शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
2
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
3
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
4
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
5
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
6
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
7
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
8
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
9
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
10
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
11
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
12
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
13
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
14
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
15
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
16
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
17
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
18
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
19
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
20
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...

हेअरस्टाईलच्या कॅनव्हासवरचा आंतरराष्ट्रीय ‘उदय’

By admin | Updated: September 25, 2016 01:58 IST

केस कापण्यात विशेष ते काय असे पूर्वी म्हटले जायचे. मात्र आता केस कापण्यापासून त्याच्या विविध कट्सना, स्टाईलना एक महत्व प्राप्त झाले आहे. या क्षेत्रात काही लोकांनी

- स्नेहा मोरेकेस कापण्यात विशेष ते काय असे पूर्वी म्हटले जायचे. मात्र आता केस कापण्यापासून त्याच्या विविध कट्सना, स्टाईलना एक महत्व प्राप्त झाले आहे. या क्षेत्रात काही लोकांनी आंतरराष्ट्रीय स्तरावर आपला दबदबा निर्माण केला आहे. त्यात हेअर स्टायलिस्ट उदय टक्के यांचे नाव मात्र प्रामुख्याने घेतले जाते. काही वर्षांपूर्वी हेअर कटिंग म्हणजे दुय्यम काम अशी व्याख्या होती. मात्र या व्याख्येला छेद देत परंपरागत असणाऱ्या व्यवसायाला आधुनिक करण्याचे व्रत आंतरराष्ट्रीय हेअर स्टायलिस्ट उदय टक्के गेली अनेक वर्षे करीत आहेत. मुंबईकर असणाऱ्या हेअर स्टायलिस्ट उदय टक्के यांनी नुकतेच सातासमुद्रापार फॅशनची राजधानी असणाऱ्या पॅरिसमध्ये परीक्षक (ज्युरी) म्हणून काम पाहिले. ओएमसी युरोप कप या आॅलिम्पिकच्या तुलनेतील मानाच्या स्पर्धेसाठी त्यांची निवड झाली. अत्यंत चोखंदळपणे ही परीक्षकाची भूमिका पार पाडून महाराष्ट्राचे नाव उंचावले आहे.पॅरिसमध्ये ११ व १२ सप्टेंबर रोजी पार पडलेल्या या स्पर्धेत केशरचना, मेकअप या क्षेत्रांतील तब्बल ३८ प्रकार होते. त्यापैकी लेडिज ट्रेंड कट व जेंट्स क्लासिक कट या दोन प्रकारांचे ज्युरी म्हणून उदय टक्के यांनी काम पाहिले. विशेष म्हणजे, ‘ओएमसी युरोप कप’मध्ये युरोपमधल्या सर्व देशांतील मिळून एक हजाराहून अधिक स्पर्धकांनी आपल्या कलेचे सादरीकरण केले. विशेष म्हणजे, या स्पर्धेत परीक्षकांच्या कामगिरीचेही मूल्यमापन केले जाते. परीक्षकाने काही चूक केली किंवा अयोग्य पद्धतीने गुणांकन दिले तर त्याच्यावर दोन वर्षांची बंदी घातली जाते, अशी माहितीही यू टक्के सलोन अ‍ॅण्ड अ‍ॅकॅडमीचे संचालक उदय टक्के यांनी दिली.या परीक्षणाच्या अनुभवाविषयी उदय टक्के म्हणाले की, ज्युरी बनण्याचा हा प्रवास सोपा नव्हता. स्पर्धेच्या नियमांचा अत्यंत सखोल अभ्यास करावा लागला. ज्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी नियुक्ती झाली त्या स्पर्धेत एकूण ३८ प्रकार होते, मात्र भारतात आजही केवळ १७-१८ प्रकार अस्तित्वात आहेत. ग्लोबल पातळीवर ५५ देशांमध्ये आजही या क्षेत्रात भारत सातव्या क्रमांकावर आहे. या क्षेत्रावर आजही रशिया, स्वित्झर्लंड, पोलंड, मंगोलीयन या देशांचे प्रस्थ आहे. या क्षेत्रात अधिक प्रगती करण्यासाठी वेगळ्या दृष्टिकोनातून याकडे पाहणे गरजेचे आहे. त्यासाठी मुख्यत्वे समाजाची या क्षेत्राप्रति असणारी मानसिकता बदलली पाहिजे.उदय यांचा जन्म केशकर्तनाचा व्यवसाय असलेल्या घरात झाला. त्यांनी काळाबरोबर बदलत सर्व आधुनिक तंत्रांचा योग्य अवलंब केला. त्यांनी भारताबाहेर जाऊन नामवंत संस्थांमध्ये शिक्षण आणि अनुभव घेतला. त्याआधारे त्यांनी व्यवसाय तर वाढवलाच, पण १९९६ साली केस आणि त्वचा याबद्दल सर्व काही शिकवणारी ट्रेनिंग इन्स्टिट्यूट स्थापन केली. आतापर्यंत हजारोंच्या आसपास स्त्री-पुरुष तेथून प्रशिक्षित झाले आहेत. आतापर्यंत उदय यांना त्यांच्या या क्षेत्रातील कामगिरीसाठी अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. त्यात जोधपूरमध्ये त्यांच्या व्यवसायबंधूंनी आणि विद्यार्थ्यांनी त्यांची नाण्यांनी ‘तुला’ केली होती. केरळमध्ये त्यांना डॉक्टरेट प्रदान करण्यात आली. तेथे त्यांना ‘कलाश्री’ पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले आहे. टक्के यांनी आजपर्यंत हिंदी-मराठी सेलीब्रिटींसह शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची केशरचना केली आहे.उदय टक्के हे महाराष्ट्राच्या सलोन आणि ब्युटी पार्लर्स असोसिएशनचे अध्यक्ष आहेत. राष्ट्रीय पातळीवरच्या दोन संस्थांचा सदस्यही आहे. त्या संस्था सर्वत्र समान दर आणि दर्जा असावा म्हणून आग्रही असतात. त्या संघटित समाजाने मुंबईमध्ये उदय टक्के यांच्या नेतृत्वाखाली शाहरूख खानला नमवून ‘बिल्लू बार्बर’ या सिनेमाच्या नावातून ‘बार्बर’ हा शब्द काढून टाकायला भाग पाडले.आठवडागणिक बदलणाऱ्या हेअर स्टाइल आणि ट्रेंड्सविषयी टक्के म्हणाले की, सध्या हेअर कटिंग, स्टायलिंग या व्यवसायाला ग्लॅमर प्राप्त झाले आहे. त्यामुळे जास्त सजगता सर्वसाधारण तरुण-तरुणींत आली आहे. प्रत्येकाला ‘चांगले दिसावे’ हे गरजेचे वाटते. व्यक्तीच्या ज्ञानापेक्षा, गुणांपेक्षा, कौशल्यापेक्षा ‘दिसण्याला’ इतके महत्त्व प्राप्त झाले आहे, की अशा सेवा देणाऱ्या स्पा, सलोन, पार्लर, ब्युटी सेंटर्स ही जीवनाचा अविभाज्य भाग झाली आहेत.