शहरं
Join us  
Trending Stories
1
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
2
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
3
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
4
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
5
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
6
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
7
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
8
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
9
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
10
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
11
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
12
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
13
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
14
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
15
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
16
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
17
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
18
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
19
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
20
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...

...म्हणून मी ३ दुकानांची कुलूपं फोडून फक्त २० रुपये चोरले; जबाब ऐकून पोलीस चक्रावले

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 31, 2022 10:51 IST

एका रात्रीत ३ दुकानांची कुलूपं फोडली, फक्त २० रुपये चोरले; अजब चोरीची संपूर्ण शहरात चर्चा

सीकर: राजस्थानच्या सीकर जिल्ह्यातल्या फतेहपूरमध्ये चोरीची एक अजब घटना घडली आहे. एका चोरानं सोमवारी रात्री दुर्गा मार्केटमधील तीन दुकानांची कुलूपं फोडली. विशेष म्हणजे त्यानं केवळ २० रुपयेच चोरले. चोराला अटक केल्यानंतर पोलिसांनी त्याची चौकशी केली. त्यावेळी त्यानं दिलेलं उत्तर ऐकून पोलिसांची अवस्था हसावं की रडावं अशी झाली. सध्या पोलीस आरोपीच्या कुटुंबीयांची चौकशी करत आहेत.

नेमकं काय घडलं? दुर्गा मार्केटमध्ये असलेल्या कपड्यांच्या तीन दुकानांची कुलूपं रात्री उशिरा फोडण्यात आली. त्यानंतर सकाळी मार्केटमध्ये एकच खळबळ उडाली. माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले. दुकानांची पाहणी करून त्यांनी सीसीटीव्ही फुटेज तपासली. त्यात त्यांना चोर दिसली. 

दुकानांची कुलूपं फोडून आत शिरलेली व्यक्ती आसिफ असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी काही वेळातच त्याला बेड्या ठोकल्या.  चौकशीतून समोर आलेली माहिती ऐकून पोलिसांना आश्चर्याचा धक्का बसला. कुरकुरे खाण्यासाठी २० रुपये हवे असल्यानं तीन दुकानांची कुलूपं फोडल्याचं आसिफनं पोलिसांना सांगितलं.

आसिफची मानसिक स्थिती स्थिर नसल्याचं पोलीस चौकशीतून समोर आलं. त्यामुळे पोलिसांनी आसिफच्या कुटुंबीयांशी चर्चा करण्याचा निर्णय घेतला आहे. तीन दुकानांची कुलूपं फोडण्यात आल्याची माहिती पसरताच व्यापाऱ्यांमध्ये दहशत पसरली. मात्र दुकानांतून कोणतंही सामान चोरीला गेलं नसल्याचं पाहून त्यांनी सुटकेचा निश्वास टाकला.