शहरं
Join us  
Trending Stories
1
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
2
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
3
कोल्हापूर सर्किट बेंचचे थोड्याच वेळात उद्घाटन होणार, पहा कसे बनवलेय कोर्ट चकाचक...
4
भारतातील ५ ऐतिहासिक गुहा; 'या' ठिकाणांच सौंदर्य तुमच्याही मनाला पाडेल भुरळ!
5
सौदी-इराण नाही, 'या' देशात फक्त २.५ रुपयांना मिळते १ लिटर पेट्रोल; भारताचा कितवा नंबर..?
6
सूर्याचा स्वराशीत प्रवेश: १० राशींचे ग्रहण सुटेल, चौफेर लाभ; सुबत्ता-भरभराट, शुभ-कल्याण काळ!
7
पुरंदर विमानतळ : शेतकऱ्यांचा मोबदला प्रलंबित, शरद पवारांची मुख्यमंत्र्यांशी चर्चा होणार
8
पैसे कमवण्याची मोठी संधी! पुढील आठवड्यात बाजारात येणार ५ कंपन्यांचे IPO; ग्रे मार्केटमध्ये आधीच तुफान
9
“नाशिकमध्ये आमचे ७ आमदार, पालकमंत्रीपद आम्हाला मिळालयला हवे”; छगन भुजबळ स्पष्टच बोलले
10
प्रेयसीच्या लग्नाने प्रियकर संतापला; तिच्या कुटुंबाला उडवण्यासाठी होम थिएटरमध्ये ठेवला बॉम्ब
11
इस्रायली नौदलाचा येमेनवर मोठा हल्ला, क्षणार्धात इमारतीतून येऊ लागले धुराचे लोट; पाहा व्हिडीओ
12
ज्योती चांदेकर यांच्यावर पुण्यात अंत्यसंस्कार, आईला शेवटचा निरोप देताना तेजस्विनी पंडितची भावुक अवस्था
13
महामंडळ वाटपाचं ठरलं, कोणाला मिळणार संधी? अजित पवार म्हणाले...
14
भारताला वेगळा न्याय? तेल खरेदीवरुन भारतावर निर्बंध, पण ट्रम्प यांनी स्वतः रशियासोबत वाढवला व्यापार!
15
निवृत्त झालेल्या आजोबांना मिळाले ३ कोटी, आनंदात पत्नीला सोडून राहू लागले वेगळे! पण पुढे काय झालं वाचाच...
16
'खुदा'ने मला रक्षक बनवले, मला पद..; सत्तापालटाच्या चर्चेदरम्यान असीम मुनीरचे सूचक विधान
17
म्यानमार सैन्याने स्वतःच्याच देशावर केला हवाई हल्ला; २१ जणांचा मृत्यू, १५ घरांचे नुकसान
18
अण्णा, आतातरी उठा! मतांची चोरी होत असताना तुमच्यासारखा ज्येष्ठ गांधीवादी समाजसेवक शांत कसा?
19
ट्रम्प यांना नक्की हवे तरी काय? व्यापारविषयक टीमचा भारत दौरा लांबला; टॅरिफवरील चर्चा रखडणार!
20
१ वर्षांसाठीच FD करायची आहे? जाणून घ्या कोणत्या बँकेत मिळतोय सर्वाधिक व्याजदर!

दुबईत नोकरीचे आश्वासन पण पाठवले इराकमध्ये

By admin | Updated: June 20, 2014 12:50 IST

पंजाबमधील ४० तरुण इराकमध्ये अडकले असतानाच या तरुणांना दुबईत नोकरीचे आश्वासन देऊन इराकमध्ये पाठवल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.

ऑनलाइन टीम
अमृतसर, दि. २०- पंजाबमधील ४० तरुण इराकमध्ये अडकले असतानाच या तरुणांना दुबईत नोकरीचे आश्वासन देऊन इराकमध्ये पाठवल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. भरघोस पगाराचे आमीष दाखवत इराकमध्ये पाठवण्याचे उद्योग उत्तर भारतात सुरु असून दुबई व अन्य गल्फ देशांपर्यंत या रॅकेटची पाळेमुळे रुजल्याचे समोर येत आहे. 
इराकमधील मोसूल येथे बांधकाम साईटवर ४० कामगारांचे अपहरण झाले असून आणखी काही भारतीय इराकमध्ये अडकले आहे. अपह्रत भारतीयांमध्ये पंजाबमधील तरुणांचाही समावेश असून याच्य राज्यातील अन्य काही तरुणही इराकमध्ये आहेत. या तरुणांची फसवणूक करुन त्यांना इराकमध्ये पाठवण्यात येते अशी महिती आता समोर येत आहे. पंजाबसह उत्तर भारतातील काही राज्यांमध्ये परदेशात नोकरी मिळवून देणारे एजंट सक्रीय आहेत. इराकमधील अशांत वातावरणामुळे तिथे जाण्यास भारतातील तरुण तयार नसतात. त्यामुळे हे एजंट भारतीय तरुणांना दुबईमध्ये भरघोस पगाराचे आमीष दाखवतात असे सूत्रांनी सांगितले. टूरिस्ट व्हिसावर दुबईत गेल्यावर या तरुणांना अनेक दिवस कामच दिले जात नाही. शेवटी हे तरुण काम मिळवून देण्यासाठी दुबईतील एजंटकडे तगादा लावतात. त्यावेळी दुबईतील एजंट त्यांना दुबईत सध्या नोकरी उपलब्ध नसून इराकमध्ये नोकरी आहे असे सांगतो. नोकरीपायी भारतातून आलेले तरुण नाईलाजास्तवर इराकमध्येही काम करण्यास तयार होतात.
दुबईतून त्यांना अवैध मार्गाने कोणत्याही कागदपत्रांची पूर्तता न करता इराकमध्ये पाठवले जाते. यासाठी रस्ते किंवा सागरी मार्गाचा वापर होतो असे दुबईत कार्यरत असलेल्या एका समाजसेवी संस्थेचे प्रमुख एस. पी.ओबेरॉय यांनी सांगितले. या तरुणांना सांगितलेल्या पगारापेक्षा अर्धाच पगार हाती येतो असेही त्यांनी निदर्शनास आणून दिले. या रॅकेटचे पाळेमुळे पंजाबमधील गावागावापासून दुबई व इराकपर्यंत पोहोचले आहेत असेही जाणकार सांगतात.