शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 6, 2026 18:26 IST

कुटुंब आणि नातेवाईकांच्या पुढाकाराने दोघांमध्ये आधी बोलणे सुरू झाले. अखेर दोघांनी एकत्र येण्याचा निर्णय घेतला. सध्या हे दोघेही नोएडा येथे कुटुंबासह राहत आहेत. 

प्रयागराज - उत्तर प्रदेशातील पीसीएस अधिकारी ज्योती मौर्या आणि पती आलोक मौर्या यांच्यातील वाद चांगलाच चर्चेत आला होता. मात्र आता या वादाचा शेवट आनंदाने झाला आहे. या दोघांमधील वाद जवळपास अडीच वर्षांनी मिटले आहेत. या दोघांनी पुन्हा एकत्र येण्याचा निर्णय घेतला आहे.

माहितीनुसार, अडीच वर्षांनी ज्योती मौर्या आणि आलोक यांच्यातील वादावर तोडगा निघाला आहे. हे दोघे सोबत राहण्यास तयार आहेत. ज्योती मौर्याचे प्रमोशन झाले आहे. सध्या ती नोएडा येथे कार्यरत आहे. दुसरीकडे आलोक मौर्याने आपल्या कुटुंबाचे भवितव्य सुधारण्याचा निर्णय घेतला आहे. आलोक कामासोबतच स्पर्धा परीक्षेची तयारी करत आहे. यंदा आलोक यूपीपीसीएसच्या मुलाखतीपर्यंत पोहचले होते परंतु अंतिम यादीत त्यांची निवड झाली नाही. 

ज्योती आणि आलोक मौर्याचे २०१० मध्ये झाले होते लग्न

ज्योती मौर्या आणि आलोक मौर्या यांचे लग्न २०१० मध्ये झाले होते. लग्नाच्या सुरुवातीच्या दिवसात सर्व काही सुरळीत होते. परंतु त्यातच २०१५ साली ज्योती मौर्याची निवड पीसीएसमध्ये झाली. एसडीएम रूपाने तिने जबाबदारी सांभाळली. मात्र एसडीएम बनल्यानंतर ज्योती आणि आलोक यांच्या नात्यात दुरावा आला. ज्योती एसडीएमपदावर काम करत होती तर आलोक पंचायत राज विभागात चतुर्थ श्रेणी कर्मचारी म्हणून काम करत होता. 

अडीच वर्षांनी वाद मिटला

लग्नानंतर पत्नीच्या शिक्षणासाठी आलोकने सगळी मदत केली. परंतु एसडीएम बनताच ज्योतीने त्याच्याकडे दुर्लक्ष केले. या दोघांनी एकमेकांवर बरेच गंभीर आरोप केले होते. मात्र अडीच वर्षांनी या दोघांमधील वाद मिटून दोघे एकत्र आल्याचे दिसले. कुटुंब आणि नातेवाईकांच्या पुढाकाराने दोघांमध्ये आधी बोलणे सुरू झाले. अखेर दोघांनी एकत्र येण्याचा निर्णय घेतला. सध्या हे दोघेही नोएडा येथे कुटुंबासह राहत आहेत. 

काय होता वाद? सोशल मीडियात चर्चा

अडीच वर्षापूर्वी उत्तर प्रदेशातील ज्योती मौर्या प्रकरण चांगलेच चर्चेत आले होते. आलोकने पत्नीवर अनैतिक संबंधांचे आरोप लावले होते. ज्योतीने घटस्फोटासाठी कौटुंबिक कोर्टात अर्ज दाखल केला होता. घटस्फोटावर सही करावी अन्यथा तुला जिवंत ठेवणार नाही अशी धमकी दिल्याचा आरोप आलोकने ज्योती आणि तिच्या कथित प्रियकरावर लावला होता. चतुर्थ श्रेणी कर्मचारी असूनही कर्ज काढून पत्नीला शिकवले, पण अधिकारी बनताच तिचे अफेअर सुरू झाले आणि मला सोडून गेली असा आरोप करत आलोकने सोशल मीडियावर काही स्क्रीनशॉट शेअर केल्यापासून या प्रकरणाची सर्वत्र चर्चा सुरू झाली. ज्योतीनेही फसवून लग्न व हुंड्याचा आरोप आलोकवर केला होता. 

English
हिंदी सारांश
Web Title : Officer Wife and Husband Reconcile After Dispute, Two and Half Years

Web Summary : PCS officer Jyoti Maurya and husband Alok reconciled after a two-and-a-half-year dispute. They are now living together in Noida. Alok is preparing for competitive exams. The couple had accused each other of serious allegations, which have now been resolved.
टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलhusband and wifeपती- जोडीदार