शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

प्रेम असावं तर असं...! प्रेयसीच्या सांगण्यावरुन १० लाखाचं बक्षीस असणाऱ्या नक्षल कमांडरचं सरेंडर

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 13, 2021 15:54 IST

महाराज प्रमाणिक याची शरणागती पत्करण्यामागे मुख्य कारण म्हणजे त्याची प्रेयसी आहे. महाराज प्रमाणिक नक्षलवादी म्हणून आयुष्य जगावं असं प्रेयसीला अजिबात वाटत नव्हतं.

ठळक मुद्दे प्रियकर हा मार्ग सोडून पुन्हा मुख्य प्रवाहात यावा. जेलमधून शिक्षा भोगल्यानंतर सामान्य माणसाप्रमाणे आयुष्य जगावं असं प्रेयसीला वाटत होतंनक्षलवादी संघटनेकडून काढल्यानंतर महाराज प्रमाणिक स्वत:ची संघटना तयार करण्याच्या प्रयत्नात होता.महाराज नक्षलवादी संघटनेत जोनल कमांडर होता. त्याच्यावर १० लाखाचे इनाम होते.

प्रेमात खूप ताकद असते, जर एखादा चुकीच्या वाटेने जात असेल तर प्रेमामुळे त्याला योग्य रस्त्यावर पुन्हा आणता येते. झारखंडमध्ये हे एका प्रेयसीनं सिद्ध करून दाखवलं आहे. वाईट मार्गावर असलेल्या प्रियकराला प्रेयसीनं चांगल्या मार्गावर आणलं आहे. झारखंडच्या सरायकेला जिल्ह्यातील ही घटना आहे. याठिकाणी भाकपा नक्षलवादी संघटनेचा कट्टर नक्षली महाराज प्रमाणिक याने पोलिसांसमोर आत्मसमर्पण केले आहे.

महाराज प्रमाणिक याची शरणागती पत्करण्यामागे मुख्य कारण म्हणजे त्याची प्रेयसी आहे. महाराज प्रमाणिक नक्षलवादी म्हणून आयुष्य जगावं असं प्रेयसीला अजिबात वाटत नव्हतं. प्रियकर हा मार्ग सोडून पुन्हा मुख्य प्रवाहात यावा. जेलमधून शिक्षा भोगल्यानंतर सामान्य माणसाप्रमाणे आयुष्य जगावं असं प्रेयसीला वाटत होतं. प्रियकरासोबत सुखी आयुष्याची स्वप्न पाहणाऱ्या प्रेयसीने महाराजनं चांगलं जीवन जगावं यासाठी प्रयत्न केले. तिने त्याला खूप समजावलं. मात्र तरी तो संघटना सोडण्याच्या तयारीत नव्हता. त्यानंतर महाराज प्रमाणिकच्या प्रेयसीनं प्रियकराला चांगल्या वळणावर आणण्यासाठी एक मार्ग अवलंबला.

प्रेयसीनं भेटणं सोडलं

नक्षलवादी संघटनेकडून काढल्यानंतर महाराज प्रमाणिक स्वत:ची संघटना तयार करण्याच्या प्रयत्नात होता. त्यानंतर त्याने परिसरात खंडणी वसूल करण्याचं काम केले. त्याच्या प्रेयसीनेही हट्ट सोडला नाही. जोपर्यंत महाराज प्रमाणिक पोलिसांना आत्मसमर्पण करणार नाही तोवर त्याला न भेटण्याचा निश्चिय प्रेयसीनं केला. प्रियकराला भेटणं प्रेयसीनं सोडलं. त्यानंतर एकेदिवशी प्रियकर प्रेयसीला भेटण्यासाठी पोहचला. तेव्हा प्रेयसीने त्याला सरेंडर होण्याची मागणी केली. त्यानंतर महाराजने सरेंडर झाल्यानंतरच तुला भेटेन असं वचन प्रेयसीला दिलं.

प्रेयसीचं म्हणणं प्रियकरानं ऐकलं

प्रेयसीच्या प्रेमासाठी त्याने नवीन संघटना काढण्याचं खुळ डोक्यातून काढून टाकलं. त्यानंतर त्याने पोलिसांशी संपर्क साधला आणि आत्मसमर्पण केले. पोलिसांशी संवाद साधल्यानंतर त्याने या सगळ्या गोष्टीचा खुलासा केला. मागील काही वर्षापासून महाराज एका मुलीवर जीवापाड प्रेम करतात. तिनेच नक्षली मार्ग सोडून महाराज प्रमाणिकला सरेंडर करण्यासाठी प्रोत्साहित केले असं पोलिसांनी सांगितले.

सरेंडरची अधिकृत घोषणा बाकी

महाराज प्रमाणिक सरायकेला-खरसावा जिल्ह्यातील इचागड परिसरात राहतो. त्याच्या वडिलांचे नाव जरासिंधु प्रमाणिक आहे. महाराज नक्षलवादी संघटनेत जोनल कमांडर होता. त्याच्यावर १० लाखाचे इनाम होते. २४ ऑगस्टला पोलिसांसमोर त्याने आत्मसमर्पण केले. सरेंडर होण्यापूर्वी तो पोलिसांना मिळाल्याच्या आरोपावरुन त्याला संघटनेतून काढून टाकलं होतं. आतापर्यंत पोलिसांनी दोन नक्षलींच्या आत्मसमर्पणाची अधिकृत घोषणा केली नाही.

टॅग्स :naxaliteनक्षलवादीLove Storyदिल-ए-नादान... प्रेमाची गोष्ट