शहरं
Join us  
Trending Stories
1
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
2
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
3
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
4
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
5
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
6
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
7
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
8
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
9
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
10
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
11
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
12
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
13
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
14
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
15
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
16
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
17
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
18
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
19
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
20
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

बाबो! तरुणाने चुकून स्वतःच्याच बहिणीशी केला साखरपुडा; प्री-वेडिंग शूटदरम्यान समोर आलं सत्य अन्...

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 30, 2022 15:26 IST

एका व्यक्तीने आपल्याच चुलत बहिणीसोबत साखरपुडा केला. मात्र प्री-वेडिंग शूटच्या वेळीच त्यांना त्यांचं खरं नातं समजलं आणि त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली.

अमेरिकेत एक हैराण करणारी घटना समोर आली आहे. एका व्यक्तीने आपल्याच चुलत बहिणीसोबत साखरपुडा केला. मात्र प्री-वेडिंग शूटच्या वेळीच त्यांना त्यांचं खरं नातं समजलं आणि त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली. यावेळी हे कपल आपल्या पूर्वजांबद्दल एकमेकांसोबत चर्चा करत होतं. तेव्हाच त्यांना समजलं की ते चुलत भाऊ-बहीण आहेत. डेली स्टारने दिलेल्या वृत्तानुसार, जेसी स्टे (Jesse Stay) असं या तरुणाचं नाव असून त्याने  या गोष्टीचा खुलासा स्वतः एका टिकटॉक व्हिडिओच्या माध्यमातून केला. 

सोशल मीडियावर हा व्हिडिओ जोरदार व्हायरल होत आहे. प्री-वेडिंग शूटच्या वेळी जेसी आणि त्याच्या होणाऱ्या पत्नीने एकमेकांच्या पूर्वजांबद्दल चर्चा केली. यातच त्यांना ते एकमेकांचे भाऊ-बहीण असल्याचं समजलं. जेसी स्टेने सांगितलं, 'हे समजताच मी हैराण झालो की मी माझ्या चुलत बहिणीसोबतच साखरपुडा केला. आम्ही दोघांनी जेव्हा एकमेकांच्या पूर्वजांबद्दल चर्चा केली, तेव्हा आम्हाला समजलं की आम्ही एकाच घरातील आहोत. मी माझ्या भावी पत्नीचा चुलत भाऊ आहे.'

जेसीने सांगितलं की 'जेव्हा मी योग्य पद्धतीने तपास केला तेव्हा एक फोटोही सापडला. ज्यात आमचे पूर्वज एकसोबत दिसत होते. आम्हाला या गोष्टीचा अजिबातही अंदाज नव्हता की आम्ही चुलत बहीण-भाऊ आहोत. पूर्वजांनुसार माझी भावी पत्नी माझी थर्ड कजन आहे. याबाबत समजताच धक्का बसला. 

अनेकांच्या म्हणण्यानुसार, थर्ड कजनसोबत लग्न करता येतं. मात्र, आता मला हे योग्य वाटत नाही. जेसीने सांगितलेल्या या घटनेनंतर अनेकांनी सोशल मीडियावर यावर कमेंट केल्या आहेत. अनेकांनी जेसीला आधार देत म्हटलं, की तू चुलत बहिणीसोबत साखरपुडा केला, यात तुझी काहीही चूक नाही. कारण याबद्दल तुला काहीही माहिती नव्हतं. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.  

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरल