शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
4
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
5
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
6
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
7
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
8
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
9
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
10
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
11
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
12
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
13
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
14
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
15
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
16
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
17
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
18
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
19
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
20
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
Daily Top 2Weekly Top 5

हॉटेलात गेल्यावर नवरा ४५ मिनिटं टॉयलेटमध्ये बसला; पत्नीनं केलं असं काही; वेटर पाहतच राहिला

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 3, 2021 16:33 IST

हॉटेलमध्ये जेवण समोर असताना नवरा टॉयलेटमध्ये जाऊन बसल्यानं बायको संतापली

एखाद्या व्यक्तीला कोणती सवय असेल सांगता येत नाही. एखाद्याला चांगली वाटणारी सवय दुसऱ्यासाठी त्रासदायक ठरू शकते. एका महिलेनं रेडइटवर याबद्दलचा एक किस्सा सांगितला आहे. या किस्सा महिलेच्या पतीबद्दल आहे. पतीच्या एका सवयीमुळे महिला प्रचंड वैतागली आहे. तिनं एका पोस्टच्या माध्यमातून तिच्यासोबत घडलेला संपूर्ण प्रसंग सांगितला आहे. 

पती दिवसातले ४ तास स्वच्छतागृहात घालवत असल्याची व्यथा महिलेनं पोस्टमधून मांडली आहे. आम्ही नुकतंच हॉटेलमध्ये गेलो होतो. आपण आज घरी नाही. हॉटेलात आहोत, त्यामुळे लवकर ये असं मी नवऱ्याला स्वच्छतागृहात जात असताना सांगितलं. मात्र तरीही त्यानं तब्बल ४५ मिनिटं लावली. त्यामुळे प्रचंड राग आल्याचं महिलेनं पोस्टमध्ये सांगितलं आहे. नवऱ्याची सवय त्रासदायक ठरत असल्याचं तिनं पोस्टमध्ये म्हटलं आहे.

'आपण हॉटेलमध्ये असल्याची आठवण मी नवऱ्याला करून दिली होती. त्यावर त्यानं लवकर येतो असं उत्तर दिलं. मात्र बराच वेळ उलटून गेल्यानंतरही नवरा परत न आल्यानं मीच पुरुषांच्या स्वच्छतागृहात गेले. मी त्याला बाहेर येण्यास सांगितलं. काही सेकंदात बाहेर येतो असं उत्तर त्यानं दिलं. मात्र त्यानंतरही बराच वेळ मी त्याची वाट पाहिली. अखेर मी तिथून बाहेर पडले. हॉटेलमध्ये टेबलवर ठेवण्यात आलेलं जेवण संपवलं. वेटरला बिल निम्मं करण्यास सांगितलं. ते भरलं आणि तिथून निघून आले,' असा अनुभव महिलेनं शेअर केला आहे.

महिला टॅक्सीनं घरी पोहोचल्यानंतर २० मिनिटांनी तिचा पती घरी आला. तू अतिशय स्वार्थी आहेस. मला एकट्याला हॉटेलमध्ये ठेवून आलीस, असं म्हणत पतीनं हुज्जत घातली. त्यावर मी तुला फोन, मेसेज केले होते याची आठवण पत्नीनं करून दिली. महिलेनं सांगितलेला हा किस्सा सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे. अनेकांनी यावर प्रतिक्रिया दिल्या आहेत.