शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

लग्नाला मुलगी सतत देत होती नकार, वडिलांचं फिल्मी स्टाइल अपहरण केलं आणि...

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 30, 2019 17:14 IST

अनेक सिनेमात तुम्ही पाहिलं असेल की, हिरोईनने जर लग्नाला नकार दिला तर व्हिलन तिच्या वडिलांना किडनॅप करून घेऊन जातो.

(प्रातिनिधीक फोटो - Image Credit : EYDT)

अनेक सिनेमात तुम्ही पाहिलं असेल की, हिरोईनने जर लग्नाला नकार दिला तर व्हिलन तिच्या वडिलांना किडनॅप करून घेऊन जातो. अशी काहीशी फिल्मी घटना प्रत्यक्षातही घडली आहे. एकतरफी प्रेमात व्यक्ती सगळंकाही स्वत:च विचार करत असतो. एका तरूणाचं एका तरूणीवर प्रेम होतं. त्याने तिला सांगितलं सुद्धा. तो लग्नासाठी तिच्या मागे लागला. तिने त्याच्या बोलण्याकडे काही लक्ष दिलं नाही. घरच्यांचाही या लग्नाला विरोध होता. सगळंकाही करून झाल्यावर तरूणाने थेट मुलीच्या वडिलांचं अपहरण केलं. जेणेकरून लग्नाची बोलणी करता यावी.

ही घटना घडली दिल्लीच्या द्वारकामध्ये. मुलीचे वडील एका दुकानात काम करत होते. पण ते कामावर गेलेच नाहीत. त्यामुळे दुकान मालकाने दुसऱ्या व्यक्तीला विचारणा केली. तेव्हा त्याने सांगितले की, काही लोक त्याला जबरदस्तीने उचलून घेऊन गेले. दुकान मालकाने लगेच पोलिसांना याबाबत माहिती दिली.

अपहरण केल्यावर काही वेळाने मुलीच्या फोनवर त्या तरूणाने फोन केला. मुलीने फोन उचलला, तिकडून वडिलांनी सांगितले की, 'मी सोनीपतमध्ये आहे आणि सुरक्षित आहे.  संजू चांगला मुलगा आहे आणि तू त्याच्याशी लग्न कर'.

जेव्हा वडिलांनी संजूचं नाव घेतलं तेव्हा मुलीला शंका आली की, संजूने त्यांचं अपहरण केलंय. आधी तो लग्नासाठी दबाव टाकत होता. याच कारणाने मुलीने त्याच्यापासून दूर राहणे पसंत केलं होतं. नंतर मुलीनेही याबाबत पोलिसांना माहिती दिली.

संजू आणि ही मुलगी एका कॉमन मित्राच्या माध्यमातून भेटले होते. दोघांनी एक वर्ष एकमेकांना डेटही केलं. नंतर मुलीला कळालं की, संजूचं आणखी एका मुलीसोबत अफेअर सुरू आहे. तिने त्याच्यापासून दूर राहणे सुरू केले. पण संजू लग्नासाठी तिच्यावर दबाव टाकत होता.

पोलिसांनी संजू मोबाइल नंबर सर्व्हिलांसवर लावला. तपास सुरू झाला. पोलिसांना कळालं की, नंबर मथुरेच्या आजूबाजूला आहे. पोलिसांना सापळा रचून संजूला मथुरेतून अटक केली. मुलगी आणि मुलीच्या घरचे लग्नासाठी नकार देत होते म्हणून त्याने मुलीच्या वडिलांचं अपहरण केलं होतं.

टॅग्स :delhiदिल्लीKidnappingअपहरण