शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

प्रेमासाठी काय पण! गर्लफ्रेंडने फोन न उचलताच 'तो' वेडापिसा झाला; 18 व्या मजल्यावर चढला अन्...

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2022 11:04 IST

रात्री गर्लफ्रेंडने फोन उचलला नाही म्हणून तो इतका वेडापिसा झाला की त्याने थेट टोकाचा निर्णय घेतला आणि इमारतीच्या 18 व्या मजल्यावर चढला.

व्हॅलेंटाईन वीक (Valentine Week) सुरू झाला असून आहे. लोक आपल्या पार्टनरसोबत त्याचा आनंद साजरा करत आहेत. वेगवेगळे डेज साजरे करत आहेत. पण अशातच एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका तरुणाने फक्त आपली गर्लफ्रेंड फोन उचलत नाही या रागात धक्कादायक पाऊल उचललं आहे. रात्री गर्लफ्रेंडने फोन उचलला नाही म्हणून तो इतका वेडापिसा झाला की त्याने थेट टोकाचा निर्णय घेतला आणि इमारतीच्या 18 व्या मजल्यावर चढला. या घटनेची सध्या सोशल मीडियावर चर्चा रंगली आहे. मलेशियाच्या शाह आलममध्ये राहणारा 28 वर्षांचा तरुण आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, 8 फेब्रुवारीला रात्री 12 वाजल्यापासून तो आपल्या गर्लफ्रेंडला फोन करत होता. मध्यरात्री 3 वाजेपर्यंत त्याने तिला फोन केला. इतके फोन केले तरी तिने उचलला नाही त्यामुळे तो संतप्त झाला. अखेर त्याने धक्कादायक पाऊल उचललं. त्याने आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला. तो इमारतीच्या अठराव्या मजल्यावर चढला आणि तिथून उडी मारण्याचा प्रयत्न त्याने केला. पण तो इमारतीवर गेला आणि उडी मारणार तोच त्याला एका व्यक्तीने पाहिलं. पाहणाऱ्या व्यक्तीने लगेच याबाबत पोलिसांना कळवलं. त्यानंतर रेस्क्यू टीम तिथं तात्काळ दाखल झाली.

सुरक्षेसाठी म्हणून इमारतीच्या खाली जमिनीवर एअर कुशनही लावण्यात आले. त्यांनी तरुणाला समजावलं आणि त्याला इमारतीवरून खाली उतरवलं. त्याला वाचवण्यासाठी तब्बल 4 तास लागले. या तरुणाच्या बहिणीने दिलेल्या माहितीनुसार, त्याने याआधी देखील आत्महत्येचा प्रयत्न केला आहे. याआधीही त्याने असं टोकाचं पाऊल उचललं आहे. तरुणाच्या कुटुंबाने दिलेल्या माहितीनुसार तो बऱ्याच दिवसांपासून मानसिक आजाराशी लढतो आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.