शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

काय सांगता? 'ही' व्यक्ती वर्षातले ३०० दिवस झोपते; एकदा झोपल्यावर थेट २५ दिवसांनी उठते

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 12, 2021 16:55 IST

पुरखाराम यांना दुर्मिळ आजार; २३ वर्षांपासून आजारावर उपचार नाहीत

नागौर: पश्चिम राजस्थानच्या जोधपूरमध्ये असलेल्या नागौरमध्ये राहणारी एक व्यक्ती वर्षातील ३०० दिवस झोपते. या व्यक्तीची अंघोळ, जेवण सगळं काही झोपेतच होतं. अनेकांना हे वाचून विचित्र वाटलं असेल. मात्र ४२ वर्षीय पुरखाराम यांना एक दुर्मिळ आजार आहे. डॉक्टरांच्या माहितीनुसार पुरखाराम यांना एक्सिस हायपरसोम्निया हा आजार आहे. हा आजार मानसिक स्वरुपाचा आहे. पुरखाराम यांना २३ वर्षांपूर्वी हा आजार झाला. ते एकदा झोपल्यावर २५ दिवस उठत नाहीत. या आजारामुळे ग्रामस्थ पुरखाराम यांना कुंभकर्ण म्हणतात.

नागौर जिल्ह्यातल्या परबतसरमधील भादवा गावात पुरखाराम वास्तव्यास आहेत. त्यांचं किराणा मालाचं दुकान आहे. पुरखाराम यांना असलेल्या झोपेच्या आजारामुळे ते महिन्यातून जेमतेम ५ दिवस सुरू असतं. पुरखाराम यांना एक्सिस हायपरसोम्नियाचा आजार आहे. ते एकदा झोपले की २० ते २५ दिवस उठत नाही, असं त्यांचे नातेवाईक सांगतात. सुरुवातीला पुरखाराम ५ ते ७ दिवस झोपायचे. त्यांना झोपेतून उठवताना कुटुंबियांना बरेच कष्ट घ्यावे लागायचे.

२०१५ पासून आजार वाढलापुरखाराम यांची झोप वाढू लागताच नातेवाईक त्यांना डॉक्टरांकडे घेऊन गेले. मात्र सुरुवातीला डॉक्टरांना आजार लक्षात आला नाही. त्यानंतर पुरखाराम यांच्या झोपण्याचा कालावधी वाढतच गेला. आता ते अनेकदा २५ दिवस झोपतात. हा आजार अतिशय दुर्मिळ असल्याचं डॉक्टर सांगतात. हा आजार झाल्यावर व्यक्तीला सतत झोप येते. व्यक्तीला झोपेतून उठण्याची इच्छा असूनही शरीर त्याला साथ देत नाही. २०१५ पासून पुरखाराम यांचा आजार बळावला. २०१५ पर्यंत ते १८-१८ तास झोपायचे. मात्र आता ते २० ते २५ दिवस झोपतात. 

खाणं-पिणं, सगळं काही झोपेतच झोप येण्याच्या एक दिवस आधी पुरखाराम यांना डोकेदुखीचा त्रास जाणवतो. एकदा झोपल्यावर त्यांना झोपेतून उठता येत नाही. त्यामुळे नातेवाईक त्यांना झोपेतून जेवण भरवतात. पुरखाराम यांच्या आजारावर अद्याप उपचार सापडलेला नाही. पुरखाराम लवकरच बरे होतील आणि आधीसारखं सर्वसामान्य आयुष्य जगतील, असा विश्वास त्यांची आई कंवरी देवी आणि पत्नी लिछमी देवी यांना आहे.