शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

४ वर्षांचा असताना झाला होता किडनॅप, ३३ वर्षांनी आईला भेटला; कशी झाली भेट वाचून व्हाल अवाक्

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 3, 2022 17:08 IST

China : १९८९ मध्ये हेनान प्रांतात ४ वर्षीय ली जिंगवेईला एका व्यक्तीने चाइल्ड ट्रॅफिकिंगसाठी किडनॅप केलं होतं. या व्यक्तीने १९०० किलोमीटर दूर जाऊन गुआंगडोंग प्रांतात जिंगवेईला एका दाम्पत्याला विकलं होतं. 

चीनचा (China) राहणारा ली जिंगवे ३३ वर्षाआधी बालपणी किडनॅप झाला होता. पण आता तीस वर्षांनंतर जिंगवेई आपल्या आईला पुन्हा भेटला. कारण त्याने त्याच्या स्मरणशक्तीच्या जोरावर आपल्या गावाचा नकाशा बनवला आणि तो सोशल मीडियावर शेअर केला. या माध्यमातून तो पुन्हा आपल्या परिवाराला भेटू शकला.

'डेलीमेल'च्या रिपोर्टनुसार, १९८९ मध्ये हेनान प्रांतात ४ वर्षीय ली जिंगवेईला एका व्यक्तीने चाइल्ड ट्रॅफिकिंगसाठी किडनॅप केलं होतं. या व्यक्तीने १९०० किलोमीटर दूर जाऊन गुआंगडोंग प्रांतात जिंगवेईला एका दाम्पत्याला विकलं होतं. बराच शोध घेऊनही त्याचा काहीच पत्ता लागला नव्हता. पण आता ३३ वर्षानंतर जिंगवेई आपल्या हाताने तयार केलेल्या नकाशाच्या मदतीने आपल्या परिवाराकडे परत आला आहे. ३३ वर्षानंतर आपल्या घरी परत आल्यावर जिंगवेई आपल्या आईला भेटला तेव्हा दोघांच्या डोळ्यात अश्रू होते. ४ वर्षांचा असताना गायब झालेला जिंगवेईचं आता लग्न झालंय आणि त्याला एक बाळही आहे.

कशी झाली भेट?

जिंगवेई परिवारापासून वेगळा झाल्यापासून त्याला सतत आई आणि गावाची आठवण येत होती. तो दिवसातून एकदा त्याच्या गावाचा नकाशा नक्की बनव होता. जेणेकरून त्याला आठवण रहावी. थोडा मोठा झाल्यावर त्या दाम्पत्यालाही विनंती केली की, त्याला त्याच्या गावी न्यावं आणि आईची भेट घडवून आणावी. पण त्यांनी तसं केलं नाही. अशात जिंगवेईने गावाचा नकाशा तयार केला. 

हा नकाशा तंतोतत त्याच्या गावासारखाच होता. कुणाच्यातरी सांगण्यावरून जिंगवेईने तो नकाशा इंटरनेटवर अपलोड केला. सोबतच स्वत:ची चाइल्ड ट्रॅफिकिंगची शिकार झाल्याची कहाणीही त्याने नकाशासोबत अटॅक केली. पाहता पाहता त्याची कहाणी व्हायरल झाली.

हे प्रकरण पोलिसात गेलं तेव्हा जिंगवेईची आणि त्याच्या आईची भेट घडवण्याचा पोलिसांनी निश्चय केला. त्यांनी त्याच्या नकाशाची तुलना मिलानच्या डोंगरांमध्ये असलेल्या एका गावासोबत केली. त्या गावापर्यंत पोहोचल्यानंतर डीएनए रिपोर्टच्या आधारारे जिगंवेईच्या आईचा पत्ता लागला. नव्या वर्षाच्या दिवशी ३३ वर्षांनी आई आणि मुलाची भेट झाली. यावेळी दोघेही फार भावूक झाले होते.  

टॅग्स :chinaचीनHuman Traffickingमानवी तस्करीKidnappingअपहरण