनी अजूनही त्याच्याबद्दलचा अभिमान भारतीयांच्या नसानसांतून वाहतो आहे.ॲन सॅन ही साऊथ कोरियाची अशीच एक गुणवान खेळाडू. तिनंही यंदाच्या ऑलिम्पिकमध्ये पहिल्यांदाच सहभाग घेताना तब्बल तीन सुवर्णपदकं पटकावली !.. त्याचं कौतुक झालंच, पण त्यापेक्षाही जास्त तिला सामोरं जावं लागलं ते शिव्या-शापांना आणि पुरुषांच्या टीकेला ! 

काय कारण आहे याचं?, सोशल मीडियावर तिला अजूनही लोकं का झोडताहेत? अगदी साधी गोष्ट.. ॲननं तिरंदाजीत सुवर्ण जिंकलं आणि लगेच तिचे फोटो, व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले.. फोटोंमध्ये तिनं आपले केस कापलेले, पुरुषांसारखे छोटे केलेले दिसत होते. बस्स. तिच्याच देशात तिला शब्दांनी झोडपून काढण्यात जणू अहमहमिका सुरू झाली. तिच्यावर टीका करण्यात मुख्यत: पुरुष, तरुण आघाडीवर असले, तरी अनेक वृद्ध, मध्यमवयीन स्त्रियांनीही तिच्यावर ‘संस्कृतीभ्रष्ट’ असल्याची टीका केली. अनेक तरुणांनी ‘फेमिनिस्ट’ (स्त्रीवादी) म्हणूनही तिला धारेवर धरलं.

एका तरुणानं आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे, ॲननं सुवर्णपदक मिळवलं ही चांगली गोष्ट आहे, पण पुरुषांसारखे केस कापून ती स्वत:ला फेमिनिस्ट म्हणवून घेत असेल, तर मी  पाठिंबा मागे घेतो, कोणाही ‘फेमिनिस्ट’वाद्याला जगण्याचा अधिकार नाही.अनेक पुरुषांनी सोशल मीडियावर पोस्ट लिहिल्या, ‘आम्ही आमच्या घामाचा आणि कष्टाचा पैसा, आयकर यासाठी दिलेला नाही, की ॲनसारख्या

तरुणींनी फेमिनिस्ट कृती कराव्यात ! पण, दक्षिण आफ्रिकेमध्ये ॲनवरची टीका जसजशी वाढत जातेय, तसतसं अनेक तरुणीही ॲनच्या बाजूनं उभ्या राहिल्या आहेत. त्यांनी या पुरुषी मानसिकतेचा धिक्कार करताना परंपरावादी पुरुषांना जोरदार फटकारलं आहे. एवढंच नव्हे, त्यांनी सोशल मीडियावर #womenshortcut(हॅशटॅग विमेन शॉर्टकट) अशी मोहीम सुरू केली आहे. ॲनच्या समर्थनार्थ पुढे येताना आजवर हजारो तरुणींनी आपले केस कापले आहेत आणि बिफोर (मोठ्या केसांचा)- आफ्टर ( केस कापलेला) असे दोन्ही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. असं करणाऱ्या तरुणींची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. केस कापल्यामुळे आमच्या स्त्रीत्वात कोणतीही कमतरता येत नाही असंही त्यांनी पुरुषांना सुनावलं आहे.तीन वर्षांपूर्वी २०१८ मध्ये दक्षिण कोरियामधील तरुणींनी ‘कट द कॉर्सेट’ या नावानं एक मोठी मोहीम चालवली होती आणि स्त्री सौंदर्या विषयीच्या कथित पुरुषी संकल्पनांना चाड लावली होती. हे करताना त्यांनी आपले केसही कापले होते आणि कुठलाही मेकअप न करता त्या बाहेर पडल्या होत्या, शिवाय ते फोटोही त्यांनी पोस्ट केले होते. महिला स्वातंत्र्य आणि समानतेच्या दृष्टीनं #womenshortcut ही मोहीम म्हणजे पुढचं पाऊल मानलं जात आहे.सोशल मीडियावर ही मोहीम चालवण्यात पुढाकार घेतलेल्या, साऊथ कोरियाच्या ‘मी टू’ चळवळीविषयी पुस्तक लिहिलेल्या हॅवन जुंग म्हणतात, तीन वर्षांपूर्वी स्त्री-सौंदर्याच्या पुरुषी मापदंडांना तरुणींनी विरोध केला, तेव्हापासूनच ‘कापलेले केस’ हे तरुण स्त्री वाद्यांचं प्रतीक आणि ‘पॉलिटिकल स्टेटमेंट’ झालं. तरुणींच्या या कृतीला तेव्हाही पुरुषांनी प्रचंड प्रमाणात विरोध केला होता, आणि ‘महिलांनी आता आपली सर्वच मर्यादा आणि हद्द ओलांडली आहे’, अशी टीका केली होती..सोशल मीडियावर महिलांविरोधात ऑनलाइन मोहिमा चालवणाऱ्या गटांनी तर तरुणांनाही डिवचायला सुरुवात केली आहे, की, आज तुमचं काहीच अस्तित्व नाही, याला कारण या तरुण मुलीच आहेत. पुरुषासारखे पुरुष, पण तुम्ही रिकामे फिरताहात आणि तुमच्या नोकऱ्यांवर, तुमच्या हक्काच्या जागांवर महिलांनी कब्जा केला आहे. उच्च शिक्षणासाठी विद्यापीठांमध्ये आणि नोकऱ्यांमध्ये महिलांनी आघाडी घेतली आहे. त्यामुळे तरुणांमध्ये त्यावर नाराजी तर आहेच, पण, आपल्यावर अन्याय होतोय, असा ओरडाही त्यांनी सुरू केला आहे. अर्थातच गुणवत्ता, चिकाटी, प्रामाणिकपणा आणि कामसूपणा यात तरुणींनी कर्तबगारी दाखवल्यामुळेच सर्व ठिकाणी त्यांच्या जागा वाढताहेत हे खरं आहे. 

‘तरुणींनी केलं आम्हाला बरबाद’! दक्षिण कोरियामधील तरुणांचा महिलांवर राग असल्याचं आणखी एक मोठं कारण म्हणजे तिथे तरुणांना किमान दोन वर्षे सक्तीनं सेनादलात सेवा द्यावी लागते. तरुणांचं म्हणणं आहे, हे तर फारच अन्यायकारक आहे. कारण या काळात विविध नोकऱ्यांतील तरुणांच्या जागा तरुणी पटकावतात. त्यामुळे तरुणांना बेकार राहावं लागतं. शिवाय सेनेत दाखल झाल्यावर काही दुखापत वगैरे झाली, तर त्यांचं संपूर्ण आयुष्यच बरबाद होतं..

टॅग्स :South Koreaदक्षिण कोरियाOlympics 2020टोकियो ऑलिम्पिक 2021