भावाभावातील भांडणं, एकमेकांना शह देण्यासाठी केले जाणारे उद्योग, अरे तो मला काय शिकवतो म्हणत दिलं जाणारं ज्ञान, उपदेशाचे डोस आपल्याला नवीन नाहीत. भाऊबंदकीच्या एकापेक्षा एक कहाण्या तुम्ही ऐकल्या असतील, पाहिल्या असतील. पण लेबनॉनमधल्या दोन भावंडांच्या भांडणातून जे घडलं, त्याची आज जगात चर्चा आहे. मला थोडं कमी मिळालं तरी चालेल, पण त्याला धडा शिकवणारच, असं म्हणत एका भावानं दुसऱ्या भावानं घर बांधलं. तब्बल ६६ वर्षांपूर्वी बांधलेल्या घराची कहाणी आता समोर आली आहे.१९५४ मध्ये बैरुतच्या शेजारी असलेल्या मनारामध्ये एका व्यक्तीनं देशातील सर्वात अरुंद इमारत बांधली. या घराला स्थानिक भाषेत अलबासा असं म्हणतात. अरबी भाषेतल्या या शब्दाचा अर्थ होतो द्वेष, असूया. या घराला अलबासा म्हणण्यामागचं कारणदेखील विशेष आहे. भावाच्या घरातून समुद्र दिसू नये. सी-फेस व्ह्यूच न मिळाल्यानं त्याच्या घराची किंमत कमी व्हावी या हेतूनं दुसऱ्या भावानं त्याच्या अगदी शेजारी अतिशय कमी जागेत एक इमारत बांधली.
भावा, तू समुद्र कसा बघतो, तेच मी बघतो; भांडणं टोकाला गेली अन् भावड्यानं 'लय भारी' बिल्डिंग बांधली
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 26, 2021 15:53 IST