शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
4
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
5
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
6
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
7
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
8
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
9
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
10
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
11
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
12
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
13
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
14
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
15
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
16
अत्याचारामुळे आम्ही पाक सोडले, त्यांना धडा शिकवा; भारतीय नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत असलेले ६० पाकिस्तानी कोल्हापुरात
17
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
18
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
19
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
20
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान

अरे व्वा! विद्यार्थ्याने मास्कपासून तयार केला तीन पायांचा स्टूल; हा अविष्कार पाहून तुम्हीही कराल कौतुक

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 11, 2020 19:09 IST

Trending Viral News in Marathi : युज आणि थ्रो मास्कमुळे आकर्षक स्टूल तयार होऊ शकतात. असा विचारही तुम्ही कधी केला नसेल.

कोरोनाकाळात मास्कचा वापर एखाद्या शस्त्राप्रमाणे केला जात आहे.  गेल्या ११ महिन्यांपासून मास्कचा वापर जगभरातील अनेक देशांमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढला. मास्कमुळे निर्माण होणारा कचरा ही एक नवीन समस्या त्यामुळे निर्माण होऊ शकते. युज आणि थ्रो मास्कमुळे आकर्षक स्टूल तयार होऊ शकतात. असा विचारही तुम्ही कधी केला नसेल. Kim Ha-neul नावाच्या एका विद्यार्थाने  १५००  मास्कचा वापर करून बसण्यासाठी आकर्षक स्टूल तयार केला आहे. हा मुलगा दक्षिण कोरियातील रहिवासी आहे. कोरोनाकाळात सगळ्यात जास्त वापरात असलेल्या डिस्पोजेबल मास्कचा वापर करून या विद्यार्थ्याने असा अविष्कार तयार केला आहे. 

रॉयर्सने दिलेल्या माहितीनुसार सुरूवातीला किमला डिस्पोजेबल मास्कमुळे होत असलेल्या प्रदूषणाबाबत खूप चिंता होती. त्यानंतर त्याने स्वतःच एको फ्रेंडली उपाय शोधून शक्कल लढवली. या मास्कला रिसायकल करून आकर्षक स्टूल तयार केला आहे. प्लास्टीकला रिसायकल करून अनेक गोष्टी तयार करता येऊ शकतात. polypropylene पासून तयार केलेला मास्क  रिसायकल करून आपल्याला खूप टिकाऊ साहित्य तयार करता येऊ शकतं. 

किम ज्या शाळेत शिकत आहे. त्या ठिकाणी  मास्क कलेक्शन बॉक्स लावले होते. हळूहळू  १० हजार मास्क या ठिकाणी गोळा झाले.  कोरोना व्हायरसचा प्रसार कमी करण्याठी या मास्कना काही दिवस असचं ठेवण्यात आलं होतं. त्यानंतर  मास्कमधील कचरा दूर केला. उरलेल्या मास्कच्या सामानातून त्याने बसण्यासाठी स्टूल तयार केले. त्याआधी मास्कला ३०० डिग्री सेल्सियसवर वितळवण्यात आलं होतं आणि तीन पायांचा स्टूल तयार केला. लॉकडाऊनमध्ये नोकरी गेली, अन् आता १० रूपयात लोकांना पोटभर जेवण पुरवतोय 'हा' अन्नदाता

सोशल मीडियावर या विद्यार्थ्याने तयार केलेल्या स्टूलचे फोटो मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. किमला अशी अशा आहे की, या मास्क्सचा वापर करून अजून चांगले टेबल किंवा खुर्च्या तयार केल्या जाऊ शकतात. आता किमने सरकारी तसंच प्रायव्हेट कंपन्यांकडे मास्क जमा करण्यासाठी निवेदन दिलं आहे. आतापर्यंत या स्टूलचीची विक्री सुरू करण्यात आलेली नाही. Video : कमाल! कात्री, कंगवा घेतला अन् स्वतःच न्हावी बनला, अशी केली जबरदस्त हेअरस्टाईल 

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलSouth Koreaदक्षिण कोरिया